Breaking News

Ramprahar Team

वनवासी बंधु-भगिनींसोबत कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त रा.स्व. संघ व जनहित संवर्धक मंडळ, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ऑक्टोबर रोजी वनवासींच्या सोबत एकत्र फराळ कार्यक्रम घेण्यात आला. पनवेल शहरातील तरुणाई व संघ कार्यकर्ते असे अंदाजे 79 जण आपल्याला घरातून फराळ घेऊन वेगवेगळ्या 5 वनवासी पाड्यांवर पोहोचले (भल्याची वाडी, बेलवाडी, आवळीचा मळा, फणसवाडी, करंबेळी) …

Read More »

युरोपियन शिष्टमंडळ काश्मीरमध्ये

पंतप्रधान मोदींची घेतली भेट नवी दिल्ली : वृत्तसंस्था युरोपियन संघ (ईयू)चं संसदीय प्रतिनिधीमंडळ मंगळवारी (दि. 29) काश्मीर दौरा करण्यासाठी रवाना झाले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादं परदेशी शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये पाहणी करणार आहे. 21 जणांचं हे शिष्टमंडळ दिल्लीहून काश्मीरला रवाना झालंय. 11 वाजेच्या दरम्यान हे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल : सलग तिसर्‍यांदा विजय साकारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विविध मान्यवरांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.

Read More »

अलिबाग-मुरूड रस्त्यावरील खड्डे शेकापला भोवले

अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येत आहे, परंतु 2019 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही शेकाप विरुद्ध शिवसेना यांच्यात होऊन इतर …

Read More »

सोने चमकतच आहे

जगातील अनेक विकसित देश अमेरिकन डॉलरसाठी पर्याय निवडण्याच्या प्रयत्नात आहेत, सोन्याच्या भावात इतकी तेजी येण्याचे हे एक कारण आहे. त्याव्यतिरिक्त सोन्याच्या किमती वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारीयुद्धातही आहे. त्यामुळे जागतिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी हाच गुंतवणूकदारांना योग्य पर्याय वाटतो आहे. …

Read More »

चोरीला गेलेले दागिने मिळाले परत

पाली ः प्रतिनिधी बहुतांश वेळेला चोरीला गेलेल्या ऐवजावर अनेकांना पाणी सोडावे लागते. मात्र सुधागड तालुक्यातील पाली येथील विशाल शिंदे यांच्या घरातील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे  मिळाला. आपल्या चोरीला गेलेल्या दागिन्यांवर पाणी सोडून दिलेल्या विशाल शिंदे यांना सुखद अनुभव  मिळाला आहे. विशाल नामदेव शिंदे (रा. हरिओम वास्तू सोसायटी, समर्थ नगर …

Read More »

मुरूड वाचनालयातर्फे दिवाळी पहाट

मुरुड ः प्रतिनिधी  येथील सार्वजनिक वाचनालय आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अनिल कारभारी यांच्या हस्ते झाले. ही दिवाळी पहाट मैफल रंगली. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी उपाध्यक्ष केदार गद्रे, कार्यवाह विनय मथुरे, संस्कृती समिती अध्यक्ष अस्मिता पेंडसे, नितीन पाटील, निवास रसाळ, ग्रंथपाल संजय भायदे, ज्येष्ठ गायक रवींद्र …

Read More »

मानवाधिकार संघटनेकडून पालिका सफाई कामगारांना फराळ वाटप

मुरुड जंजिरा ः वार्ताहर             मुरुड नगर पारिषदेतील सफाई कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मानवाधिकार संघटनेकडून दिवाळी फराळ व त्यांच्या मुलांसाठी वही, पेन अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप नगरपरिषद आवारात रविवारी (दि.27)करण्यात आले. मुरुड शहराची स्वछता अबाधित राखण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असतात. अत्यंत तुटपुंज्या पगारात शहराची स्वछता राखण्याचे ते काम करीत असल्याने यंदा सफाई …

Read More »

नागोठण्यात अभिनंदनाचा फलक फाडला

नागोठणे : प्रतिनिधी भाजपचे नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील यांचे अभिनंदन करणारा बॅनर शनिवारी (दि. 26) रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. आमदार रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक व येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फरमान दफेदार यांनी उर्दू हायस्कूलनजिक रविशेठ यांचे अभिनंदन करणारा हा बॅनर लावला होता …

Read More »

कर्जतचा गड जिंकल्याचा अभिमान -उद्धव ठाकरे

आ. महेंद्र थोरवे यांनी घेतली ‘मातोश्री’वर भेट कर्जत ः बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिद्ध झाले असून शिवसैनिकांचा विश्वास संपादन करून विजय मिळविला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे कौतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झालेले आमदार …

Read More »