आरडीसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणार : अनंत गीते; उमेदवारी अर्ज दाखल अलिबाग : प्रतिनिधी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील जरा जास्तच बोलत आहेत. त्यांनी आपली बुद्धी गहाण ठेवली आहे, ते भ्रष्टाचाराच्या भस्मासूरला मोठा करत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याकडे बघावे लागेल. आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवून त्यांना धडा …
Read More »शेकाप माझा कट्टर वैरी : रवीशेठ पाटील
नागोठणे : राजू भिसे रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा माझा कट्टर वैरी असून, काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने शेकापशी आघाडी करण्याचा प्रयत्न करीत होते, त्याला माझा ठामपणे विरोध होता. त्यामुळेच मी काँग्रेस सोडून भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी झालो, असे ठाम प्रतिपादन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी ‘रामप्रहर’शी विशेष मुलाखत देताना …
Read More »रामवाडीत महामार्गावर मेगा ब्लॉक
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण-रामवाडी येथील रेल्वे लाईनवर मेगा ब्लॉक करण्यात आल्याने वाहतूक सलग दुसर्या दिवशी गुरुवारी (दि.28) दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने पेण ते वडखळ तसेच तरणखोप गावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे बर्याच ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदला आहे. तर मोठ्या …
Read More »सानियाने पाच महिन्यांत केले 22 किलो वजन कमी
मुंबई : प्रतिनिधी तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर याबाबतीत टेनिसस्टार सानिया मिर्झाकडून टीप्स घेऊ शकता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार, सानियाने गरोदरपणानंतर केवळ पाच महिन्यांमध्येच 22 किलो …
Read More »मुंबईच्या संघात जोसेफ अल्झारीची इंट्री
मुंबई : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील अभियानाची सुरुवात पराभवाने झाली आहे. एकीकडे स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळेही मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. दरम्यान, दुखापतग्रस्त झालेला वेगवाग गोलंदाज अॅडम मिलने याच्याजागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबई इंडियन्सच्या संघात …
Read More »मायामी ओपन टेनिस स्पर्धेतून जोकोविच बाद
मायामी : वृत्तसंस्था अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविचचे विक्रमी सातव्यांदा मायामी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. त्याला पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत 22व्या सीडेड रोबेर्टो बटिस्टा अगुटकडून पराभव पत्करावा लागला. पहिला सेट सहज गमावूनही अगुटने चिवट लढा देत ही लढत जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत …
Read More »पाकच्या वर्ल्डकप तयारीवर इम्रान खान नाराज
कराची : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या पुढे असणार्या अडचणी दिवसागणिक वाढत असताना त्यात आता नव्याने आणखी एक भर पडली आहे. ज्यामुळे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही नाराज असल्याचं कळत आहे. येत्या काळात इंग्लंडमध्ये होणार्या क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाची सुरू असणारी तयारी पाहता खान यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे …
Read More »कोलकाताचा पंजाबवर 28 धावांनी विजय
कोलकाता : वृत्तसंस्था आंद्रे रसेलच्या धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 218 धावा करता आल्या. कोलकात्याकडून रॉबिन उथप्पा आणि नितिश राणा यांनी अर्धशतके झळकावली होती. रसेलने या वेळी 17 चेंडूंत …
Read More »युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज अलिबागेत
अलिबाग : लोकसभेच्या तिसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार (दि. 28)पासून सुरुवात होत असून, शिवसेना, भाजप व मित्रपक्ष युतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अनंत गीते यांनी पहिल्याच दिवशी मुहूर्त साधला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गीते आपला अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेना …
Read More »नाविद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद यांनी बुधवारी (दि. 27) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून, तसेच भगवा देत त्यांचे स्वागत केले. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper