Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत नगरपालिकेच्या कर वसुलीला वेग

कर्जत : बातमीदार : कर वसुली करण्यासाठी कर्जत नगर परिषद प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरु केले असून, त्यामुळे सुमारे 90टक्क्यांपर्यंत कर वसुली झाली आहे. त्यात प्राधान्याने पाणीपट्टी आणि घरपट्टीचा समावेश आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीची कर वसुली जास्त असल्याने नगर परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचे कौतुक होत आहे. यावर्षी कर्जत नगर …

Read More »

माथेरानचे रेल्वे प्रतिक्षालय अजूनही बंद

कर्जत : बातमीदार : नॅरोगेजवर चालणारी माथेरानची मिनिट्रेन कात टाकत आहे.गेल्या दीड वर्षांमध्ये मध्य रेल्वेने तब्बल 7 इंजिन नेरळ लोकोच्या ताफ्यात आणली आहेत. तसेच वेगवेगळ्या सुधारणाही केल्या आहेत, यामध्ये अमनलॉज स्टेशनवर प्रतिक्षालय बांधले आहे. मात्र गेल्या सात महिन्यापासून हे प्रतिक्षालय बंद असल्याने पर्यटकांना याचा त्रास होत आहे. 1 मे व …

Read More »

पोलादपूर तालुक्याची तहान भागणार

29 बोअरवेलची मंजूरी; कुडपण खुर्दचीही मागणी पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्याच्या पाणी पुरवठा कृती आराखड्यात मागणी केल्या पैकी 29 बोअरवेलना मंजूरी प्राप्त झाली आहे. संबंधीत ग्रामपंचायतीकडे  बोअरवेलसाठी निधी वर्ग करण्यात आला असून, पंचायत समितीचे शाखा अभियंता या कामी सर्व सोपस्कार पूर्ण करणार असल्याने बोअरवेल कागदोपत्री करण्याचे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत …

Read More »

हॉलिबॉल स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता

खारेपाट : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील जय बहिरीदेव संघ बहिरीचापाडा आयोजित जिल्हास्तरीय हॉलिबॉल टाकाटाकी स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता ठरला, तर उपविजेता बहिरीदेव संघ बहिरीचापाडा, तृतीय संघ नांदाईचा पाडा संघ, चतुर्थ क्रमांक जय बहिरीदेव संघ ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट शूटर-सुधाकर पाटील बहिरीचापाडा, विजय म्हात्रे दादर-पेण यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघ …

Read More »

मुरूडमध्ये पर्यटकांची अलोट गर्दी; समुद्रकिनारे गजबजले

मुरूड-जंजिरा ः प्रतिनिधी शनिवारी बुद्धपौर्णिमेची आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी साधून हजारो पर्यटक मुरूड, काशीद समुद्रकिनारी येऊन धडकले आहेत. शनिवारपासूनच पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पर्यटकांनी स्वतःच्या चारचाकी गाड्या घेऊन येणे अधिक पसंत केले. त्यामुळे मुरूडच्या समुद्रकिनारी असणार्‍या लॉजेसभोवती गाड्यांची गर्दी दिसून आली. मुरूडसह काशीद समुद्रकिनाराही शेकडो पर्यटकांनी …

Read More »

रायगडात ‘रोहयो’तील रोजगार निर्मितीचे 90 टक्केउद्दिष्ट पूर्ण

अलिबाग ः प्रतिनिधी रोजगार हमी योजनेत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. यंदा दोन लाख 38 हजार 993 मनुष्य दिवस रोजगारनिर्मिती करण्यात आली. फळबाग लागवड योजनेसह अन्य योजनाही ‘रोहयो’त जोडल्यामुळे रायगडात ‘रोहयो’ला चांगला प्रतिसाद लाभला आहे.    जिल्ह्यात ‘रोहयो’ अंतर्गत 2018-19 साठी …

Read More »

गारंबी जंगलात मोठी वारुळे

पावसाळा जवळ आला की पशू-पक्ष्यांना आधी चाहूल लागते व प्रत्येक जण आपले घरटे बांधण्याच्या कामाला लागतो. मुंग्यासुद्धा पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी जंगलात मातीच्या साह्याने मोठ-मोठी वारुळे तयार करीत असतात. या वारुळात पावसाळ्यातील दिवसांसाठी अन्नाचा साठा केला जातो. मुरूडमधील गारंबी जंगल परिसरात अशी मोठं मोठी वारुळे दिसून येतात. (छाया : …

Read More »

एसटीच्या पेण स्थानकाची दुरवस्था

जलवाहिनी फुटली, पिण्याच्या पाण्याची गैरसोय पेण : अनिस मनियार राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या पेण स्थानकामागचे शुक्लकाष्ठ सुरूच असून, या स्थानकामध्ये प्रवाशांना कोणतीच सोयीसुविधा राहिली नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असून, पाणी साठवण टाकी मात्र कोरडी झाली आहे. त्यामुळे या स्थानकांत प्रवाशांना पाण्यापासून वंचित राहावे …

Read More »

महाड न.प.ची घरपट्टी वसुली जोरात

मार्च अखेर तीन कोटी एक लाखांचा गल्ला महाड : प्रतिनिधी नगर परिषदेकडे कर्मचारी तुटवडा असतानादेखील महाडमध्ये घरपट्टी वसुली जोमाने सुरु आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत  वसुली विभागाने आपले लक्ष 84 टक्के पूर्ण केले आहे. आतापर्यंत सुमारे तीन कोटी एक लाख रुपये घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. घरपट्टी वसुल करणे, हे तसे …

Read More »

नेरळमध्ये नालेसफाईची कामे वेगात

कर्जत : बातमीदार नेरळ गावातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केला आहे. नेरळ गावात 10 किलोमीटरचे मुख्य नाले असून, 12 किलोमीटरचे उपनाले आहेत. पावसाळा डोळ्यासमोर ठेवून त्यांची साफसफाई करण्यास नेरळ ग्रामपंचायतीने सुरुवात केली. नेरळ ग्रामपंचायत दरवर्षी गावातील मुख्य नाले आणि बाजारपेठ भागातील लहान नाल्यांची साफसफाई करीत असते. नेरळ …

Read More »