Breaking News

Ramprahar Team

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करावा -विजय चिपळेकर

कामोठे : रामप्रहर वृत्त गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी पनवेल मनपा नगरसेवक विजय चिपळेकर आणि क प्रभाग समिती माजी सभापती नगरसेवक दिलीप पाटील यांनी कामोठे वॉर्ड ऑफिसर अरविंद पाटील यांच्यासोबत केली. या वेळी पर्यावरणपूरक विसर्जन सोहळ्यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था …

Read More »

गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना दिला परत

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलिसांनी विविध गुह्यांचा छडा लावून परत मिळविलेला सुमारे एक कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात 41 फिर्यादींना परत करण्यात आला. या वेळी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, अप्पर पोलीस आयुक्त महेश धुर्ये, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस …

Read More »

उरण नगर परिषद कर्मचार्यांनी केला निषेध

उरण : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर कार्तव्याची अंमलबजावणी करीत असताना सोमवारी (दि. 30) झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उरण नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी युनियनच्या वतीने एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे ठाणे शहरात …

Read More »

कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्याचा निषेध

पनवेल महापालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन; आयुक्तांना निवेदन पनवेल : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना फेरीवाल्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांना मंगळवारी निवेदन देण्यात …

Read More »

पालीमध्ये नाल्यात पडून दुचाकीस्वार जखमी

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली एसटी स्थानकाजवळील  स्लॅब फोडलेल्या नाल्यात पडून सोमवारी (दि. 30) एक दुचाकीस्वार जखमी झाला. अनेक महिन्यांपासून उघडा व धोकादायक स्थितीत असलेल्या या नाल्याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाली एसटी स्थानकात तुंबलेले सांडपाणी काढण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीने परिहन मंडळाच्या परवानगीने …

Read More »

शिघ्रे ग्रामपंचायत डम्पिंग ग्राऊंडच्या प्रतीक्षेत

घंटागाडी बंद असल्याने वेशीवर कचर्‍याचे साम्राज्य! मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीने घंटागाडी बंद केली असल्याने ग्रामस्थ गेल्या आठ महिन्यांपासून गावाच्या वेशीवरील गटारात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहेत. प्रशासनाने ग्रामपंचायतीला तातडीने डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.  पूर्वी शिघ्रे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात …

Read More »

आराम बस ट्रेलरला धडकली

एक्स्प्रेस वेवरील अपघातात अनेक प्रवासी जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी (दि. 30) सकाळी  पुण्याकडून मुंबईकडे जाणारी प्रवाशी आराम बस पुढे जात असलेल्या ट्रेलरला मागून धडकली. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून अनेक प्रवासी मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात …

Read More »

नेरळमध्ये मेडिकल स्टोअरला आग

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली कर्जत : बातमीदार नेरळ बाजारपेठेतील माऊली मेडिकल स्टोअरला रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील औषधांचा साठा व अन्य वस्तू मिळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. नेरळ मुख्य बाजापेठेतील शिवरत्न …

Read More »

अलिबागेत भाजपचे शंखनाद आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी कोरोना निर्बंधात राज्य सरकारने सुट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. मात्र मंदिरे अद्याप खुली झालेली नाहीत. राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपतर्फे सोमवारी (दि. 30) राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग येथेही श्री काशी विश्वेश्वर मंदिरासमोर घंटानाद व शंखनाद …

Read More »

माथेरानची हर्षा शिंदे ‘मिस हेरिटेज इंडिया’ची मानकरी

कर्जत : प्रतिनिधी भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या एंटरटेंन्मेंटने पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात माथेरान येथील हर्षा विनोद शिंदे (सध्या रा. महाबळेश्वर) ही मिस हेरिटेज इंडिया किताबाची मानकरी ठरली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तसेच अभिनेत्री हेमांगी कवी यांनी हर्षा हिला मिस हेरिटेज इंडियाचा मुकुट चढवून कौतुक केले. या …

Read More »