Breaking News

Ramprahar Team

हायमास्ट लाईट बसविण्याची मागणी

कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली-कामोठे जोड रस्ता व कळंबोलीतील सिंग सिटी हॉस्पिटल येथे हायमास्ट लाईट बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप शहर चिटणीस संतोष गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी बेलापूर येथील सिडको भवनच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गायकवाड …

Read More »

रस्ते डागडुजीच्या कामास सुरुवात

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 18मध्ये बर्‍याच ठिकाणी रस्त्यावरील ड्रेनेज झाकणांच्या बाजूला असलेल्या सिमेंट मटेरियल वाहून गेल्यामुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्ता ही खराब झाला होता. खड्ड्यांमुळे रहदारीलादेखील अडथळा होत होता. पावसाने उसंत घेतल्यामुळे हे सर्व खड्डे बुजवण्याच्या व डागडुजीच्या कामाला …

Read More »

उरणमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीचीही दुरवस्था

उरण : प्रतिनिधी उरण तहसिल कार्यालय आणि पोलीस ठाण्यालागत असलेली इमारत खंडर बनली आहे. त्यामुळे तिथे सापांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणार्‍या जनतेच्या आणि कार्यालयामधील कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली असणार्‍या तहसिल कार्यालगत असणार्‍या इमारतीमध्ये यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे कामकाज सुरू होते.  अनेक वर्षांपासून कार्यालयाचे …

Read More »

मोरा सागरी पोलीस ठाण्याची इमारत भग्नावस्थेत

नवीन बांधकाम उद्घाटना अगोदरच समस्यांनी ग्रासले उरण : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनाअगोदरच भग्नावस्थेत पडून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे 85 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत खराब झाली आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला 85 लाखांचा निधी वाया …

Read More »

मुरूड ग्रामीण रुग्णालयास मास्क वाटप

मुरूड : प्रतिनिधी मुंबईतील पार्थ फाउंडेशन तर्फे मंगळवारी (दि. 24) मुरूड ग्रामीण रुग्णालयास मास्कचे वाटप करण्यात आले. रुग्णालयातील डॉ. दिव्या सोनम यांनी मास्क स्वीकारले या वेळी कर्मचारीसुद्धा उपस्थित होते. एकदरा ग्रामपंचायत, भंडारी युवक संघ व शहरातील सर्व दुकानदारांनासुद्धा पार्थ फाउंडेशनने मोफत मास्क वाटप केले असल्याची माहिती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अजित …

Read More »

ठाकरे सरकारची दंडेल शाही

केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल महाड : प्रतिनिधी कोकणात जनआशीर्वाद यात्रा यशस्वी होत असताना या यात्रेला खिळ बसावी म्हणून महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जन आशीर्वाद यात्रेला …

Read More »

जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे नवीन रुग्णालय आता डोलवी येथे खुले

अलिबाग : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू फाउंडेशनने डोलवी (ता. पेण) येथे  नवीन 73 खाटांचे जेएसडब्ल्यू संजीवनी मल्टीस्पेशियलिटी हॉस्पिटल उभारले आहे. त्याचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेला सुलभ आणि परवडणार्‍या गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदल यांनी या वेळी केले.   डोलवी …

Read More »

विविध मागण्यांसाठी महावितरणचे अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर

स्टाफ सेटअप धोरणामुळे बेरोजगारीची भीती पेण : प्रतिनिधी महावितरणच्या वीज निर्मिती, पारेषण व वितरण या विभागात काम करणार्‍या अभियंत्यांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत उदासीन असलेल्या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी या तिन्ही विभागातील अभियंते 6 सप्टेंबरपासून संपावर जाणार असल्याची माहिती सब ऑड्रीनेट संघटनेचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी …

Read More »

पेण तर्फे तळे ग्रामस्थांना मिळणार फिल्टरयुक्त पाणी

माणगाव : प्रतिनिधी ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेत फिल्टर प्लांट बसविला आहे. त्याचे लोकार्पण नुकतेच सरपंच, उपसरपंच, गाव कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी आणि पेण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पेण तर्फे तळे ग्रुपग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग निधी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून …

Read More »

विना सहकार, नही उद्धार!

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हा संत तुकारामांचा संदेश आणि सहकाराचं ब्रीदवाक्य असलेलं विना सहकार, नही उद्धार या दोन्हीत एकच साम्य आहे, ते म्हणजे सहकार – सेवाभाव. मात्र, आज मागे वळून पाहिलं तर हा सेवाभाव कमी झालाय. काही अपवाद वगळता सहकाराच्या नावाखाली स्वाहाकारच वाढलायं. सहकारात राजकारण आलं, सत्तेत स्पर्धा, …

Read More »