Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महसूल संघटनेकडून सोनखार गावातील 536 पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचे वाटप

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, मुंबई उपनगर महसूल कर्मचारी संघटना व सेवा संकल्प ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील सोनखार गावातील महापुराने बाधित झालेल्या 536 कुटुंबांना जीवनावश्यक 11 वस्तूंचे 536 किट वाटप, तसेच 120 प्राथमिक व 54 माध्यमिक शाळेच्या विद्यार्थांना वह्यांचे व दप्तरांचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. …

Read More »

मिनीट्रेन पावसाळी सुटीनंतरही बंद राहण्याची शक्यता ; कारशेड बनविण्याचा प्रस्ताव

कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाट मार्गात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या असून, त्या नॅरोगेज ट्रकवर आल्या आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून धावणारी मिनीट्रेन पावसाळी सुटीनंतरही काही काळ सुरू होण्याची शक्यता नाही. दरम्यान, या कालावधीत मिनिट्रेनची सध्या बंद असलेली शटल सेवा सुरू करण्यासाठी माथेरान येथे कारशेड उभारण्याची गरज निर्माण झाली असून, त्यासाठी …

Read More »

160 जणांची मोफत आरोग्य तपासणी

मुरूड : प्रतिनिधी  दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मुरूड नगर परिषद आणि एमजीएम हॉस्पिटल (कामोठे) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नगर परिषद सभागृहामध्ये बचत गट सदस्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी शिबिराचे उद्घाटन केले. एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. श्रेय, डॉ. श्रुती, डॉ. निखिल, डॉ. योग्या, …

Read More »

कर्जतमध्ये शनिवारी रोजगार मेळावा

अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कोंकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 31) कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ शैक्षणिक संकुल येथे बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार, उद्योजकता व कौशल्य परिवेश रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात आयसीआयसीआय बँक, …

Read More »

महावितरण विभागाकडून बीएसएनएलला झटका ; थकबाकीमुळे टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत संपूर्ण म्हसळा तालुका झाला नॉट रिचेबल

म्हसळा : प्रतिनिधी विज बिलाच्या थकीत रकमेच्या वसूलीसाठी महावितरण कंपनीने म्हसळा उपविभागात येणार्‍या बीएसएनएलच्या दहा टॉवरचा विज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका झाला नॉट रिचेबल झाला आहे महावितरणच्या म्हसळा उपविभागात बीएसएनएलचे  लिपणीवावे, आंबेत, म्हसळा, सुरई, वांगणी, कोळे, मेंदडी, कोळे, संदेरी, पांगळोली येथे टॉवर आहेत. त्या टॉवरच्या 15 लाख …

Read More »

रायगडात एसटीच्या 1200 नवीन गाड्या; परिवहनमंत्र्यांची माहिती; रामवाडी, अलिबागेत बसस्थानक इमारतीचे भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामवाडी येथील रायगड जिल्हा परिवहन विभागासाठी लवकरच 1200 नवीन गाड्या येणार असल्याने एसटीचा प्रवास भविष्यात वेगवान व सुखकर होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पेण रामवाडी येथे केले.  पेण रामवाडी येथील विभागीय बसस्थानकाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 27) परिवहनमंत्री दिवाकर …

Read More »

शांताराम पवार यांची अध्यक्षपदी निवड

रोहा : तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ह.भ.प. शांताराम देवजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच संदेश कापसे, गाव कमिटी अध्यक्ष राजेश शिर्के, पोलीस पाटील सुरेश जाधव, ग्रामसेवक शिद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीबद्दल शांताराम पवार यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. नागोठण्यात ‘ब्रम्हाकुमारीज’तर्फे वृक्षारोपण …

Read More »

कर्जतमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर

कर्जत : बातमीदार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे महत्त्व पटावे असा प्रयत्न शासनाने सुरू केला आहे. कर्जत नगरपालिकेनेही पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शहरात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात खुद्द नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. …

Read More »

दारूबंदीसाठी आदिवासी ग्रामस्थ आक्रमक

पाली तहसील व पोलीस ठाण्याला निवेदन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या गावठी दारूचे उत्पादन व खुलेआम विक्री होत असल्याची तक्रार करीत तेथील आदिवासी बांधवांनी सोमवारी (दि. 26) पाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली. चंदरगाव आदिवासी वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दारू व्यवसाय चालतो. …

Read More »

डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद

मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांचे प्रतिपादन; शासकीय दाखले वाटप कार्यक्रम रोहे ः प्रतिनिधी दाखले वाटप शिबिरात आज अनेकांना विविध शासकीय दाखले देण्यात आले. त्यासाठी श्री सदस्यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची माहिती संकलन केली होती. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वच उपक्रम स्तुत्य असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रोहा नगर …

Read More »