रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकाप विरुद्ध काँग्रेस अशाच व्हायच्या. या जिल्ह्यात भाजपचा जिल्हा परिषद सदस्यदेखील निवडून येत नव्हता, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), रवी पाटील (पेण) हे दोन आमदार निवडून आले. अपक्ष म्हणून …
Read More »शेतकर्यांना आधाराची गरज
राज्याच्या निरनिराळ्या भागांत ऐन दिवाळीच्या काळात शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणा नव्याने सरकार स्थापनेच्या औपचारिकतेकरिता खोळंबलेली आहे. दिवाळी हा खरे तर आनंदाचा, चैतन्य जागवणारा सण. महाराष्ट्रात या सणाला अगदी गोरगरिबांच्या दारी सुद्धा मिणमिळती का होईना पणती तेवताना दिसते. …
Read More »खालापुरातील विप्रास गोराडिया कारखाना तडकाफडकी बंद
250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड खोपोली ़: प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत असणारी विप्रास गोराडिया पोलाद उत्पादन करणारी कंपनी दिवाळी सणाच्या तोंडावरच तडकाफडकी बंद करण्यात आली. त्यामुळे सुमारे 250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. विप्रास गोराडिया कारखाना गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. या कारखान्याने 2004 पासून वीजबिल भरले नाही. त्यामुळे …
Read More »जंजिरा किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत
मुरूड : प्रतिनिधी सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मुरूड तालुका प्रवासी संघटनेच्या प्रयत्नाने किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक मुरूडला येतात. चारही बाजूने समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने …
Read More »खारभूमी कार्यालयावर संजय जांभळे यांची धडक
अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे संताप व्यक्त; कारवाईची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील आमटेम येथील खारबंदिस्तीच्या कामाची बिले शेतकर्यांना अजून का अदा केली नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी बुधवारी (दि. 30) पेणमधील खारभूमी कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे …
Read More »विळे-भागाड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी
नागरिकांची मागणी माणगाव : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडी, रोहा तालुक्यातील धाटाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. नव्याने निर्माण होणार्या विळे-भागाड औद्योगिक क्षेत्राला सुरक्षा देण्याच्या दृष्टीने तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील यांच्या सुनेचे आत्मचरित्र काळजाला भिडणारे -सिंधूताई सपकाळ
कर्जत : बातमीदार हुतात्मा हिराजी पाटील यांनी 28व्या वर्षी देशासाठी शहीद होऊन केलेले काम न विसारण्याजोगे आहे. हा इतिहास जिवंत करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी जो प्रयत्न केला आहे, तो काळजाचा ठोका चुकविणारा आहे. त्यामुळे त्यांना आपला सलाम आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी काढले. हुतात्मा हिराजी पाटील आणि जानकीबाई …
Read More »ओला दुष्काळ जाहीर करावा
सुधागड तालुका मराठा समाज संस्थेची मागणी पाली : प्रतिनिधी परतीच्या पावसाने हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. 30) पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना …
Read More »कुष्ठरोग बांधवांबरोबर साजरी केली दिवाळी
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त दिवाळी निमित्ताने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने येथील रेल्वे स्थानका जवळील कृष्ठरोग वसाहतीमधील बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सल्लागार माधवराव पाटील, प्रवीण मोहकर, राजू गाडे, श्री गणेश कुष्ठररोग वसाहत सेवा संस्थेचे अध्यक्ष …
Read More »नवीन पनवेल येथे रंगली दिवाळी पहाट
पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ आणि उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्यावतीने सोमवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे नवीन पनवेल येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper