Breaking News

Ramprahar Team

घुसखोर बांगलादेशी नागरिकास अटक

अमली पदार्थप्रकरणी पनवेल पोलिसांची कारवाई पनवेल : वार्ताहर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे अमली पदार्थाचे विक्री करणार्‍यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये …

Read More »

कै. मुग्धा लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताह

पनवेल ः वार्ताहर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने कै. सौ. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताहाचे आयोजन पनवेलमधील श्री विरूपाक्ष महादेव मंदिरात करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताह 3 ते 9 मार्चपर्यंत विरूपाक्ष मंदिरात रोज रात्री 9.30 वाजता होणार असून यामध्ये विविध शहरातील नामांकित कीर्तनकार हे कीर्तन …

Read More »

500 कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थाची विल्हेवाट

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त तळोजा येथे उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली सुमारे 500 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. प्रिन्सिपल कमिशनर ऑफ कस्टम्स मुंबई यांच्या कार्यालयाने जप्त केलेले अमली पदार्थ, सायकोट्रॉपिक पदार्थ आणि विदेशी मूळ सिगारेट जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या अंतर्गत एकूण 343 …

Read More »

कर्नाळा अभयारण्य परिसरात आगीचे सत्र

पर्यावरण-पशुप्रेमींनी व्यक्त केली चिंता पनवेल ः वार्ताहर निसर्गसंपदेने सुसज्ज असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे या आगीमुळे कर्नाळा किल्ला व अभयारण्यात परिसरातील वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याने पर्यावरण-पशुप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाळा हे पक्ष्यांसाठी असलेले राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. येथे …

Read More »

अखेर व्हायचे ते झालेच

नवाब मलिक हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेआहेत असे नव्हे तर सरकारातील एक महत्त्वाचे मंत्रीही आहेत. गेले काही महिने ते विविध प्रकरणांवरून केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर रोजच्या रोज आरोपांच्या फैरी झाडत होते. त्यांच्या आरोपांत तथ्य होते अशातला काहीच भाग नाही. ईडी आणि अंमलीपदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्‍यांविरुद्ध मलिक यांनी जणु आघाडीच उघडली …

Read More »

मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ व त्यांचे तांडे  कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल झाले आहेत. पाली-खोपोली राज्य महामार्ग, पेण-अलिबाग मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे कळप दिसू लागले आहेत. धनगर समाज बहुतांश ठिकाणी स्थिरावला असला तरी आजही मेंढपाळ गावोगावी आपला कबिला घेऊन भटकंती करताना दिसतोय. मान्सूनचा पाऊस …

Read More »

खालापूर तहसील कार्यालयात शुकशुकाट

खोपोली : प्रतिनिधी नवीन पेन्शन योजना रद्द करा इतर आर्थिक सेवा विषयक प्रश्न तात्काळ सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे खालापूर तहसील कार्यालयात बुधवारी (दि. 23)चिटपाखरूदेखील नव्हते. सरकारी निमसरकारी कर्मचार्‍यांनी लाक्षणीक संपाचा इशारा दिला होता, बुधवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात कर्मचार्‍यांनी काम बंद करून घोषणा दिल्या. कर्मचारी संपावर …

Read More »

थळ येथील आरसीएफ कंपनीत स्फोट

एक गंभीर जखमी तर दुसर्‍याला मानसिक धक्का अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) कंपनीच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये बुधवारी (दि. 23)सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. तर एका कर्मचार्‍याला मानसिक धक्का बसला आहे. …

Read More »

राज्य सरकारी कर्मचार्यांचे माणगाव तहसीलदारांना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने लाक्षणीक संप पुकारला होता. त्याला बुधवारी (दि. 23) माणगावातही प्रतिसाद मिळाला. समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली माणगावमधील राज्य सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले असून त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत तहसीलदार प्रियंका अयरे कांबळे …

Read More »

अस्मितेच्या लढाईसाठी आझाद मैदानात उपस्थित राहा

 सकल मराठा समाज राज्य समन्वयक विनोद साबळे यांचे आवाहन खोपोली, मोहोपाडा : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे येत्या शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाची ही अस्मितेची लढाई असून त्यात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समाज बांधवांनी  हजारोंच्या …

Read More »