Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत लोहोपमध्ये शिबिर

खालापूर : प्रतिनिधी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 27 किशोरवयीन मुली, 49 गरोदर माता  तसेच 22 स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय …

Read More »

खोपोलीत करिअर मार्गदर्शन शिबिर

खोपोली : प्रतिनिधी रणगाडे, अग्नीबाण, पाच हजार किमीपर्यंत मारा करणारी मिसाईल तसेच अत्याधुनिक आयुधे भारताने बनवली आहेत व बाहेरील देश त्यांची आपल्याकडे मागणी करीत आहेत, त्यामुळे आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी खोपोलीत केले.रोटरी क्लब आणि विज्ञान भारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली …

Read More »

चौलचे शितळामातेचे जागृत देवस्थान

रेवदंडा ः प्रतिनिधी चौल म्हणजे प्राचीन चंपावतीनगरी,  प्राचीनकाळी चौलमध्ये 360 मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस असलेले चौलचे शितळामाता मंदिर त्यापैकीच एक आहे. चौलच्या आंबेपुरी पाखडीत हिरव्या गर्द नारळ पोफळीच्या छायेत शितळादेवीचे भव्य मंदिर आहे. या देवतेवर आंग्रे घराण्याची दृढ श्रद्धा होती. आंग्रे काळातच 1759मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे …

Read More »

तांबटमाळ-चिंबोड स्वप्नातील गाव म्हणून घोषित, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती

पाली : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे बनवण्यात आली आहेत. सुधागड तालुक्यातील तांबडमाळ-चिंबोड हे यामधील एक स्वप्नातील गाव.  फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या गावाची स्वप्नातील गाव म्हणून घोषणा केली. स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रुवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, …

Read More »

रोह्याच्या डॉ. देशमुख महाविद्यालयात विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी

रोहे : प्रतिनिधी  कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनींसाठी महाविद्यालयाच्या सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांच्या हस्ते या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात …

Read More »

माणगावात शिवसेनेला खिंडार

युवा नेते आदेश महाडिक भाजपमध्ये; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत माणगाव : प्रतिनिधी शिव अवजड वाहतूक सेनेचे माणगाव तालुकाध्यक्ष युवानेते आदेश महाडिक (रा. भागाड) यांनी आपल्या  असंख्य सहकार्‍यांसमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आदेश महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने …

Read More »

नवरात्रोत्सव विशेष  : नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता

नागोठणे : राज वैश्यंपायन नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या ग्रामदैवतांची घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नागोठणे विभागासह रायगड जिल्ह्यातील भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात भक्तगणांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नागोठण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरी मातेचे मंदिर शहराच्या मध्यभागी असून मंदिर परिसरात तीन …

Read More »

महाडच्या आतिफ लंबाडेचे सुयश

महाड : येथील चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी व अंजुमन ए इस्लाम अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा खेळाडू आतिफ अब्दुल सत्तार लंबाडे याने नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत डेकॅथलॉन या क्रीडा प्रकारात 5,332 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. बंगळुरू (कर्नाटक) येथे 15 ते 29 ऑक्टोबरला होणार्‍या 61व्या राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप …

Read More »

राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीच्या अनुज सरनाईकला दोन ‘सुवर्ण’

सुधागड : नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने 85 ते 90 वजनी गटात फाईटमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे, तसेच ग्रुप इव्हेंटमध्येसुद्धा सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत एकूण 36 जिल्हे आणि 10 क्लबमधील 800 खेळाडूंचा सहभाग होता. ग्रुप इव्हेंटमध्ये अनुजव्यतिरिक्त अंशुल कांबळे, वैभव काळे यांनी …

Read More »

अलिबाग ः ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 91 अर्ज; कोप्रोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार

अलिबाग ः प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदासाठी वेश्वी आणि नवेदर नवगावमध्ये प्रत्येकी पाच अर्ज आले आहेत. कोप्रोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार असून  सरपंचपदासाठी एकही अर्ज आलेला नाही. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान …

Read More »