Breaking News

Ramprahar Team

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांनी केले अनाथ मुलांना साहित्यवाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या माध्यमातून आईवडिलांविना वाढणार्‍या अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. हे वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) करण्यात आले. या भेटवस्तू देण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही …

Read More »

मुंबईचे जुहू बीच जवानांनी केले चकाचक

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या जुहू बीचवर ‘सीआयएसएफ’ व ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविली. या स्वच्छता अभियानात मुंबईमधील ‘सीआयएसएफ’ युनिटचे 704 जवान व ‘सीआरपीएफ’चे 200  जवान सहभागी झाले होते. या सर्वांनी जुहू बीचची साफसफाई केली. ही मोहीम मुंबईच्या आयपीएस ‘सीआयएसएफ’च्या महानिरीक्षक मीनाक्षी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कार्यक्रमाला …

Read More »

रोह्यात लाकडी घराला आग

रोहा ः प्रतिनिधी शहरातील आडवी बाजारपेठेतील रजनीशेठ शहा यांचे जुन्या लाकडी घराला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली असून ही आग विझविण्यासाठी धाटाव एमआयडीसी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग रात्री उशीरापर्यंत आटोक्यात आणली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. आगीचे लोळ …

Read More »

नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी साईचरण म्हात्रे यांची नियुक्ती

पनवेल ः नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी साईचरण म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी साईचरण म्हात्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्गुण कवळे, जयंत पाटील, राजेश पाटील, सुरज ठाकूर, संदीप म्हात्रे यांच्यासह …

Read More »

चांगू काना ठाकूर विद्यालयात प्रदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयात शनिवारी (दि. 7) ’विज्ञानयत्री’ अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा यामागचा उद्देश आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी विद्यार्थिनी डॉ. प्रियांका गोगटे …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात स्वच्छता मोहीम

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे प्लास्टिक जागरूकता आणि स्वच्छता मोहीम शनिवारी (दि. 7)  राबविण्यात आली. एनसीसी विभागातर्फे खांदा कॉलनी, नवीन पनवेल तसेच खांदेश्वर रेल्वेस्टेशन परिसरात ही मोहीम यशस्विरीत्या राबविली. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कला शाखा व …

Read More »

शासकीय कार्यालयांना जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट

श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर सुदुंबरे संस्थेचा उपक्रम पनवेल : वार्ताहर पनवेलमधील जय संताजी तेली समाज मंडळ, श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर सुदुंबरे संस्था, महा. प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यालयांना संताजी महाराज जगनाडे यांची आकर्षक प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. …

Read More »

वीजचोरी करणार्यांविरोधात गुन्हे भरारी पथकाची तळोजात कारवाई

पनवेल ः बातमीदार  महावितरणच्या वाशी आणि कल्याण येथील भरारी पथकाने तळोजा गावात एका दिवसामध्ये विविध ठिकाणी धाड टाकून घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणार्‍या सात ग्राहकांवर कारवाई केली आहे. या ग्राहकांनी महावितरणच्या हजारो युनिटच्या विजेची चोरी करून महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे …

Read More »

अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आरोपींच्या वकिलांना आठ हजारांचा दंड

पनवेल ः बातमीदार अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात शुक्रवारी (दि. 6) झालेल्या सुनावणीत आरोपीचे वकील अ‍ॅड. भानुशाली गैरहजर राहिल्याने आरोपीच्या वकीलांनी पुढील तारीख मागितली, मात्र विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी आक्षेप घेऊन साक्षीदार हे साक्ष देण्यासाठी चेन्नईवरून येत असून त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास …

Read More »

रूळ ओलांडणार्यांनो सावधान!

पनवेल रेल्वेस्थानकात रूळ ओलांडून थेट मृत्यूलाच आमंत्रण पनवेल ः बातमीदार पनवेल रेल्वेस्थानकावरून हजारो प्रवासी दिवसभरात इच्छित ठिकाणी प्रवास करत असतात, मात्र घाईघाईत गाडी पकडण्याच्या नादात वा शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वे रूळ ओलांडणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे असे प्रवासी स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीत …

Read More »