पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायतीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी नगरपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना व सदस्य पदांची आरक्षणाची सोडत शुक्रवारी (दि. 12) येथील भक्त निवासामध्ये काढण्यात आली. या वेळी नगरपंचायतीच्या 17 प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी 12 ते 16 …
Read More »मनसे अध्यक्ष राजेश तरे यांनी मुरूड आगारातील एसटी कर्मचार्यांची घेतली भेट
मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व एसटी कर्मचारी संपावर गेले असून, गुरुवारी पाचव्या दिवशीही त्याचा संप सुरूच आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कर्मचारी सेनेचे अध्यक्ष राजेश ग. तरे यांनी शुक्रवारी आपल्या सहकार्यांसमवेत मुरूड आगारातील संपकरी कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. …
Read More »केंद्राप्रमाणे राज्यानेही पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावेत
महाड भाजपची मागणी, तहसीलदारांना निवेदन सादर महाड : प्रतिनिधी वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढ टाकत पेट्रोल, डिझेलवरील करांमध्ये सुट दिली असून आता राज्य सरकारनेसुध्दा कर कमी करावेत, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) करण्यात आली. वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी …
Read More »द्रुतगती मार्गावर कारच्या धडकेत वृद्ध महिला जखमी
खोपोली : प्रतिनिधी नातीला उलटी झाली म्हणून तिचे डोके धरून उभ्या असलेल्या अश्विनी अशोक कदम (वय 64, रा. कुलाबा मुंबई) यांना पाठीमागून आलेल्या कारची जोरदार धडक बसली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या या अपघातात अश्विनी कदम गंभीर जखमी झाल्या आहेत. द्रुतगती मार्गावरून प्रवास करीत असताना अश्विनी कदम यांच्या नातीला मळमळ झाल्यासारखे …
Read More »पेणमध्ये गणेशमूर्तींचे राज्यस्तरीय प्रदर्शन
पेण : प्रतिनिधी येथील कुंभार आळीतील गणेशमूर्ती कारखानदार आणि श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी पेणमधील शासकीय क्रीडा संकुलच्या सभागृहात राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील निवडक शंभर मूर्तिकारांना या प्रदर्शनात आपल्या मूर्तीचे सादरीकरण करण्याची देण्यात आली आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे आणि करण …
Read More »मुरूडचे प्रभारी बीडीओ सुभाष वाणी यांनी पदभार स्वीकारला
मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी यांनी गुरुवारी (दि. 11) मुरूडच्या गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. या वेळी पंचायत समितीच्या सर्व कर्मचार्यांनी सुभाष वाणी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मुरूडचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील हे एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्याने त्या पदाचा कार्यभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी …
Read More »प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी प्रशासन सरसावले
अलिबाग : प्रतिनिधी एसटी कर्मचार्यांच्या संप काळात खाजगी वाहनचालक प्रवाशांकडून भरमसाठ भाडे आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. प्रवाशांची गैरसोय आणि लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एसटी, आरटीओ आणि पोलीस यांची पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके प्रवासी उचलण्याच्या महत्वाच्या ठिकाणी गस्त घालून खाजगी वाहतुकीवर नजर ठेवून आहेत. …
Read More »डिजिटल सातबारा आता घरोघरी!
भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गाव नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. जमिनीवरील प्रत्येक नोंद या सातबारा उतार्यावर केली जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीबरोबरच शेतकर्यांना पिक कर्ज, विमा योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी …
Read More »दिवाळी अंकांसंदर्भात चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त आलेल्या संकटांवर मात करत, खर्चाचा भारही सोसत दिवाळी अंकांची परंपरा जपली असल्याचा आनंद दिवाळी अंकांच्या संपादकांनी मनमोकळ्या गप्पा मारताना व्यक्त केला. दिवाळीच्या निमित्ताने 360 पनवेल टाइम्सचे संपादक व निर्माता गणेश कोळी व सुमंत नलावडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी अंकाच्या भूमिकेतील संपादक या चर्चासत्रात दिवाळी अंकांचे संपादकांनी …
Read More »नवी मुंबईत आता घरोघरी कोरोना प्रतिबंधक लसीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्या डोसचे लसीकरण वेगाने व्हावे याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेने हर घर दस्तक अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत घरोघरी भेटी देऊन लसीकरण राहिलेल्या नागरिकांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper