Breaking News

Ramprahar Team

पुनर्वसनाचा अपयशी पॅटर्न आता केवनाळे, सुतारवाडीतही?

पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे येथे 22 जुलै 2021 रोजी दरड कोसळली. त्यात एकूण 11 जणांचे बळी गेले, आता तेथे पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येत आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  मतांची बेगमी करण्याचे राजकारण होऊ घातल्यास 2005च्या दरडग्रस्त कोतवाल अन् कोंढवी पुनर्वसनाचा अपयशी पॅटर्नची …

Read More »

धीर कसा धरायचा?

जो मराठवाडा अवघ्या महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई सोसणारा, दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या मराठवाड्यातील नद्यांना आलेला पूर आज ओसरताना दिसत नाही. धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती बिकट झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. धीर सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना केले आहे. पण सरकारी मदतीचा आजवरचा अनुभव लक्षात घेता शेतकर्‍यांनी कुणाच्या आधाराने …

Read More »

पालिका कार्यक्षेत्रात 44 हजार पोलिओ लसीकरण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रविवार (दि. 26) रोजी 0-5 वयोगटातील बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली. या वेळी 44 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 येथे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण …

Read More »

आता मराठवाडा संकटात

कोकणानंतर आता मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून गेल्या 14 दिवसांत औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर परिसरात पावसामुळे 35 जणांचा बळी गेल्याचे समजते. याखेरीज शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारकडून कुठलीही मदत मिळू शकेल, अशी आशाही लोकांना वाटेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड, तसेच कोकणवासीयांनाही अद्याप आवश्यक तितकी मदत …

Read More »

मुंबै बँकेच्या बदनामीविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल -आ. दरेकर

मुंबई : प्रतिनिधी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही 1200 कोटींच्या टप्प्यावरून 10 हजार कोटींवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुर्दैवाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बँकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट देईल, …

Read More »

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्यांची वीजतोडणी

वसुली कारवाईवर भाजपचे टीकास्त्र पनवेल ः रामप्रहर वृत्त वीज बिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. धनाढ्य वीज ग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणार्‍या ठाकरे …

Read More »

गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप

पनवेल : हुवेई कंपनीच्या वतीने आणि पनवेल पोलिसांच्या पुढाकाराने पनवेल परिसरातील 585 गरजवंत कुटुंबांना मदतीचा हात म्हणून शहरातील सिंधी पंचायत सभागृह, गोखले सभागृह व पळस्पे बिट परिसर येथे जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने अन्नधान्यासह कोरोना खबरदारीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, साबण, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटपही करण्यात आले. परिमंडळ …

Read More »

‘कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल’

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण विभागात कृषी पर्यटनाला मोठी संधी असून 40 कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ती पर्यटकांसाठी खुली केली आहेत. त्या माध्यमातून कोकणात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होईल, असे कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालनालयाच्या अधिनस्त असलेले …

Read More »

खारघरमधील रस्ते दुरुस्तीची संयुक्त सर्वेक्षण व्हावे

ब्रिजेश पटेल यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त येथील खराब रस्ते व पावसाळ्यात पडणारे प्रचंड खड्डे याबाबत कार्यकारी अभियंता तात्यासाहेब अहिरे यांना खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली खारघर, तळोजा मंडलातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भेटून निवेदन दिले. संयुक्त सर्वेक्षण झाल्यास निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा घातला जाईल, अशी …

Read More »

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा

उरण भाजपचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन उरण : प्रतिनिधी रस्ते वाहतूक करताना होणार्‍या अपघातासंदर्भात उरण तालुक्यातील पूर्व विभागाचे काही प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथे भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे अधिकारी ए. आर. सांगळे, सी. बी. बांगर यांच्यासमोर मांडून त्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. वाहतूक …

Read More »