Breaking News

संपादकीय

अभिनयाचा ध्रुवतारा

ब्रिटिश आणि युरोपीय रंगभूमीवर ज्याप्रकारे संयत अभिनय परंपरा होती, तोच प्रवाह डॉ. लागू यांनी मराठी रंगभूमीत रुजविला. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी असा भेदाभेद त्यांनी कधीही केला नाही. त्यांच्या मते नाटकांचे दोनच प्रकार असू शकत होते- एक चांगले नाटक आणि दुसरे वाईट नाटक. ‘शेवटी आम्ही सारे लमाण… इकडचा माल तिकडे नेऊन …

Read More »

अस्वस्थ वर्तमान

नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कुठल्याही भारतीय नागरिकाच्या अस्तित्वाला धक्का लावत नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये अत्याचाराचे बळी ठरलेल्या अल्पसंख्य भारतीय जमातींना भारतात आश्रय देणारा हा कायदा आहे. असे असताना निव्वळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधकांनी अशा देशविघातक प्रवृत्तींना खतपाणी घालणे निषेधार्ह आहे. या कायद्यामध्ये मानवतेचेच तत्त्व अंतर्भूत …

Read More »

रायगडमधील बँक घोटाळा

पश्चिम महाराष्ट्रात वसंतदादा, राजाराम बापू यांच्यासारख्या नेत्यांनी सहकार चळवळ उभी करून त्यातून नेतृत्व उभे करून राज्याचे नेतृत्व केले. कोकणात मात्र सहकार रूजला नाही हे कटू सत्य आहे. गोरेगाव अर्बन, रोहा अर्बन, पेण अर्बन आणि आता कर्नाळा बँक घोटाळ्यावरून हे पुन्हा एकदा दिसून आले. येथील नेत्यांनी सहकारापेक्षा स्वाहाकाराला महत्त्व दिल्याचे दिसून …

Read More »

विषाची लागवड

अब्जावधी डॉलर्सचा चोरटा बाजार असलेला अंमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो असे मानले जाते. न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को, अ‍ॅमस्टरडॅम, म्युनिक, इस्तंबूल आणि काबूल अशा महानगरांमध्ये अंमलीपदार्थांच्या व्यवसायाने केव्हाच हातपाय पसरले आहेत. जगातील या महानगरांच्या नामावळीत आता मुंबईचाही समावेश होऊ लागला आहे. अंमलीपदार्थांचा विळखा पृथ्वीभोवती किती घट्ट आवळत …

Read More »

अवघड आठवडा

थाटामाटात शिवाजी पार्कवर ज्या सहा-सात जणांनी शपथा घेतल्या, त्या अर्धा डझन लोकांनी सारी मंत्री पदे आपसात वाटून घेतली आहेत. अधिवेशनानंतर रीतसर खातेवाटप होईल असे सांगितले जाते. परंतु हिवाळी अधिवेशनात प्रश्न कोणाला विचारायचे, उत्तरे कोणता मंत्री देणार, एखाद्या विभागाचे उत्तरदायित्व कोणाचे, उत्तरे देणारा मंत्री त्याच खात्याचा मंत्री राहील याची शाश्वती काय, …

Read More »

कर्जत-खोपोलीच्या प्रवाशांना पुन्हा प्रतीक्षा

कर्जत, खोपोली, नेरळच्या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाहीत. असे असताना नवीन उपनगरीय सेवेत वाढ करण्याऐवजी मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यावेळी पनवेलमार्गे मुंबईत लवकर पोहचण्याची शक्यता असताना त्या मार्गावर उपनगरीय लोकल किंवा शटल सेवा सुरू करण्यासदेखील मान्यता देत नाही. असे असताना रेल्वे प्रशासनाला बदलापूरच्या पुढे लोकसंख्या …

Read More »

खेळा, फिट राहा, यशस्वी व्हा!

खेळांचा हंगाम आता भरात येऊ लागला आहे. जिकडे-तिकडे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा रंगताना दिसत असून, त्यामध्ये असंख्य खेळाडू सहभाग घेत आपले कौशल्य दाखवत आहेत. खेळ म्हणजे केवळ मनोरंजन व शारीरिक कसरत ही संज्ञा काळाच्या ओघात बदलली. या क्षेत्रातही करिअर होत असल्याने मुलांसह त्यांच्या पालकांचा ओढा विविध खेळांकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. …

Read More »

उद्धवरूपी सह्याद्रीवर देवेंद्रसागराच्या लाटा आदळणार?

मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, फिरसे लौटकर आऊंगा! हे उद्गार आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि 14व्या विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे. अचानक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, तसेच त्यांच्या मित्रपक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन …

Read More »

कबड्डी संघांची भाईगिरी ठेचा!

रायगड जिल्हा म्हणजे कबड्डीचे माहेरघर समजले जाते. येथे कबड्डीच्या जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धा अन्य जिल्ह्यात होत नाहीत, परंतु याच जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेत जेवढ्या भानगडी होतात तेवढ्या भानगडी इतर कोणत्याही जिल्ह्यात होत नाहीत. रायगड जिल्ह्यातील कबड्डीला भानगडींचा शाप आहे. याला जबाबदार जेवढे खेळाडू आहेत तेव्हढीच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनदेखील याला …

Read More »

उचलली जीभ…!

नुकत्याच घडलेल्या हैदराबाद येथील एका डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर हे विधान त्यांनी करायला नको होते. बलात्काराच्या घटनांमुळे देशातील जनता आधीच हळवी झाली आहे. सोशल मीडियापासून अन्य अनेक माध्यमांपर्यंत सर्वच स्तरांवर बलात्काराच्या घटनांबद्दल असंतोष व्यक्त होत असताना सुज्ञ पुढार्‍यांनी सांत्वनाचा सूर लावणे अपेक्षित असते, परंतु या सुज्ञपणाची अपेक्षा कुठल्याही …

Read More »