महाड, पोलादपूर : प्रतिनिधी जागतिक बँक अर्थ सहाय्यित जलस्वराज्य कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील निमशहरी व पाणी टंचाईग्रस्त भागात राबविला जात आहे. त्यातून महाड व पोलादपूर तालुक्यात काही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी नातोंडी धारेचीवाडी (ता. महाड) आणि वाकण मुरावाडी (ता. पोलादपूर) या गावांना जागतिक बँकेच्या पथकाने नुकतीच भेट …
Read More »महाडमध्ये नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा
दासगाव : रामप्रहर वृत्त महाड तालुक्यातील हजारो दरडग्रस्त कुटुंबांना महाडच्या महसूल विभागाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. संभाव्य दरडीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही कार्यवाही केली आहे. नोटीस बजावून सुविधा न देणे म्हणजे दरडग्रस्तांना वार्यावर सोडण्याचा प्रकार आहे. आपत्ती व्यवस्थापन, दरडीपासून सुरक्षा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमावर लाखोची उधळण करणार्या शासनामार्फत 2005 पासून या …
Read More »समुपदेशन प्रक्रियेत गोंधळ
शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते. मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यातील बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे शिक्षकांना …
Read More »महाडमध्ये अभियांत्रिकी संघटनेचा कौटुंबिक मेळावा
महाड : महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारणीने नुकताच महाडमध्ये कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात कोकणासह 36 जिल्ह्यातील पदाधिकारी सपत्नीक सहभागी झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील बालाजी रिसॉर्टमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामध्ये विरकर आणि त्यांच्या सहकार्यांनी संगीताचा …
Read More »जिल्हा नियोजन भवनाचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
अलिबाग ः प्रतिनिधी येथील जिल्हा नियोजन भवन या नवीन इमारतीचे शनिवारी (दि.15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात ई-उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ संदेश पाठवून रायगड जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच अलिबाग येथे जिल्हा प्रशासनाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या रु.50 कोटी रुपायांच्या प्रस्तावास …
Read More »‘स्वच्छ भारत अभियानात कामगारांचा मोठा वाटा’
पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49 वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले. स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई …
Read More »समुपदेशन प्रक्रियेत गोंधळ; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते, मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे बदली …
Read More »खालापुरात गॅसवाहक टँकर घसरला
खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील कलोते (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर शनिवारी (दि. 15) सकाळी निसरड्या रस्त्यावरुन घसरला व महामार्गावर आडवा झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र कलोते गावाजवळ काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. इंडेन कंपनीचा स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर …
Read More »महाड तालुक्यातील नुकसानग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी व वादळी पावसामुळे मागील दोन वर्षांमध्ये महाड तालुक्यामधील 35 गावांतील ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या ग्रामस्थांना आता सरकारने मदतीचा हात दिला आहे. तालुक्यातील तब्बल 425 आपद्ग्रस्तांना सुमारे साडेतेरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. महाड तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा इतिहास आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात …
Read More »कंत्राटी कामगार व प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री रवींद्र चव्हाण
अलिबाग : जिमाका मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणार्या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 15) अलिबाग येथे दिले. रासळ येथील कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »