ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी विशिष्ट क्रीडा व्यवस्था अस्तित्वात असावी लागते. अमेरिका, चीन, जपान, रशिया आणि युरोपीय देशांमध्ये खेळाडू तयार करण्याचे अक्षरशः कारखाने उभे राहिले आहेत. उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा, खेळाडूंचे पालनपोषण, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पोटापाण्याची सोय, मार्गदर्शकांची नियुक्ती आणि त्यांच्या कामगिरीवरील देखरेख हे सारे डोळ्यात तेल घालून पाहणारी …
Read More »पनवेल शहरात मानाच्या नवनाथ सांप्रदायातील मंडळींकडून घरगुती पारंपरिक जन्माष्टमी उत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त येथे शहरात मानाच्या 10 ते 12 ठिकाणी नवनाथ संप्रदायातील मंडळींकडून घरगुती स्वरूपात मोठ्या उत्साहात पारंपरिक जन्माष्टमीच्या उत्सवाचे आयोजन केले जाते, मात्र यंदाचा हा उत्सव कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. पनवेल शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांपासूनची प्रथा आणि परंपरा आजही कायम आहे. पनवेलला सांस्कृतिक …
Read More »महाराष्ट्रात हा तर तालिबानी कारभार
भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची टीका मुंबई : प्रतिनिधी दहीदंडी पारंपरिक पद्धतीनेसुद्धा साजरी करणार्यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणार्या ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरू आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. आज दहीदंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि गर्दी न …
Read More »आंतरराज्य टोळीतील म्होरक्या गजाआड
फरार आरोपी शोधपथकाची कामगिरी खोपोली : प्रतिनिधी आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अनिल श्यामवेल गायकवाड (वय 55, रा. गोवा गल्ली, तेलगु कॉलनी, विजयनगर निवास चाळ, संभाजीनगर दौंड, ता. दौंड, जि. पुणे) याला नुकतेच राहत्या घरातून उचलून जेरबंद करण्याची मोठी कामगिरी फरार आरोपी शोधपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस शिपाई दीपक जाधव, …
Read More »सेवासमाप्तीमुळे संतप्त कंत्राटी कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांना वार्यावर सोडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे या कर्मचार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचार्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारून शासनाचा निषेध केला. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमलेल्या या कर्मचार्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांची भेट …
Read More »गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करावा -विजय चिपळेकर
कामोठे : रामप्रहर वृत्त गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी पनवेल मनपा नगरसेवक विजय चिपळेकर आणि क प्रभाग समिती माजी सभापती नगरसेवक दिलीप पाटील यांनी कामोठे वॉर्ड ऑफिसर अरविंद पाटील यांच्यासोबत केली. या वेळी पर्यावरणपूरक विसर्जन सोहळ्यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था …
Read More »गुन्ह्यांत हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना दिला परत
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलिसांनी विविध गुह्यांचा छडा लावून परत मिळविलेला सुमारे एक कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात 41 फिर्यादींना परत करण्यात आला. या वेळी पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, अप्पर पोलीस आयुक्त महेश धुर्ये, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस …
Read More »उरण नगर परिषद कर्मचार्यांनी केला निषेध
उरण : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर कार्तव्याची अंमलबजावणी करीत असताना सोमवारी (दि. 30) झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उरण नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी युनियनच्या वतीने एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे ठाणे शहरात …
Read More »कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्याचा निषेध
पनवेल महापालिका कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन; आयुक्तांना निवेदन पनवेल : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना फेरीवाल्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांना मंगळवारी निवेदन देण्यात …
Read More »पालीमध्ये नाल्यात पडून दुचाकीस्वार जखमी
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली एसटी स्थानकाजवळील स्लॅब फोडलेल्या नाल्यात पडून सोमवारी (दि. 30) एक दुचाकीस्वार जखमी झाला. अनेक महिन्यांपासून उघडा व धोकादायक स्थितीत असलेल्या या नाल्याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाली एसटी स्थानकात तुंबलेले सांडपाणी काढण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीने परिहन मंडळाच्या परवानगीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper