Breaking News

Monthly Archives: January 2020

रायगडात महाविकास आघाडीत बिघाडी

जि. प.च्या सत्तेत सहभागी न होण्याचा शिवसेनेचा निर्णय अलिबाग : प्रतिनिधीराज्यात मोठा गाजावाजा करून तयार झालेल्या आणि राज्य सरकार स्थापन करणार्‍या महाविकास आघाडीचे रायगड जिल्ह्यात मात्र तीनतेरा वाजले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बुधवारी (दि. 15) बिनविरोध झाली, मात्र शिवसेना सदस्यांनी या सभेस गैरहजर राहून आपली नाराजी …

Read More »

चाय से किटली गरम

निवडणुकीत राबराब राबणार्‍या कार्यकर्त्यांनी एखादे वेळी स्तुतीसुमनांची उधळण करताना मर्यादा ओलांडली तर त्यावर कठोर कारवाई करणे नेत्यांना देखील अवघड होते. काही दिवसांपूर्वी कुण्या एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील ग्रंथाबाबत असाच वाद उद्भवला. वास्तविक अशी पुस्तके आणि अन्य स्तुतीपर साहित्यसामग्री सदासर्वकाळ प्रसिद्ध होत असते. त्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम …

Read More »

सिडकोतर्फे त्रिसदस्यीय समिती स्थापन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या 10 गावांतील बांधकामांबाबतच्या तक्रारींचे प्राधान्यक्रमाने निवारण करण्यासाठी सिडकोतर्फे निवृत्त सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. उलवे, कोंबडभुजे, तरघर आणि अन्य …

Read More »

भित्तिचित्रांमुळे नवी मुंबई शहराला नवा लूक

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षणसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी पालिकेकडून शहराचे सुशोभिकारण केले जात आहे. दुरुस्तीसह शहरातील उड्डाणपूल, व भिंती रंगवून त्यावर आकर्षक चित्रे व संदेश लिहिण्यात येत आहेत. मात्र ही चित्रे आता आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू लागले असून अख्खे शहरच सेल्फी पॉईंट झाले …

Read More »

‘सीकेटी’त राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर त्याच बरोबरकार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.वसंत बर्‍हाटे, …

Read More »

दि.बा.पाटील यांच्या जयंतीनिमित्त चर्चासत्र

नवी मुंबई : बातमीदार लोकनेते दि.बा. पाटील यांचा 94वा जयंती सोहळा सोमवारी (दि. 13) मोठ्या उत्साहात झाला. भूमिपुत्रांपुधील उद्योजकतेच्या संधी या चर्चा सत्राचे आयोजन आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर येथे करण्यात आले होते. मुंबई व्यतिरिक्त वसई, मीरा-भाईंदर, घोडबंदर रोड, ठाणे, बाळकुम, कोलशेत, भिवंडी, दिवा-डोंबिवली परिसर, तळोजा, …

Read More »

दोन लाचखोर पोलिसांसह तिघे जेरबंद, एक फरार

पनवेल : बातमीदार  गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ बाळगणार्‍या व्यक्तीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस नाईक व एक खासगी व्यक्ती अशा तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेला पोलीस शिपाई कारवाईनंतर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू …

Read More »

‘छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही’, उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाकडूनही संजय राऊतांचा निषेध

मुंबई : प्रतिनिधी ’छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची सातार्‍याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल’, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी करुन …

Read More »

बहुजन क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करा -उदय काठे

रेवदंडा : प्रतिनिधी बहुजन क्रांती मोर्चातर्फे 8 जानेवारी रोजी अलिबागमध्ये मोर्चा काढला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी  पंचायत समिती सदस्य व रायगड जिल्हा भाजप चिटणीस उदय काठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल …

Read More »

अलिबागमध्ये अभिनव अभिवाचन स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी अभिवाचन आनंद आणि आभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पीएनपी नाट्यगृहात एकल व सांघिक अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वयाच्या 13 वर्षापासून ते अगदी 65 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांच्या अभिवाचनामुळे अलिबागकरांना  अभिवाचन मेजवानीचा आस्वाद घेता आला. या अभिवाचन स्पर्धेची संकल्पना श्रद्धा पोखरणकर यांची होती. अलिबाग तालुका तसेच पुणे …

Read More »