Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूड तालुक्यात लावणीला प्रारंभ

मुरूड : पावसाची दमदार हजेरी मुळे मुरूड तालुक्यातील शेतकरी  सुखावला आहे. मुरुडमध्ये आतापर्यंत 1286 मिमि पावसाची नोंद झाली असून या पावसाने शेतांत पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे भातपिकांच्या लावणीस सुरूवात झाली आहे. मुरूड तालुक्यात 3900 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. शेतकर्‍यांनी यंदा सुर्वणा, रुपाली, कर्जत 2 व 5, …

Read More »

पोलादपुरातील कारचोरीचा सातार्यात लागला शोध

दोन आरोपींकडून चोरीची 10 वाहने हस्तगत पोलादपूर : प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील कोडोली परिसरात दोघा इसमांकडे चोरीची टूव्हिलर आढळून आल्यानंतर त्यांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 10 वाहने हस्तगत करण्यात आली. त्यामध्ये पोलादपूर शहरातील चोरलेली नेक्सा बलेनो कारदेखील असल्याचे उघडकीस आले आहे. पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील किराणामालाचे व्यापारी अभिजित मेहता …

Read More »

महाडच्या ‘सिल्व्हालायकल’ला आग

बंद कारखान्यात रसायनाने भरलेले ड्रम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रातील सिल्व्हालायकल या बंद कारखान्यात बुधवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी रसायनाने भरलेले ड्रम होते. आग आटोक्यात आली नसती …

Read More »

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे पेण : प्रतिनिधी नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यासाठी पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. पेण नगर परिषदेत अनेक कर्मचारी …

Read More »

नागोठण्यात आदिवासींच्या घरांची दुरुस्ती

नागोठणे : येथील ग्रामपंचायत हद्दीतील मिरानगर आदिवासीवाडीतील हरिश्चंद्र वाघमारे आणि भिकी पवार यांच्या घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. या प्रकाराने त्यांना घरात राहणेसुध्दा जिकरीचे झाले होते. नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने या दोन कुटुंबांच्या घरांची दुरुस्ती करून ती मंगळवारी सायंकाळी वाघमारे आणि पवार यांच्या ताब्यात दिली. या वेळी सरपंच डॉ. धात्रक, ग्रामविकास …

Read More »

महाड पं. स. कार्यालयाचे झाले डबके

महाड : प्रतिनिधी ऐन पावसाळ्यात महाड पंचायत समितीच्या नवीन इमारतीची वाट बिक़ट झाली आहे. पावसाचे पाणी साचून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने कर्मचारी व ग्रामस्थांना या कार्यालयात चिखल व गढूळ पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. महाडमध्ये 40 वर्षांपूर्वी बांधलेली पंचायत समिती कार्यालयाची जुनी इमारत धोकादायक झाल्याने तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नवीन …

Read More »

खालापुरातील अंगणवाड्यांची दुरवस्था

नगरपंचायत-पंचायत समितीमध्ये तू तू मैं मैं; वीज-पाणी नसल्याने पालक संतप्त खोपोली : प्रतिनिधी नगरपंचायत आणिपंचायत समिती यांच्यातील समन्वयाअभावी खालापुरातील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून, गळणार्‍या अंगणवाड्यांची दुरूस्ती, वीज आणि पाणी सुविधा पुरवा, असे सांगण्याची वेळ येथे येणार्‍या मुलांच्या पालकांवर आली आहे.खालापूर नगरपंचायत हद्दीत वाल्मिकवाडी, वनवे, खोडावाडी, शिरवलीवाडी, महड, निंबोडे, खालापूर एक …

Read More »

सहयोग पतसंस्थेकडून वृक्षारोपण

अलिबाग : प्रतिनिधी येथील सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील नामदेव मगर व शंकर भगत यांच्या शेतावर काजू, आवळा, पेरू व बांबू अशा 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांचे संवर्धन संबंधित शेतकरी करणार आहेत. अलिबाग तालुका सहाय्यक निबंधक अशोक मोरे, रायगड जिल्हा पतसंस्था …

Read More »

पाच हजार वृक्षांची लागवड

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायततर्फे पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी शिसव, आवळा, चिंच, राजवला, सीताफळ, गुलमोहर आदी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत नांदगाव हायस्कूल आणि मजगाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.  सरपंच पवित्रा चोगले व ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी यांच्या हस्ते नवीन मजगाव परिसरात …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण

नागोठणे : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नागोठणे ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, त्याचा शुभारंभ मंगळवारी (दि. 9) सकाळी करण्यात आला. जि. प. सदस्य किशोर जैन, रोहे पं.स. सभापती राजश्री पोकळे, पं. स. सदस्य संजय भोसले, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच …

Read More »