माथेरान : वार्ताहर नॅशनल इंड्युरन्स चॅम्पियनशीपच्या माध्यमातून नुकताच लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या अश्वशर्यतीत माथेरानमधील घोड्यांनी अव्वलस्थान प्राप्त केले. दरवर्षी लोणावळा येथे अश्वशर्यत आयोजित करण्यात येते. देशभरातील नामवंत घोडे यामध्ये सहभागी होत असतात. यंदा प्रथमच माथेरानमधील व्यावसायिक घोडे या स्पर्धेत सहभागी झाले होते. नैसर्गिक वातावरणात स्वच्छ व शुद्ध हवेत हे …
Read More »स्मृती मानधनाकडे टी-20चे नेतृत्व
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कर्णधारपदी या वेळी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने 4, 7, 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत. भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद …
Read More »बुमराने केली उमेशची पाठराखण
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला गोलंदाज उमेश यादवची पाठराखण केली आहे. एखाद्या दिवशी अंतिम षटकातील गोलंदाजीची रणनीती अपयशी ठरते, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात अखेरच्या षटकात उमेशला 14 धावांचा बचाव करता आला नाही. बुमराने 19व्या षटकात शानदार गोलंदाजी करताना केवळ दोन धावा दिल्या …
Read More »महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात तिसर्या विजयाची नोंद केली. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 124 धावांचे आव्हान उभे केले. यात रोहित रायुडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 34 चेंडूंत …
Read More »आंद्रे रसेलचे विंडीज संघात पुनरागमन
सेंट जॉर्जस ग्रेनाडा : वृत्तसंस्था आंद्रे रसेल वेस्ट इंडिज संघात परतला आहे. 2015 ते 2018 या कालावधीत केवळ एकच वन डे सामना खेळलेल्या रसेलला विंडीजने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यासाठी संघात समावेश केला आहे. दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी रसेलला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू रसेल हा संघासाठी महत्त्वाची …
Read More »मुरूडमध्ये घुमणार कबड्डीचा दम!
मुरूड : प्रतिनिधी श्री काळभैरव क्रीडा मंडळ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. श्री काळभैरव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मैदानात 28 फेब्रुवारी रोजी होणार्या या स्पर्धेत पुरुष गटात 32 संघांना; तर महिला गटात आठ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. …
Read More »मँचेस्टर सिटीने विजेतेपद राखले
लीग चषक फुटबॉल स्पर्धेत चेल्सीला नमवले लंडन : वृत्तसंस्था मँचेस्टर सिटीने चेल्सीचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले, मात्र या सामन्याला चेल्सीचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी आणि गोलरक्षक केपा अरिझाबालागा यांच्यातील वादाचे गालबोट लागले. मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक एडरसन याने शूटआऊटमध्ये जॉर्गिन्हो आणि डेव्हिड लुइस …
Read More »शिरवली ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले
भाजपच्या रखमाबाई बोंडे सरपंचपदी पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक वर्षांपासून शिरवली ग्रामपंचायतीवर असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून दणदणीत विजय साकारला आहे. शिरवलीत भाजपच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे, तसेच सदस्यपदाच्या आठ उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत शेकापचा दारुण पराभव केला. शिरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल …
Read More »राष्ट्रीय समर स्मारकाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय समर स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) करण्यात आले. या वेळी त्यांनी देशाचे सैन्य व शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली; तर काँग्रेस विशेषत: नेहरू-गांधी परिवारावर हल्लाबोल केला.
Read More »खूशखबर! यंदा मान्सून उत्तम; दुष्काळाची शक्यता नाही
नवी दिल्ली : देशातील शेतकर्यांसाठी खूशखबर आहे. गेल्या वर्षी मान्सूनने ओढ दिल्याने यंदा राज्यासह देशात दुष्काळाचे सावट असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, परंतु यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तवला आहे. 2019-20साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवताना ‘स्कायमेट’ने यावर्षी 96 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper