अलिबाग : प्रतिनिधी प्रवाशांच्या भारमानात एसटीचा रायगड विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर होता, मात्र दिवसेंदिवस एसटी प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे रायगड विभाग भारमानात राज्यात शेवटच्या क्रमांकावर गेला आहे. राज्य परिवहन मंडळाने भाडेवाढ केल्यामुळे रायगड जिल्ह्यात एसटी उत्पन्नात वाढ झाली आहे, मात्र प्रवाशांची संख्या कामी झाल्यामुळे भारमान मात्र …
Read More »‘आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणातील प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला द्या’
प्रांताधिकार्यांपुढे जनसुनावणी; निवेदन सादर मुरुड : प्रतिनिधी नियोजित आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणासाठी प्रशासनाच्या वतीने प्रकल्पबाधित शेतकर्यांची मते जाणून घेण्यात आली. या वेळी योग्य मोबदला मिळावा, अशी रास्त मागणी प्रकल्पबाधितांच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथे सुमारे दोन हजार 700 कोटी रुपये खर्च करून दिघी-आगरदांडा बंदर विकसित होत आहे. बाहेर देशातून …
Read More »कर्जत तालुक्यात विजय संकल्प
कर्जत : बातमीदार कर्जत तालुका भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विजय संकल्पनिमित्त तालुक्यात बाईक रॅली काढण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बाईकस्वार सहभागी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता पुन्हा हातात राहावी म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या …
Read More »भाजपच्या बाईक रॅलीला प्रतिसाद
सुधागडात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाली : प्रतिनिधी सुधागड-पाली येथे रविवारी (दि. 3) भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे आयोजन सुधागड भाजप युवा मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीमध्ये सुधागड तालुक्यातील खेड्यापाड्यातील भाजप युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या रॅलीत दोनशे ते अडीचशे मोटारसायकली सहभागी …
Read More »माथेरान राणीचा विस्टाडोम प्रवासी डबा फुल्ल..!
कर्जत : प्रतिनिधी नेरळ-माथेरान-नेरळ या माथेरान राणीसाठी आणण्यात आलेला विस्टाडोम प्रवासी डबा आज प्रवाशांच्या दिमतीला लावण्यात आला. 640 रुपये एवढे तिकीट असतानादेखील प्रवाशांनी मोठा प्रतिसाद देत या डब्याचा पहिला प्रवास फुल्ल होता. दरम्यान, त्या विस्टाडोम डब्यामधून थेट आरपार निसर्ग आणि आकाश न्याहाळत पर्यटकांना गारेगार प्रवास करता आला. पर्वतीय प्रवासाचा आनंद …
Read More »म्हसळा तालुक्यातील 15 लाभार्थ्यांना अनुदान मंजूर
म्हसळा : प्रतिनिधी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी 15 लाभार्थींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. या सभेला सदस्य सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी, सदस्य प्रकाश कोठावळे, अनिल टिंगरे, यशवंत म्हात्रे, यशवंत आवेरे, गटविकास अधिकार्यांचे प्रतिनिधी चौधरी, नायब तहसीलदार के. …
Read More »मुरूडमधील सिलिंडर स्फोटाची चौकशी करावी
नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी शहरातील अजित प्रभाकर जोशी यांच्या निवासस्थानी 30 नोव्हेंबर 2018 रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान सात लोक जखमी झाले होते. या सिलिंडर स्फोटाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मुरूड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अजित जोशी यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटामुळे तीन किलोमीटरच्या परिसरात …
Read More »रोहा शहराचा विकास साधू या
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे प्रतिपादन रोहे ः प्रतिनिधी आपण सर्वांनी हातात हात घालून रोहे शहराचा विकास साधू या, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. रोहे येथील श्री. धावीर मंदिरात साडेसहा लाख रुपये खर्च करून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात व येथील …
Read More »वदप गावातील तलाव ओव्हरफ्लो
परिसर जलमय; शेतीचे मोठे नुकसान कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून, कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दिड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे …
Read More »महाराष्ट्र बँकेच्या कशेळे शाखेला टाळे
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यांच्या आदिवासी भागाला जोडणार्या कशेळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत इंटरनेट सुविधा मिळत नाहीत. या इंटरनेट घोळामुळे गेल्या महिनाभर वैतागलेल्या खातेदारांनी केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (दि. 28) महाराष्ट्र बँकेच्या कशेळे शाखेला टाळे ठोकण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे येथील शाखेत गेले कित्येक दिवस इंटरनेट …
Read More »