भाजपकडून टँकरने पाणीपुरवठा महाड ः प्रतिनिधी महाड शहराला पाणीपुरवठा करणार्या कोथुर्डे पाइपलाइनचे काम पूर्ण न झाल्याने महाड शहरात पाणीटंचाई निर्माण झाली.दरम्यान महिलांनी आक्रोश करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भाजप महाडकरांसाठी धावून आले असून जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या माध्यमातून शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे महिलांनी भाजपचे …
Read More »रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी माता
रोहे : महादेव सरसंबे रोहा तालुक्यात कोरोना नंतर नवरात्र उत्सवाची धुमधाम चालु आहे.या वर्षी बंधनेमुक्त उत्सव असल्याने रोहा तालुक्यातील भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रम होत असुन मोठया श्रध्देने या उत्सवात भातसईसह तालुक्यातील भाविक मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत.नवसला पावणारी महादेवी माता असल्याने भाविकांचे …
Read More »काळेश्रीची अकादेवी
पेण : अनिस मनियार भोगावती नदी ही भोगेश्वरी येथून वाहत येते. ती पेण तालुक्यातील अकादेवी काळेश्री खाडीतून रेवसच्या खाडीला मिळते. काळेश्री अकादेवी हे तीन खाड्या मिळून बनलेले बेट आहे. या बेटातच अकादेवी मंदिर वसले आहे. आता या खाडीवर पूल बांधले गेले आहेत. काळेश्री येथील अकादेवी ही कोळी, आगरी बांधवांंच्या हाकेला …
Read More »सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी
पाली ः धम्मशील सावंत छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेल्या ऐतिहासिक सुधागड किल्ल्यावर विराजमान असलेली श्री भोराई देवी ही सुधागड तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या नवरात्र काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर दाखल होत आहेत. नवरात्रोत्सवाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय मंदिर व …
Read More »रायगडात 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण
अलिबाग ः प्रतिनिधी लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशूधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी …
Read More »खालापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सिद्धेश जितेकर
खोपोली : प्रतिनिधी खालापूर बार असोसिएशनच्या मंगळवारी (दि. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत अॅड. सिद्धेश जितेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अॅड.सागर चौगुले व सचिवपदी अॅड. अनघा कानिटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेला खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षपदाच्या …
Read More »उतेखोल शाळेचे विद्यार्थी रमले वाचन जागरात
माणगाव : प्रतिनिधी नवरात्र उत्सवात सर्वत्र नृत्य, गाणी व विविध पारंपरिक संस्कृतीचा जागर होत असताना उतेखोल (ता. माणगात) गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी माणगावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात वाचन उपक्रमात रमले आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षण देणार्या या शाळेत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत विकसित होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, विविध पुस्तकांची ओळख …
Read More »कर्जत एसटी आगार आपल्या दारी!; शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिले मासिक पास
कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या नेरळ-कळंब एसटी बसमुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. बारावीपर्यंत शिकणार्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून एसटी तर्फे मोफत पास दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. हे पास कर्जत आगारात येऊन काढणे खर्चिक व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने आगार व्यवस्थापकांनी …
Read More »पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत बिनविरोध
कर्जत : बातमीदार थेट सरपंचपदासाठी एक आणि सदस्य पदाच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. जानेवारी 2020मध्ये पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 13 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र स्वतंत्रसैनिक वि. रा. …
Read More »लेखी आश्वासन द्या; अन्यथा जनआंदोलन करण्याचा कोलाड पाटबंधारे विभागाला ग्रामस्थांचा इशारा
धाटाव : प्रतिनिधी आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा रोहा तालुक्यातील वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील ग्रामस्थांनी रोह्याचे तहसीलदार व कोलाड पाटबंधारे विभागाला बुधवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला. देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी किल्ला ते निवी …
Read More »