गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालीत शांतता कमिटीची बैठक पाली : प्रतिनिधी सामाजिक सलोखा व एकात्मता वृध्दिंगत करणार्या गणेशोत्सवात समाज प्रबोधनाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवण्यावर भर द्या, असे आवाहन पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या …
Read More »बेकरे गावातील दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बेकरे गावात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. एकाच आठवड्यात नेरळ पोलिसांनी तीन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरात गावठी दारू बनविली जात असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर …
Read More »वळवली रस्त्याचे लोकार्पण
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील बेलाशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली गावातील द्वारकाधीश मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. माजी उपसरपंच संतोष निगडे यांच्या हस्ते या रस्त्याचे रविवारी (दि. 25) सकाळी लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण स्वखर्चाने केले आहे. या वेळी नंदकुमार पाटील, …
Read More »खोपोली सिटी बस स्थानकाची दुरवस्था
खड्डे, चिखल व सांडपाणी तुंबत असल्याने प्रवाशांत संताप खोपोली : प्रतिनिधी नागरिकांची नाराजी, नगरसेवकांच्या मागणीनंतरही खोपोली सिटी बस स्थानक समस्यांच्या गर्तेत आहे. खोपोली नगरपालिका परिवहन सेवेचे मध्यवर्ती सिटी बस स्थानक विविध गैरसोयी व समस्यांमुळे विद्यार्थी व नागरिकांच्या संतापाचे कारण बनत आहे. या स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानकात मोठ्या …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी
आरोपीस दोन वर्षांचा कारावास, 20 हजार रुपयांचा दंड खालापूर : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी खालापूर न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी प्रकाश बबन आखाडे (42) याला दोषी ठरवत दोन वर्षे कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. खोपोली वासरंग येथील चाळीत भाड्याने राहणार्या प्रकाश बबन …
Read More »तिसर्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या
अलिबाग : प्रतिनिधी मानसिक आजाराला कंटाळून एका रुग्णाने तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सादिक महंमद सय्यद (46) असे उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात उडी मारून आत्महत्या केल्याच्या दोन घटना …
Read More »कार्यकर्त्यांनी कामगिरी चोख पार पाडावी
कार्यकर्ता बैठकीत भाजप नेते रविशेठ पाटील यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर देशातील आम जनता खूश असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी पेण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपली कामगिरी चोख पार पाडावी व भाजपच्या विजयी अभियानास प्रारंभ करावा, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी येथे केले. रविशेठ …
Read More »उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीबाबत शिवसेना युतीचा धर्म विसरले भाजप शहरप्रमुख श्रीकांत पुरी यांचा आरोप
खोपोली : प्रतिनिधी उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना भाजपला विश्वासात घेत नसल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी केला आहे. अडीच वर्षांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपची मनधरणी करणारे शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर आगामी रणनीतीबाबत अद्याप भाजपला विश्वासात घेत नाही, असा आरोप पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. …
Read More »महाडमधील आपदग्रस्तांना मदत
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील गांधारपाले येथील 54 पूरग्रस्त कुटुंबीयांना शिवसेनेच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले. बिरवाडीमधील पूरग्रस्तांनाही मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याचे दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी यावेळी सांगितले. महसूल विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत सुमारे नऊ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसील …
Read More »एसटी व लक्झरी बसचा अपघात
मुरुड : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड मार्गावरील काशीद येथील एका उतारावर सोमवारी (दि. 26) सायंकाळी लक्झरी व एसटी बसची धडक झाली. या अपघातात एसटीमधील सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही एससटी बस मुरूड येथून कल्याणला जात होती. तर हंस लक्झरी बस मुंबईकडून मुरुडला येत होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काशीद जवळील एका …
Read More »