नवी मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील जलपरी या मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे हा तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना गुरुवारी (दि. 11) कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील …
Read More »खारघरच्या डोंगरावर वणवा; मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक
खारघर : प्रतिनिधी तळोजा कारागृहाशेजारी असलेल्या डोंगरावर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत शेकडो रोपटी जळून खाक झाली आहेत. खारघर सेक्टर 35 तळोजा कारागृहालगत असलेल्या डोंगरावर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून संगोपन करण्याचे काम करीत आहे. डोंगरावरील झाडांची हानी होवू नये म्हणून खारघर मधील पर्यावरण …
Read More »उरणच्या पाणथळ क्षेत्रात आगी लावण्याचे प्रकार?
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे येथील समुद्र किनार्यांचे काही समाज कंटकांनी पाणथळी जवळील व फ्लेमिंगा पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या गवताळ आणि झाडा-झुडपांना आग लावून येथील पक्ष्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील जैवविविधता आणि पक्ष्यांचे निवास धोक्यात आले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी या येथील गवताला आणि झाडा झुडपांना आग लावण्याचा …
Read More »मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ
नवी मुंबईत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ झालेली दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ताप थंडीची लक्षणे असलेले रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत मलेरियाचे 40 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी फक्त 26 रुग्ण होते. यामुळे …
Read More »शेवटाकडे वाटचाल?
डेल्टा प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रचंड वेगाने होणारा फैलाव, जगाच्या काही भागांमध्ये लोकांची लसीकरणाविषयीची उदासीनता आणि सध्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमार्फत मिळणारे अर्धवट कोरोना संरक्षण या सार्यांमुळे कोरोनाशून्य जग इतक्यात काही प्रत्यक्षात येणार नाही. तज्ज्ञांच्या मते, या महासाथीचा शेवट म्हणजे इतर अनेक साथरोगांप्रमाणेच आपण या साथरोगावरही प्रभावी नियंत्रण मिळवणे. म्हणजे कोरोना अस्तित्वात असेल, …
Read More »पनवेलमध्ये निराधार, विधवा महिलांना मदतीचा हात
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील श्री साई नारायणबाबा मंदिरातील श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातील निराधार व विधवा महिलांना गुरुवारी (दि. 11) धान्याचे वाटप करण्यात आले. या चॅरिटेबल ट्रस्टचे रामलाल चौधरी तसेच दुबई येथील नारायणबाबा भक्त अजुन आसवानी यांच्यामार्फत 140 महिलांना धान्याचे वाटप करण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या …
Read More »पनवेल महापालिकेच्या डॉक्टरांचा सन्मान
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाने दीड वर्षापासून सार्या जगाला हादरवून सोडले आहे. या महामारीच्या काळात पनवेल महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटूंबीयांची पर्वा न करता रात्रंदिवस काम केले. त्यांच्या या कामाचा सन्मान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातर्फे करण्यात आला. खारघर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या कार्यालयात मंगळवारी केंद्रीय औद्योगिक …
Read More »खांदा कॉलनी, खारघरमध्ये छट्पूजा उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन; भाजपतर्फे भाविकांसाठी उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात उत्तर भारतात छट्पर्व मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. त्यानिमित्त खांदा कॉलनी आणि खारघर येथे छट्पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध ठिकाणी भेट देऊन छट्पूजेचे …
Read More »उरणमध्ये सिडकोचा अनधिकृत बांधकांमांवर हातोडा
कारवाईदरम्यान एकाचा मृत्यू उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीमधील चारफाटा नवीन शेवादरम्यान सिडकोच्या जागेवर बेकायदेशीरपणे वसविण्यात आलेल्या सुमारे 60 टपर्या, गाळ्यांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने तोकड कारवाई केली. ह्या कारवाईदरम्यान एका ट्रकखाली आराम करीत असलेल्या एका व्यक्तीचा अपघात होऊन मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. उरण चारफाटा नवीन …
Read More »शेतकर्यांचे भात हमीभावाने खरेदी करा
भाजप किसान मोर्चाची मागणी; कर्जत तहसीलदारांना निवेदन कर्जत : रामप्रहर वृत्त कर्जत तालुक्यातील शेतकर्यांचे भात हमीभावाने खरेदी केंद्रावर खरेदी करा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कर्जत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकर्यांचे भात हमीभावाने कर्जत तालुक्यातील अनेक केंद्रावर खरेदी केली जाते. परंतु अनेक शेतकर्यांनी तकार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper