Breaking News

Yearly Archives: 2022

सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः वार्ताहर येथील महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड या शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडीबिल्डिंग फेडरेशन यांच्या वतीने हिमाचल प्रदेशमधील पोवंटा साहिब या ठिकाणी भारतीय …

Read More »

रायगडचा हिंगोलीवर दणदणीत विजय

क्रिश पाटील, नैतिक सोळंकी यांची शतके; आमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा अलिबाग ः प्रतिनिधी पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात  रायगडने हिंगोलीवर एक डाव व 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात निर्णायक विजय मिळवून रायगडने पूर्ण गुण वसूल केले. हिंगोली संघाने नाणेफेक …

Read More »

पनवेलच्या शुद्ध हवेसाठी लोकप्रतिनिधी एकवटले

खारघर : प्रतिनिधी खारघर, तळोजा आणि पनवेल या परिसरातील रहिवासी दिवसातील 17 तास प्रदूषित हवेचा श्वास घेत असल्याचे वातावरण फाउंडेशनने 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत केलेल्या संशोधन अभ्यासातून समोर आले आहे. पनवेल आणि लगतच्या परिसराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून अतिप्रदूषित हवेमुळे पनवेलकरांच्या आरोग्याला धोका …

Read More »

ऐरोलीत विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार विकास  निधीतून विविध नागरी कामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 22) ऐरोलीत झाले. या वेळी मुंबई आणि ठाण्याला मालमत्ता कर सवलत मंजूर करणार्‍या राज्य सरकारने नवी मुंबईचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही. सरकारकडून नवी मुंबईला सापत्नपणाची …

Read More »

नवी मुंबईत दुचाकी अपघातांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गतवर्षात घडलेल्या 215 प्राणांकित आणि गंभीर अपघातात एकूण 90 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 55 टक्के अपघात दुचाकींचे आहेत. तसेच 34 टक्के अपघात पादचार्‍यांचे झाले असून दुचाकी व पादचार्‍यांच्या अपघातातील मृत्यूंचे प्रमाण एकूण मृतांच्या संख्येच्या 89 टक्के इतके आहे. त्यामुळे …

Read More »

पाण्यासाठी आक्रोश

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी वीज आणि पाणी हे दोन्ही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकार किती तडफेने काम करत होते हे सार्‍या महाराष्ट्राने पाहिले आहे. फडणवीस सरकारच्या कारकीर्दीत वीजेच्या लोडशेडिंगची नामुष्की कधी आली नाही. जेव्हा जेव्हा वीजेचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उग्रपणे आ वासून उभा राहिला, तेव्हा तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मुंबईतील तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू

कर्जत ः बातमीदार नेरळजवळील अवसरे येथे नातेवाईकांकडे आलेल्या मुंबई घाटकोपर येथील 19 वर्षीय तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह सोमवारी (दि. 23) दुसर्‍या दिवशी नदीकिनारी बाहेर आल्यानंतर तो पोलिसांनी शवविच्छेनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. इम्तियाज अहमद हलीम खान (वय 19) असे मयत तरुणाचे नाव असून तो नातेवाईकांकडे अवसरे …

Read More »

फणसाड अभयारण्यात बिबट्याच्या पाऊलखुणा

वन्यजीव गणनेत विविध पशू-पक्ष्यांचे दर्शन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात करण्यात आलेल्या वन्यजीव गणनेत पाणवठ्याच्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पशू-पक्ष्यांचे दर्शन दर्शन घडले आहे. फणसाड अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यजीव गणना करण्यात झाली. सुमारे 54 चौरस किलोमीटर परिसरात या अभयारण्याची व्याप्ती असून समुद्रसपाटीपासून जवळ असणारे …

Read More »

नेरळजवळ गोळीबार; रिक्षाचालक थोडक्यात बचावला, गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार बदलापूर येथून भाडे घेऊन कर्जतकडे येणार्‍या रिक्षाचालकावर नेरळजवळ गोळीबार करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदानंद शिवाजी मुंढे (रा. सोनिवली. बदलापूर) असे गोळीबारात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव …

Read More »

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून तळोजातील नाल्यांची पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तळोजा फेज-1 येथील नाल्यांची सोमवारी (दि. 23) अधिकार्‍यांसह पाहणी करून आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. पावसाळ्यात पनवेल महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महापालिकेने कंबर कसली आहे. या अनुषंगाने नगर परिषद हद्दीतील नाल्यांची …

Read More »