Breaking News

Ramprahar Team

कर्जतमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कर्जत : रामप्रहर वृत्त आर झुनझुंनवाला व लोटस फाऊंडेशन, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शास्त्रक्रिया आणि चष्मे वाटप गुरुवारी (दि. 11) आयोजित करण्यात आले होते.  भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील किरवली …

Read More »

राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांवर जुलमी कारवाई

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांची संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी शासनाने निलंबनाच्या कारवाईचा बडगा कर्मचार्‍यांवर उचलण्यात आला आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य …

Read More »

भास्कर पाटील यांच्या नाट्यपुस्तकांचे प्रकाशन

खारघर : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे मुळ रहिवाशी असलेले लेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांच्या निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या हस्ते झाले. भास्कर पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेले आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमध्येदेखील त्यांनी मागील अनेक …

Read More »

उरण ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा सोहळा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील उरण नागरिषद हद्दीतील श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण (बोरी-पाखाडी) यांच्या वतीने उरण ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा (दिंडी) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 10) या सोहळ्याला सकाळी 6 वाजता श्री साई मंदिर उरण (बोरी-पखाडी) येथून सुरुवात झाली. वैष्णवी हॉटेल, स्वामी विवेकानंद चौक, देऊळवाडी …

Read More »

नियोजनाअभावी नवी मुंबईत पाणीसंकट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पाण्याबाबत स्वयंपूर्ण व 24 तास पाणीपुरवठा असा लौकिक असलेल्या नवी मुंबईच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणी तुटवडा भासत आहे. महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील नियोजनाअभावी हे पाणी संकट निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नवी मुंबईला मोरबे धरणातून प्रतिदिन 450 तर एमआयडीसीकडून 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात …

Read More »

पनवेलच्या नवीन कोर्ट परिसरात वाहतूक कोंडीवर कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील नवीन कोर्ट परिसरात काही दुचाकी तसेच चारचाकी, रिक्षा आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन या भागातील रहिवाशांना नेहमीच त्रास झाला होता. या संदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रार करताच अशा प्रकारांच्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. नवीन कोर्ट …

Read More »

पालिकेतील भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करा

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेत वारंवार होणार्‍या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, अशी लेखी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.  आमदार म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेलापूर विभाग कार्यालयातील दोन अधिकारी व कोपरखैरणे विभाग …

Read More »

जासई-दादरपाडा रस्त्याचे काम अर्धवट

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील महत्त्वाचा असणारा जासई ते दादरपाडा  रस्ता सध्या अपूर्ण अवस्थेत असल्याने हा रस्ता पूर्ण कधी होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. कंत्राटदाराने रस्ता अर्धवट करूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जासई-दादरपाडा, …

Read More »

सुधागडात आरोग्यदायी कंदमुळांचे भरघोस उत्पादन

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. आदिवासी बांधव तालुक्यातील विविध ठिकाणी कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री  करताना दिसत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाव कमी मिळत असला तरी यातून आदिवासींना  चांगला रोजगार मिळत आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांशी …

Read More »

कर्जतमध्ये बालोत्सवाचा शुभारंभ

चिमुरड्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नांगुर्ले येथे शिबिर कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील बालकलाकारांना हक्काचं व्यासपीठ देणार्‍या उत्कर्ष इव्हेंट्स आयोजित बालोत्सव 2021 चा मंगळवारी (दि. 9) शुभारंभ करण्यात आला. हा बालोत्सव चार दिवस चालणार असून, त्याला चिमुरड्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बालोत्सवानिमित्ताने कर्जत तालुक्यातील नांगुर्ले येथील जुरासिक फार्ममध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  …

Read More »