Breaking News

Pravin Gaikar

प्रचाराचा सोशल फंडा

लोकसभा महासंग्रामाच्या निमित्ताने राजकीय रण तापू लागले असताना उष्णतेचा पाराही चढू लागला आहे. तापमान चाळीशीच्या वर जाऊ लागल्याने प्रचार करताना सर्वच राजकीय पक्षांची कसरत होताना दिसते. अशा वेळी घरबसल्या एका क्लिकवर किंवा अगदी बोटाद्वारे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. हे शक्य झाले आहे समाजमाध्यमे अर्थात सोशल नेटवर्किंग साईट्समुळे. काळ …

Read More »

खारघरमधून 15 वर्षीय मुलीचे अपहरण

वडिलांची पोलीस ठाण्यात धाव पनवेल ः बातमीदार : खारघर सेक्टर 36मधील स्वप्नपूर्ती सोसायटीच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटजवळ राहणार्‍या निताय प्रफुल्ल सरदार या बांधकाम कामगाराची 15 वर्षीय मुलगी 17 मार्चपासून बेपत्ता झाली आहे. दरम्यान, निताय प्रफुल्ल सरदार याने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून माझ्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली आहे.  …

Read More »

आवक घटल्याने हापूसचे दर आवाक्याबाहेर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी झाली आहे. यामुळे बाजारभाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. माल पुरेसा नसल्यामुळे यावर्षी गुढीपाडव्यालाही आंबा स्वस्त मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा हापूसची आवक लवकर सुरू झाल्याने हंगाम चांगला होईल, असे मत व्यक्त केले जात …

Read More »

निवडणुकीमुळे रात्रीच्या पार्ट्यांना उधाण

नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी उमेदवारांचा फंडा नवीन मुंबई ः रामप्रहर वृत्त : ठाणे लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात …

Read More »

करंजाडे येथे किड्स डेन स्कूलचे स्नेहसंमेलन

पनवेल : बातमीदार : किड्स डेन स्कूल, करंजाडे या शाळेचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुदेशना सेनगुप्ता उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. करंजाडे सेक्टर 6 येथील किड्स डेन स्कूलमध्ये  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन …

Read More »

रखरखत्या उन्हात हनुमान मंदिराला फुटला पाझर

उरण पंचायत समिती परिसरातील चमत्कार उरण : रामप्रहर वृत्त : उन्हाचा पारा चढत असताना उरण पंचायत समितीच्या आवारात असणार्‍या हनुमान मंदिराच्या छतातून चक्क पाणी पाझरू लागले आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. गेली तीन महिन्यांपासून पाणी पाझरत असल्याची माहिती मंदिराचे पुजारी भरत रावल यांनी दिली. उरण पंचायत समितीच्या …

Read More »

उरण-पनवशेलमधील विद्यार्थ्यांचे गोशीन कराटे स्पर्धेत सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त : पनवेल येथे नुकत्याच गोशीन रियू साऊथ वेस्ट झोन कराटे स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धांमध्ये उरण व पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विविध वयोगटातील विजेते स्पर्धेक पुढीलप्रमाणे ः अमिता घरत, सिद्धी माळी (प्रथम), अमिशा घरत (द्वितीय), दिक्षिता पाटील (प्रथम), सेजल पाटील (द्वितीय), ऋतुराज …

Read More »

उरणमध्ये गुजराती, राजस्थानी माठ

उरण : वार्ताहर : उन्हाचा पारा चढू लागताच सर्वांना आठवण येते ती थंडगार माठातील पाण्याची ,मातीच्या पाण्याची चव हि काही वेगळीच असे माठ विक्रेते उरण शहरात ठिक -ठिकाणी दुकाने थाटून बसलेले सर्वत्र दिसत आहेत .असे माठ आनंदी हॉटेल जवळ ,उरण चारफाटा ,शेवा -चारफाटा ,व काही विक्रेते हातगाडी वर तर काही …

Read More »

कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका, जागते रहो

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे खडे बोल; कोपरखैरणे येथे शिवसेना-भाजप मेळावा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : गणेश नाईक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास दिलेला नकार आणि भाजपशी झालेल्या युतीमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात आतापासूनच विजय निश्चित असल्याचे मानणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते व ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनीच खडे बोल सुनावले …

Read More »

‘चांद्रयान-2’ मोहिमेसाठी भारत सज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारताचे चांद्रयान-2 व इस्त्रायली बेरेशीट 11 एप्रिल रोजी चंद्रावर दाखल होणार आहेत. चांद्रयान नासाच्या उपकरणाला चंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे. भारताच्या चांद्रयान 1 मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान -2 मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या चांद्रयान मोहिमेमध्ये अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासादेखील सहभागी होत आहे. …

Read More »