Breaking News

Ramprahar Team

फणसाडमधील वणवे रोखण्यासाठी विहूर ग्रामस्थांचे श्रमदान

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षित रहावे, यासाठी विहूर ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करुन जंगल परिसरात वाढलेली झुडपे, सुके गवत, झाडाच्या सुक्या फांद्या, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. फणसाड अभयारण्य आगीपासून संरक्षीत रहावे, अभयारण्यातील वृक्ष, वन्यजीव, पक्षी यांचे अस्तित्व व सुरक्षितता टिकून रहावी यासाठी …

Read More »

सुधागडात कडधान्ये पिकाला साड्यांच्या कुंपणाचे संरक्षण

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात बहुतांश ठिकाणी कडधान्याची शेती केली जाते. या कडधान्य पिकाचे शेळी व गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताला साड्यांचे कुंपण करत आहेत. पाली-खोपोली मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात साड्यांचे  कुंपण लावलेली शेती आढळते. पक्क्या भिंतीचे किंवा लोखंडी जाळी व तारांचे कुंपण करणे परवडत नसल्याने सर्वसाधारणपणे …

Read More »

एक्स्प्रेस वेवरून टँकर कोसळला

दोन जण किरकोळ जखमी खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्यामुळे मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाणारा टँकर शुक्रवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास 50 फूट खाली जुन्या महामार्गावर कोसळला. सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बचावले असून, ते किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईकडे चाललेला टँकर बोरघाटातील  दत्तवाडीजवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी  झाले. …

Read More »

लोखंडी प्लेट तुटल्याने बंधार्यातील पाणी गेले वाहून

कर्जत बोरगाव येथील शेतकरी हवालदिल कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोश्री नदीवरील बोरगाव येथे याच वर्षी बांधलेल्या सिमेंट बंधार्‍यात भरपूर पाणी साठले होते, मात्र त्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट गुरुवारी (दि. 13) रात्री तुटल्या आणि बंधार्‍यातील सर्व पाणी वाहून गेले. या बंधार्‍याच्या पाण्यावर किमान 50 एकर जमिनीवर भाजीपाला शेती केली आहे. त्या …

Read More »

गोळेगणी येथे आंबापीक शेतीशाळा

होण्डा कंपनीतर्फे यांत्रिकीकरणाचे सादरीकरण पोलादपूर : प्रतिनिधी कृषी विभाग यांच्या वतीने आत्मा योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे आंबा पीक शेतीशाळा घेण्यात आली. त्याला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शेतीशाळेत होंडा कंपनीच्या शेतीविषयक विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांनी ऑॅनलाइन अर्ज करून अनुदानाचा …

Read More »

कर्जत-कल्याण राज्यमार्गाची डागडुजी करा

अन्यथा आंदोलन; भाजपचा इशारा कर्जत : बातमीदार तालुक्यातील  कर्जत-कल्याण राज्य महामार्ग अनेक ठिकाणी खराब झाला आहे. त्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षापूर्वी कर्जत-कल्याण राज्य महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम केले आहे. हा रस्ता …

Read More »

रायगडात देशी व विदेशी पाहुणे दाखल

हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक व पर्यटक सुखावले आहेत. सद्यस्थितीत सुमारे 22 ते 25 हजार किलोमीटरचा प्रवास करून अमुर ससाणे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दाखल झाले आहेत. पक्षी अभ्यासक राम मुंडे यांना या भागात जवळपास 30 ते …

Read More »

सुभाष भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांचा वाढदिवस मंगळवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथे नॅशनल हेल्थ कार्ड आणि ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, …

Read More »

उपमहापौर सीताताई पाटील यांनी स्वीकारला पदभार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीपदी अ‍ॅड. नरेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी हर्षधा उपाध्याय यांची निवड झाली. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि. 12) आपल्या दालनात पदग्रहण करून आपला पदभार स्वीकारला त्यानिमित्त महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते …

Read More »

मुर्बी गावात विकासकामांचे भूमीपूजन

नगरसेवक अभिमन्यू पाटील यांचा पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील मुर्बी गावात स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम व प्रतिक्षादालन कामांसाठी नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील यांनी पनवेल महापालिकेकडे पाठपुरावाकरून निधी मंजूर करून घेतला. त्या अनुषंगाने या कामांचे भूमीपूजन नुकतेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. माजी प्रभाग समिती सभापती व विद्यमान नगरसेवक …

Read More »