Breaking News

Ramprahar Team

वृक्षलागवडीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे- बीडीओ एन. प्रभे

माणगाव ः प्रतिनिधी वृक्षलागवडीत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. प्रभे यांनी केले. तळेगावतर्फे गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणार्‍या रेपोली राजिप. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पं. स. कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, श्री. कटरे, …

Read More »

उमरोली येथील मातीच्या बंधार्याला पुन्हा गळती

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली गावाच्या मागे असलेला मातीच बंधारा सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून फुटून गेला आहे. गतवर्षी देखील या बंधार्‍याचे पाणी सांडव्याऐवजी अन्य भागातून बाहेर पडल्याने स्थानिक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. उमरोली गावाच्या मागे वन क्षेत्र जमिनीजवळ मातीचा बंधारा आहे. त्या बंधार्‍यात स्थानिक ग्रामस्थ गणेश विसर्जन करीत …

Read More »

मुरूडमध्ये महावितरणकडून दुरूस्ती सुरू

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड बाजारपेठ येथील पाडगे डेअरीजवळ असणारा विद्युत पोल व नगर परिषदेची पाण्याची टाकी येथे असणारा पोल नादुरूस्त झाल्याने नागरिकांसाठी धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने घेऊन दुरूस्ती काम …

Read More »

निजामपुरात घरफोडी; पाच हजारांची रक्कम लंपास

आणखी पाचघरे फोडली माणगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील निजामपूर गावातील शिर्की आळीत अज्ञात चोरट्याने घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरली, तसेच अन्य पाच लोकांचे गोडाऊनच्या घराचा कडीकोयंढा तोडून चोरी केली.  याबाबतची फिर्याद जनार्दन दगडू मोरे रा.निजामपूर शिर्की आळी  यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी जनार्दन मोरे यांच्या घराच्या …

Read More »

सततच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान

अनेक ठिकाणी रोपे कुजली; शेतकरी हवालदिल कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या कडेला असलेल्या भागातील शेतीमध्ये सलग पाच-सहा दिवस पाणी साचून राहिले आणि त्यामुळे रोपे कुजली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या संकटात भर पडली आहे. मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दुबार …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावाचा निर्णय

भाजपतर्फे आभार आणि जल्लोष पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी (दि. 16) मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे, त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी …

Read More »

मोरबे धरणात यंदा कमी पाणीसाठा

पूर्ण भरण्यासाठी 2300 मिमी पावसाची आवश्यकता नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जून महिना कोरडा गेल्याने नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणाची पाणी पातळी खालावली होती, मात्र मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण पातळी चांगलीच वाढली आहे. धरणात आतापर्यंत 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी …

Read More »

पावसाचा फटका भाजीपाल्याला; भाज्यांचे दर गडगडले

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. एपीएमसीमध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे. यामुळे जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेला टोमॅटो आता 20 ते …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील पडलेली झाडे बाजूला

गाढी नदीकाठीही बांधले दोरखंड पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे महापालिकेच्या अग्निशमन दल तसेच प्रभाग समितीच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने काढण्यात आली. गाढी नदी काठाला लागून असलेले पटेल मोहल्ला, भारत नगर झोपटपट्टी, कोळीवाडा गाढी नदी पुलावर सुरक्षिततेसाठी पालिका कर्मचारी तसेच कोळी बांधवांच्या साहाय्याने दोरखंड बांधण्यात आले आहेत. …

Read More »

पनवेलमध्ये भजनी भक्तिरंग कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात गुरूपौर्णिमेनिमित्त भक्तिरंग कार्यक्रमाचे बुधवारी (दि.13) आयोजन केले होते. दत्ता ढोले यांनी सादर केलेल्या श्री दत्तगुरू स्तवन स्तोत्राने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रथेप्रमाणे आठवड्यांतील सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. उपाध्यक्षा माधुरी गोसावी यांनी पर्जन्य सहलीबाबत माहिती दिली. त्यानंतर संघाच्या भजनी महिला मंडळाचे …

Read More »