कल्याण ः प्रतिनिधी : गस्तीदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. रवी दाढीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोळशेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना विजयनगरसमोरील मैदानात रवी दाढी हा …
Read More »950 वर्षांपूर्वीचा जैन शिलालेख सापडला
सांगली ः प्रतिनिधी : जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे 950 वर्षांपूर्वीचा शिलालेख खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापार्यांनी करून या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा …
Read More »‘बीएसएनएल’मध्ये कामगार कपातीचा निर्णय
54,451 कर्मचार्यांना फ टका नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या ‘बीएसएनएल’ला रुळावर आणण्यासाठी ‘बीएसएनएल’ने त्यांच्या कर्मचार्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचार्यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षांची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच ‘बीएसएनएल’ने तयार केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी देताच या प्रस्तावानुसार सुमारे 54 …
Read More »पत्नीबरोबर संभोग करणे पतीचा मूलभूत अधिकार; न्यायालयाचा निर्णय
लंडन ः वृत्तसंस्था : लंडनमधील एका न्यायालयाने एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडन यांनी कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या …
Read More »राहुलजी, अमेठीच्या विकासाचे काय?
भाजप नेत्या स्मृती इराणींचा खडा सवाल अमेठी ः वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी वायनाडच्या लोकांना सावध करत राहुल यांनी अमेठीत विकासकामे केली नसल्याचा आरोप …
Read More »वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना पुरेसे निवृत्तीवेतन
जिल्हाधिकार्यांकडून तातडीने दखल अलिबाग : जिमाका : माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून, सोमवारी तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे त्यांच्या माहेरी जाऊन वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. वीरपत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या …
Read More »भाजपच्या तालुका कार्यालय चिटणीसपदी परशुराम म्हसे
कर्जत : बातमीदार : भाजपच्या कर्जत तालुका कार्यालयीन चिटणीसपदी कळंब भागातील कार्यकर्ते परशुराम म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हसे यांना नियुक्तीपत्र दिले. भाजपच्या कर्जत मंडल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक …
Read More »उल्हास नदीचे प्रदूषण रोखणार
कर्जत नगर परिषद सांडपाण्यावर प्रक्रिया करणार कडाव : प्रतिनिधी : कर्जत शहरातील मुख्य नाल्याचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येते आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरातील मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम सुरू असून, नदीत सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे नदीत सोडल्या जाणार्या …
Read More »रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा
नेरळ ग्रामपंचायतीची मागणी कर्जत : बातमीदार : रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे करीत आहे. एमएमआरडीएच्या निधीमधून या रस्त्याची कामे करताना ग्रामस्थांची कामे अर्धवट ठेवली आहेत, ती कामे पूर्ण करावीत, यासाठी नेरळ ग्रामपंचायतने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नेरळ …
Read More »दोन भावांमधील जमिनीच्या वादात तिसर्याचा बळी
अलिबाग : प्रतिनिधी : दोन सख्ख्या भावांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून भावाने भावाला मारण्याची सुपारी दिली, परंतु मारेकर्यांनी केलेल्या गोळीबारात तिसर्याचाच बळी गेला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. सागर पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे, तर गौरव भगत गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्रचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper