Breaking News

संपादकीय

आर्थिक उलाढालींना बळ हवे

जगभरात अद्यापही कोरोना विषाणूचे थैमान चिंताजनकरित्या सुरूच आहे. भारतात या महामारीतून बरे होणार्‍यांचे प्रमाण एव्हाना 76 टक्क्यांवर गेल्याने महामारीचा आलेख स्थिरावल्यासारखे भासते आहे. एकीकडे कोरोनासंबंधी चाचण्यांची संख्या वाढवूनही नव्याने नोंदल्या जाणार्‍या पॉझिटिव्ह केसेसचे प्रमाण खाली आले आहे, तर मृत्यू दर आणखी खाली गेला आहे या सर्वच बाबी दिलासादायक आहेत. त्यामुळेच …

Read More »

येरे माझ्या मागल्या…

देशाला स्वातंत्र्य मिळून 70हून अधिक वर्षे झाली आहेत. या सात दशकांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. धीमे-धीमे प्रगती करत करत आपला भारत देश आता नव्या बदलांसाठी सज्ज होत आहे. या देशात इतक्या गोष्टी बदलल्या, परंतु भारतीय राजकारणातील एक गोष्ट मात्र बदलू शकली नाही. ती म्हणजे काँग्रेस पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांचे गांधी …

Read More »

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता!

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन घरोघरी तसेच सार्वजनिकरित्या झालेले आहे. यंदा गणेशोत्सवावर कोविड-19चे सावट आहे. असे असले तरी हा आनंददायी उत्सव साजरा करण्याचा उत्साह कायम आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात काही दिवस का होईना चैतन्य अनुभवास मिळत आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र …

Read More »

बाप्पाच्या साक्षीने श्रीगणेशा

जनतेने नाकारलेले असताना देखील शेकापचे रायगडमधील नेतृत्व पूर्वीप्रमाणेच मनमानी कारभार करत राहिले, त्याची फळे त्यांना येत्या काळात भोगावी लागतीलच. शेकापच्या नगरसेवकांच्या आप्तस्वकीयांनी उचललेले पाऊल हे विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. या सगळ्यांचे भारतीय जनता पक्षात मन:पूर्वक स्वागत. आपल्या सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा ही बुद्धीची देवता आहे. म्हणूनच हे सकारात्मक पाऊल उचलण्याची …

Read More »

श्रद्धा आणि सबुरी

गेल्या दहा दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. ठाणे शहरात रिकव्हरी रेट 89 टक्के इतका झाला असून उत्तम रिकव्हरी रेट असलेले ठाणे हे देशभरातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर ठरले आहे. कल्याण-डोंबिवली, पालघर या भागांमध्ये गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत होते व तो आरोग्य यंत्रणांच्या चिंतेचा …

Read More »

शोकांतिका की गूढकथा

अकाली अस्तंगत झालेला बॉलीवूडचा सितारा सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूभोवताली दाटलेले संशयाचे धुके आतातरी निवळेल अशी अपेक्षा आहे. बरीच राजकीय चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप, खालच्या स्तरावरील गावगप्पा, खर्‍याखोट्या अफवांचे पीक या गोष्टींमुळे गेले दोन महिने देशातील वातावरण गढूळ झाले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा सुस्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बजावला. बॉलीवूड …

Read More »

विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा

पदवीच्या अंतिम परीक्षा प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू असून तीन दिवसांनी त्याचा सोक्षमोक्ष लागेल असे दिसते. विद्यार्थ्यांच्या हिताचा सर्वंकष विचार करून सर्वोंच्च न्यायालय योग्य निर्णय देईल यात शंका नाही. तथापि, गेले जवळपास निम्मे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरचे जे नुकसान झाले त्याचे काय हा खरा प्रश्न आहे. काही राजकीय पक्षांनी सत्तेचा दुरुपयोग …

Read More »

दक्षतेत ढिलेपणा नको

आजवरच्या एकूण कोविड-19 रुग्णांच्या संख्येत पुण्यातील संख्या रविवारी मुंबईच्याही पुढे गेल्याने पुणे शहर हे देशातील नवीन ‘कोरोना राजधानी’ बनले आहे. पुण्याच्या आधी देशातील सर्वाधिक कोरोना केसेसमध्ये मुंबई आघाडीवर होती. एकूण परिस्थिती पाहता आजही महाराष्ट्रातील कोरोना संदर्भातील स्थिती चिंताजनकच आहे. आणि या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारपासून राज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण असा सांस्कृतिक उत्सव …

Read More »

स्वावलंबी अन् आरोग्यपूर्ण भारत

भारतीय स्वातंत्र्याचा 73वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला असला तरी उत्साह कायम होता. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशाला स्वावलंबी बनविण्याबरोबरच देशवासीयांचे आरोग्य जपण्याचा निर्धार यंदा पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी… भारताला लाभलेले सक्षम व खंबीर असे …

Read More »

असा घेता येतो मल्टिबॅगर्सचा शोध

आपल्या अभ्यासाबद्दल प्रचंड खात्री व केलेली गुंतवणूक सांभाळून ठेवण्याचं धैर्य ज्याच्याकडे आहे, त्याला बाजारात मल्टिबॅगर्सचा शोध घेणे अवघड नाही. कोणते आहेत अशा मल्टिबॅगर्सचे निकष? मल्टिबॅगर्स शोधण्याआधी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण मल्टिबॅगर्स हे एखाद दोन वर्षांत ठरत नाहीत तर त्यासाठी बराच संयम ठेवावा लागतो. अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे …

Read More »