Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कुडली जावटे परिसरात तिळाची शेती बहरली

धाटाव : प्रतिनिधी यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली होती. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता, त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. सध्या कधी ऊन तर कधी तुरळक पाऊस पडत असल्यामुळे रोहा तालुक्यात आता भात पिकाबरोबर तिळाची सुंदर पिवळी फुले असलेली रोपे डोलू लागली …

Read More »

पडम येथील जागृत देवस्थान मरूआई, जाखमाता

रोहे : महादेव सरसंबे तालुक्यातील प्रसिध्द असलेले पडम गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान असलेल्या मरूआई व जाखमाता नवरात्रौत्सवास सुरूवात झाली आहे. मरूआई, जाखमाता या दोन्ही माता रोहा तालुक्यात श्रध्दास्थान असल्याने  भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत आहेत. रोहा-अलिबाग मार्गावर अवचितगडाच्या पायथ्याशी असलेल्या पडम गावात मरूआई, जाखमाता या मातांचे मंदिर आहे. पडम …

Read More »

‘भोंडाई‘तून जोपसली जाते आदिवासींची संस्कृती

नागोठणे : प्रतिनिधी नवरात्रोत्सवात गरबा नृत्य अथवा इतर प्रकार सादर करण्यासाठी अनेक आधुनिक वाद्यांचा वापर केला जातो, परंतु आजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये भोंडाई गीतांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जोपासली जात आहे. नाचणी, वरी, भात इत्यादींच्या कणसांनी सजवलेल्या कलशाला आदिवासी समाजात भोंडाई देवी असे म्हणतात. नवरात्रोत्सवाच्या काळात ही भोंडाई डोक्यावर घेऊन आदिवासी …

Read More »

मोरे महिला महाविद्यालयातर्फे रोठ बुद्रुक गावात स्वच्छता मोहीम

रोहे प्रतिनिधी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे रविवार (दि. 2) तालुक्यातील रोठ बुद्रुक गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.  धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालयातील …

Read More »

चौक ग्रामपंचायतीमध्ये भाजप-मविआ लढत

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील चौक, लोधिवली, तुपगाव आणि आसरे या चार ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 16 ऑक्टोबर रोजी होणार असून, या निवडणुकीत भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा सामना होत आहे. चौक, लोधिवली, तुपगाव आणि आसरे या चारही ग्रामपंचायती गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात होत्या. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ एक वर्षापूर्वीच संपला असून …

Read More »

भाजप महिला मोर्चाच्या अन्नपूर्णा पाककला स्पर्धेस कर्जतमध्ये प्रतिसाद

कर्जत : बातमीदार सेवा आणि संस्कृती पंधरवडा अंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे यांनी कर्जतमध्ये अन्नपूर्णा पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संतोष भोईर यांनी अन्न पदार्थातील भेसळ कशी ओळखावी, याचे मार्गदर्शन केले. कर्जत शहर भाजप कार्यालयात घेतलेल्या या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  अर्चना …

Read More »

पांढर्‍या कांद्याच्या बियाण्याचा तुटवडा

अलिबाग : प्रतिनिधी मागच्या वर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे अलिबागच्या पांढर्‍या कांद्याचे बियाणे खराब झाले होते. त्यामुळे  अलिबागच्या पांढरा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना यंदा पांढर्‍या कांद्याच्या बियाण्याचा मोठा तुटवडा भासतो आहे. शेतकर्‍यांना बियाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी पांढर्‍या  कांद्याची  सीडबँक सुरू करण्याची कृषी विभागाची योजना आहे. पुढल्या वर्षाच्या लागवडीसाठी येणार्‍या पिकामधून बियाणे …

Read More »

खोपोलीतील लव्हेज गावची भवानी माता

खोपोली : जयवंत माडपे खोपोली नगर परिषद हद्दीतील लव्हजी रेल्वेस्थानकापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात भवानी मातेचे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस हे मंदिर रात्रंदिवस भक्तांसाठी खुले असते. भवानी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी शेतातून पाय वाटेने जावे लागते. मार्गक्रमण करताना सह्याद्रीच्या पर्वतरांगा व त्यावर पसरलेली …

Read More »

भाजप नेते संजय कोनकर यांचे निधन

धाटाव : प्रतिनिधी रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी  जिल्हाध्यक्ष संजय कोनकर यांचे सोमवारी (दि. 3) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. संघ परिवार परिवाराशी नाळ जुळलेले संजय कोनकर शेवटपर्यंत भाजपशी एकनिष्ठ राहिले. ते रोह्याचे नगराध्यक्ष असताना त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. भाजपचे विचार सर्वसामान्य …

Read More »

ई-रिक्षाच्या समर्थनार्थ माथेरान नगर परिषदेवर मोर्चा

माथेरान : प्रतिनिधी माथेरानमध्ये लवकरात लवकर पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात यावी आणि शालेय विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ तसेच पर्यटकांसाठी स्वस्त व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था सुरू व्हावी यासाठी सोमवारी (दि. 3) येथील नागरिक एकवटले होते. सर्वपक्षीयांनी त्यास पाठिंबा देत आपला सहभाग नोंदविला. सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक …

Read More »