Breaking News

Pravin Gaikar

उरण तालुक्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियान :21 हजार टन कचर्याचे संकलन

उरण : वार्ताहर : जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून पद्मश्री  डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 24) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान  रेवदंडा -अलिबाग यांच्या वतीने उरण तालुक्यातील स्मशानभूमी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. उरण तालुक्यातील एकूण 80 गावे, वाड्या व वस्त्यांतील एकूण 95 स्मशानभूमी सदर स्वच्छता …

Read More »

रोडपालीचे युवक शिवसेनेत

पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा झंझावात सर्वत्र पसरत असून, रोडपालीतील तरुणांनी शिवसेनेेत सोमवारी (दि.25 )जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रोडपाली विभागामधील शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. सर्व तरुणांचे रायगड जिल्हा समन्वयक अनिल …

Read More »

प्रश्नमंजुषा, स्फूर्तिगीत स्पर्धेला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त : नववर्ष स्वागत समितीच्या वतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल शहरामध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येत असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि स्फूर्तिगीत स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नववर्ष स्वागत समिती गेली 25 वर्षे मराठी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पदवी वितरण

खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथे रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. एलिझावेथ मश्युज् उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून उपस्थितांचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला.प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, …

Read More »

भडवळवाडीमधील महिला आक्रमक

कर्जत पंंं.स. वर हंडा मोर्चा नेण्याचा आदिवासी संघटनेचा निर्धार कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील नेरळजवळील दामत ग्रामपंचायतीमधील  भडवळवाडीमध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही. येथील आणि तालुक्यातील सर्व आदिवासी वाड्यांमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन कर्जत तालुका आदिवासी संघटना पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन मनातील खदखद व्यक्त करणार आहे. भडवळवाडीमधील …

Read More »

स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम

नागोठणे : प्रतिनिधी : जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दि. 24) स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत नागोठणे विभागाच्या श्री बैठकीच्या 827 सदस्यांकडून पेण, रोहे तालुक्यातील 80 स्मशानभूमीत ही मोहीम राबविण्यात आली. 80 स्मशानभूमीअंतर्गत असणार्‍या गावांची …

Read More »

शिरसे शिवसेना युतीकडे, तर पाथरज सर्वपक्षीय आघाडीकडे

कर्जत : बातमीदार/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील शिरसे आणि पाथरज दोन  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी (दि. 25) त्या मतांची मोजणी केली असता शिरसे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना युतीने वर्चस्व मिळविले असून, पाथरजचे थेट सरपंचपद सर्वपक्षीय आघाडीने मिळविले आहे. रविवारी या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान झाले होते. पाथरज या …

Read More »

सावित्रीमधील मगरींच्या मृत्यूचे कारण शोधणार कोण?

वनखात्याची उदासीनता; सिस्केप सामाजिक संस्थेचा प्रयत्न;सावित्री पात्रातील मगरींच्या मृत्यूचे गूढ; दै. रामप्रहरचा अंदाज ठरला खरा सावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परिसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या अचानक मृत्यूचेही एक वेगळेच गूढ वाढले आहे. गेल्या वर्षातील या मगरींच्या होणार्‍या मृत्यूनेही पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त होत …

Read More »

महायुतीचा डंका

करवीर निवासिनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडून पुन्हा एकदा राज्यात भगवा फडकवण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प तडीस लावण्यासाठी आता सर्वांनीच कंबर कसणे गरजेचे आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेत पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना पुन्हा …

Read More »

पेझारी, श्रीगाव येथे शिवजयंती जल्लोषात

श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे शिवभक्त पेझारी यांच्या वतीने दि. 23 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना शिवभक्त पेझारी तर्फे व उपस्थित शिवभक्तांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. रायगड किल्ल्यावरून पेटती मशाल (शिवज्योत)चे सकाळी 5 …

Read More »