अलिबाग : प्रतिनिधी सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या असतात. तुमच्या गाण्यातून शब्दांतील भावना रसिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. तरच त्या गाण्याला अर्थ असतो. केवळ आवाजात गोडवा आहे, सुरात गीत गायले म्हणजे गाणं होत नाही, असे परखड मत सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी व्यक्त केले. सुलोचनादीदी यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमात आपल्या सुमधुर आवाजाने …
Read More »साळाव येथे उभ्या कारला आग
रेवदंडा : प्रतिनिधी साळाव येथील बिर्ला मंदिरनजीक मुख्यः रस्तालगत उभ्या असलेल्या कारने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी विनय थत्ते हे स्वतःच्या कारने अलिबागहून साळाव बिर्ला मंदिर येथे आले व त्यांनी बिर्ला मंदिरनजीक मुख्य रस्त्यावर कार उभी ठेवून ते खरेदीसाठी …
Read More »अलिबाग पालिका प्रशासनाची फेरीवाल्यांविरोधात कारवाई
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग शहरातील एसटी बस स्थानकाजवळील रस्त्यावर दुतर्फा बसणार्या फेरीवाल्यांविरोधात अलिबाग नगरपरिषदेने शनिवारी (दि. 20) पोलीस बंदोबस्तात कारवाई केली गेली. त्यामुळे रस्ते आणि पदपथांनी मोकळा श्वास घेतला. अलिबाग शहरातील महावीर चौक ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, मात्र अनधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले, फूलविक्रेते …
Read More »सर्वाधिक मताधिक्याची वाशी विभागाकडून अपेक्षा -रविशेठ पाटील
पेण ः प्रतिनिधी वाशी विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या श्रीकांत पाटील यांच्या वाशी येथील निवासस्थानीे संपन्न झालेल्या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. याव्यतिरिक्त व्ही. बी. …
Read More »एक्स्प्रेस वेवर अपघातात दोघे जखमी
खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अनधिकृत प्रवेश करून पुण्याकडे प्रवास करणार्या तीन मोटारसायकलस्वारांपैकी दोघा दुचाकींना अपघात होऊन यात दोन जण जखमी झाले. आयआयबी पेट्रोलिंग आणि लोकमान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहचल्या आणि त्यांनी जखमींना मदत केली. पोलिसांनी संबंधित मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली आहे. द्रुतगती मार्गावरून मोटरसायकलस्वारांना बंदी असतानाही या मार्गाने …
Read More »‘रिलायन्स’विरोधात पुन्हा विष्णू पाटील यांचा एल्गार
पेण ः प्रतिनिधी गुजरात-दहेज ते नागोठणे अशा होणार्या रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये पेण तालुक्यातील अनेक शेतकर्यांची फसवणूक झाली असल्याने या शेतकर्यांना योग्य मोबदला मिळून त्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता येत्या 30 जुलैला मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनसम्राट तथा भाजपचे विधानसभा अध्यक्ष विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे धरणे आंदोलन होणार आहे. आंदोलनसम्राट …
Read More »साळाव पुलावरील खड्डा वाहतुकीस अडथळा
रेवदंडा ः प्रतिनिधी साळाव पुलावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून या खड्ड्यामुळे भविष्यात भीषण अपघातास सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुरूड-अलिबाग तालुक्यांना जोडणार्या साळाव पुलावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. मुरूड तालुक्यात पर्यटनासाठी अनेक पर्यटक येतात. त्यामुळे दिवसेंदिवस येथून जा-ये करणार्या वाहनांची संख्या अधिक असते. साळाव …
Read More »कल्याणी लोखंडे यांचे मुख्याधिकार्यांकडून कौतुक
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगरपरिषदेच्या लिपिक कल्याणी कांचन लोखंडे यांचे नगरपरिषचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. कार्यतत्पर कर्मचारी म्हणून हा गौरव करण्यात आला. कर्जत नगरपरिषदमध्ये सभा कामकाज म्हणून लिपिक कल्याणी लोखंडे या काम पाहत असतात. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या सूचनेनुसार सात दिवसांत बैठकीचे ठराव …
Read More »क्रिकेट संघातर्फे वृक्षारोपण
पेण ः तालुक्यातील तुकारामवाडी-पंचक्रोशीमधील श्री गणेश क्रिकेट संघ तुकारामवाडी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. संघाचे अध्यक्ष आणि संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते. दिवसेंदिवस निसर्गाचा होत असणारा र्हास आणि वातावरणातील बदल या गोष्टींचा विचार करून वृक्षारोपण करणे आणि त्यांची वाढ होईपर्यंत संगोपन करणे, या उद्देशाने देशासह महाराष्ट्रामध्ये कार्यरत …
Read More »धरणे, धबधब्यांवरील बंदी; स्थानिकांवर उपासमारीची वेळ
कर्जत ः बातमीदार मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची तुफान गर्दी दिसत आहे, पण कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठ्यांवर जाण्यास घातलेली जमावबंदी यामुळे कर्जत तालुक्यातील किमान 25 ठिकाणी पावसाळ्यात दिसणार्या अलोट गर्दीला ओहोटी लागली आहे. पावसाला सुरुवात झाली की …
Read More »