Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानमध्ये वृक्ष लागवडीसाठी तरुणांचा पुढाकार

कर्जत : बातमीदार : नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाने जाताना अमान लॉज रेल्वे स्थानकापुढे सखाराम तुकाराम पॉईंट लागतो. त्या ठिकाणी 2005 च्या अतिवृष्टीत तेथील माती आणि झाडे वाहून गेली होती. त्यामुळे सखाराम तुकाराम पॉईंट परिसरात एकही मोठे झाड शिल्लक राहिले नसल्याने रस्त्याने जा ये करणार्‍याना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ही …

Read More »

रोह्यातील खड्डे तत्काळ भरावेत; अन्यथा जनआंदोलन; शिवसेनेचा इशारा

रोहे ः प्रतिनिधी  : विकासकामाच्या नावाखाली नगर परिषदेने शहरात खोदलेले खड्डेे तातडीने भरावेत, यासाठी रोहा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. 18) सकाळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खड्डेे भरण्यासाठी निवेदन दिले आहे. शिवसेना शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना अल्पसंख्याक प्रमुख उस्मान रोहेकर, युवा …

Read More »

श्रीवर्धनमधील रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष प्रयत्न; कृष्णा कोबनाक यांची माहिती म्हसळा ः प्रतिनिधी  रायगडातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या तालुका शहराला जोडणे व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या गाववाडी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची शिफारस व विशेष प्रयत्नाने श्रीवर्धन …

Read More »

द्रुतगती महामार्गावर पाच वाहनांचा अपघात

खालापूर : प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील लोधिवली (ता. खालापूर)गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 16) संध्याकाळी अतिवेगात जाणार्‍या कारने पुढे असलेल्या फोर्चुनार गाडीला धडक दिली, त्यामुळे फोर्चुनार गाडी तिच्या पुढे असलेल्या कारवर धडकल्याने ती कार संरक्षण कठडा तोडून दुसर्‍या लेनच्या बाजूला जावून अडकली. त्यावेळी या कारला पाठीमागून आलेल्या कारने …

Read More »

बोरघाटात खासगी बस उलटून दोघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : मुंबई-पुणे  द्रुतगती महामार्गावर खोपोली  हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ सोमवारी (दि. 17) सकाळी खासगी प्रवाशी बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात दोन  प्रवाशी गंभीर तर अन्य 13 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. चालक बाळाराम देवासी पाली (रा. राजस्थान) हा पुणे येथून ट्रॅव्हल्स बस (आरजे -22,पीए-4462) घेऊन सोमवारी …

Read More »

रायगडातील प्राथमिक शाळांमध्ये किलबिलाट

आनंदाने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव अलिबाग : जिमाका : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी  दिनांक 17 जून  ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील …

Read More »

नेरळमध्ये अष्टविनायक टॅक्सी संघटनेच्या स्टॅण्डचे उद्घाटन

कर्जत : बातमीदार नेरळ एसटी स्थानकातून कळंब, वांगणी या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी सेवा देण्याकरिता नव्याने टॅक्सी स्टँड स्थापन करण्यात आले. या अष्टविनायक टॅक्सी स्टँडचे उद्घाटन ज्येष्ठ वाहतूक हवालदार सुभाष पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. अष्टविनायक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोईर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी जि.प. चे माजी …

Read More »

हरवलेल्या तरुणाला भेटली घरची माणसं

खोपोली : प्रतिनिधी तामिळनाडूमधील कंडलूर जिल्ह्यातील एक तरुण मागील पंधरा दिवसापासून खोपोली शीळफाटा येथील वन खात्याच्या तपासणी चौकीच्या परिसरातील एका झाडाखाली वास्तव्यास होता. तरुण कोण असावा व त्याचे गाव व घरची माणसं कुठे असतील या बाबत या तपासणी चौकीवरील वन कर्मचार्‍यांनी माणुसकीच्या नात्याने चौकशी सुरू केली. काही दिवसांपुर्वी हा तरुण …

Read More »

जागतिक बँकेचे पथक महाडमध्ये दाखल

महाड, पोलादपूर : प्रतिनिधी जागतिक बँक अर्थ सहाय्यित जलस्वराज्य कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील निमशहरी व पाणी टंचाईग्रस्त भागात राबविला जात आहे. त्यातून महाड व पोलादपूर तालुक्यात काही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी नातोंडी धारेचीवाडी (ता. महाड) आणि वाकण मुरावाडी (ता. पोलादपूर) या गावांना जागतिक बँकेच्या पथकाने नुकतीच भेट …

Read More »

महाडमध्ये नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा

दासगाव : रामप्रहर वृत्त महाड तालुक्यातील हजारो दरडग्रस्त कुटुंबांना महाडच्या महसूल विभागाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. संभाव्य दरडीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही कार्यवाही केली आहे. नोटीस बजावून सुविधा न देणे म्हणजे दरडग्रस्तांना वार्‍यावर सोडण्याचा प्रकार आहे. आपत्ती व्यवस्थापन, दरडीपासून सुरक्षा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमावर लाखोची उधळण करणार्‍या शासनामार्फत 2005 पासून या …

Read More »