खालापूर : प्रतिनिधी कोकण दिंडीच्या माध्यमातून पायी दिंडीने निघालेल्या वारकर्यांना पिण्याच्या पाण्याची मोफत सोय व्हावी, या हेतूने वरची खोपली येथील सामजिक कार्यकर्ते ऋषभ शेळके यांनी त्यांच्या मातोश्री कै. दिपाली दिलीप शेळके यांच्या स्मरणार्थ खंडाळा घाटात पाणपोईची सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाचा नुकताच शेळके कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात …
Read More »डॉक्टरांच्या अनियमितपणाचा बसतोय रुग्णांना फटका!
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात बसावे लागते ताटकळत माणगाव : प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर वेळेत आपले काम सुरु करीत नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणार्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्यांची वाट पाहात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचार घेण्याऐवजी खाजगी दवाखान्याचा रस्ता पकडत आहेत. येथील कामचुकार डॉक्टरांवर …
Read More »120 अश्वशक्तीच्या नौकांनाही मिळणार डिझेल परतावा
आमदार रमेश पाटील यांनी मानले शासनाचे आभार मुरूड : प्रतिनिधी राज्यातील 120 अश्वशक्ती क्षमतेच्या नौकांना डिझेल परतावा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याबद्दल मच्छीमार आणि मच्छीमार सहाकरी संस्थांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. राज्यातील मच्छीमार सहकारी संस्था आणि त्यांच्या सभासदांच्या 120 अश्वशक्ती क्षमतेवरील नौकांचा डिझेल …
Read More »निजामपूर बायपासचा प्रश्न ऐरणीवर!
रस्त्यालगत पार्किंग, अरुंद रस्ता, एमआयडीसीच्या वाढत्या वाहतुकीने जाताहेत बळी माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील निजामपूर शहरातून दिघी-माणगाव-पुणे हा महत्वाच्या राज्य मार्ग जातो. त्यामुळे या ठिकाणच्या बाजारपेठेत दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे तसेच रस्त्याकडेला असणार्या बेकायदेशीर वाहन पार्किगमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गेल्याच महिन्यात निजामपूर बाजारपेठेत एका …
Read More »महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये वायूगळती
एकाचा मृत्यू, एक अत्यवस्थ महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल या कारखान्यात सोमवारी (दि. 14) रात्री 9च्या सुमावारास वायूगळती झाली. यात एक कामगार जागीच मृत्युमुखी पडला, तर अन्य एक कामगार अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जितेंद्र भागुराम आडे (वय 40) असे मयत कामगाराचे नाव आहे. प्रसोल केमिकल कारखान्यात …
Read More »एसएसओएसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश
नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे येथील एसएसओएसपी कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सुुयश संपादन केले आहे. नागोठणे कॉलेजच्या भाविक अनंत घाटवळ या विद्यार्थ्याने रसायनीतील पिल्लई इंजिनीअरिंग कॉलेज येथे झालेल्या झोनल अॅथलेटिक्समध्ये 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे पुण्यातील लोणीकंद येथे रामचंद्र पॉलिटेक्निक या ठिकाणी झालेल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धेत …
Read More »पेण अर्बन बँक ठेवीदारांबाबत सहकारमंत्र्यांसोबत बैठक घेणार -भाजप नेते किरीट सोमय्या
पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) भेट देऊन अधिकार्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी लवकरच सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे ठेवीदारांना आशेचा किरण दिसू लागला आहे. पेण अर्बन ठेवीदारांना न्याय मिळवून …
Read More »अलिबागच्या लाचखोर तहसीलदारांकडे आढळले घबाड; झडती सुरूच
अलिबाग ः प्रतिनिधी लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे तब्बल 60 तोळे सोने आढळले आहे. त्याचप्रमाणे 18 हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या मुंबई येथील घराची झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तेथेही घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली …
Read More »आरसीएफ थळ परिसरात बिबट्याचे दर्शन
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील थळ येथे आरसीएफ प्रकल्प परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. ही अफवा असल्याची चर्चा होती, पण बिबट्याचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला आरसीएफ व वनखात्याच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी थळ येथील आरसीएफ कंपनीच्या परिसरामध्ये झाडीत बिबट्या वावरताना गस्त घालणार्यांना दिसला. …
Read More »रायगडात जिल्हा परिषदेची रंगीत तालीम
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी अलिबाग : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचयातींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांना महत्व प्रप्त …
Read More »