Breaking News

संपादकीय

अखेर ‘देवेंद्र’च ठरले ‘अजित’ (अजिंक्य)!

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी अचानक भूकंप झाला आणि शुक्रवारपर्यंत राजकीय सारीपाटावर ज्या चाली खेळवण्यात आल्या होत्या त्या उद्ध्वस्त करून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि अजित अनंत पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 24 ऑक्टोबर 2019 रोजी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी …

Read More »

धूर्त चोर आणि चतुर पोलीस

’पोलीस अधिकार्‍यांची चोराला शोधण्याची टेक्निक कधी मदतीला येईल सांगता येत नाही. कारण सहा वर्षांपूर्वी टिटवाळा भागात चोरी करणारा चोर दोन वर्षे सजा भोगून नेरळला राहायला गेला आहे आणि तेथे दुकान टाकून धंदा करतोय अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी नेरळमध्ये घडलेल्या …

Read More »

सायबर सावधानता हवीच!

इथे महिलांना पाठलाग, ब्लॅकमेलिंग, बदनामी, खोटी प्रोफाइल्स, पोर्नोग्राफी अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते. लहान मुलेही अजाणतेपणी अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सर्वसामान्यांमधील तंत्रज्ञानविषयक जागरुकता वाढवण्यातूनही सायबर गुन्हेगारीला अटकाव होऊ शकेल. चर्चा बर्‍या गोष्टींची असो वा वाईट, दोन्ही बाबतीत सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचाच नंबर वरचा लागताना अनेकदा दिसून येतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने …

Read More »

जिल्हा क्रीडा संकुलाला कुणी वालीच नाही

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल बाधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. बहुतेक जिल्ह्यांमध्ये क्रीडा संकुले बांधून पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्हा क्रीडासंकुल बांधण्यात आले. अनेक वर्ष या संकुलाचे काम थांबले होते. त्यानंरत इनडोअरचे काम पूर्ण करण्यात आले. आऊटडोअर करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या क्रीडासंकुलाचे …

Read More »

प्रसन्नमूर्ती भला माणूस

संयम, जिद्द आणि संस्कार या त्रिसूत्रीची जोड माणसाकडे असल्यास आपोआपच समाजाशी ऋणानुबंध निर्माण होतात आणि समाजाच्या उत्कर्षासाठी ते नेहमीच आदर्शवादी ठरतात. याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणशेठ भगत. सामाजिक चळवळीतील आदर्श कार्यकर्ता म्हणून अरुणशेठ यांना ओळखले जाते. कुठलाही राग, मत्सर, द्वेषाला मनात थारा न देता कोणत्याही परिस्थितीत समाजोपयोगी कार्य करीत …

Read More »

पुरुष दिनाचीही दखल

स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचेही शोषण होऊ शकते हे आता स्वीकारले जाऊ लागले आहे. त्यामुळेच ‘हॅशटॅग मीटू’ चळवळीपाठोपाठच ‘हॅशटॅग मेनटू’ चळवळीने देखील डोके वर काढले, मग भले तिचा आवाज तुलनेने क्षीण असला तरीही, स्त्रियांकडूनही कधीकधी खोटे आरोप केले जातात याची दखल घ्यावीच लागली. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा गाजावाजा प्रत्यक्ष तो दिवस येण्याच्या कितीतरी आधीपासून …

Read More »

रेल्वे स्टेशनवरून कुली हद्दपार

’सारी दुनिया का बोझ हम उठाते है. लोग आते है, लोग जाते है, हम यही पे खडे रह जाते है… कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या गाण्यामुळे रेल्वे स्टेशनवरील या कुलीला प्रतिष्ठा मिळवून दिली, पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि व्हीलवाल्या बॅगमुळे …

Read More »

उचलली जीभ…

पराकोटीच्या राजकीय भांडणात शब्दाने शब्द वाढतो आणि विनाकारण तणाव निर्माण होतात हे तर खरेच. आपण आपल्याच हाताने परतीच्या वाटा बंद करीत चाललो आहोत, नजीकच्या भविष्यात हा मार्ग परिस्थिती आणखी अवघड करेल याचे भान ठेवायला हवे. परिस्थिती शक्यतो चिघळू नये याची पुरेशी काळजी भारतीय जनता पक्षाने जरुर घेतली आहे हे तर …

Read More »

महाडमधील ट्रॉमा केअर अत्याधुनिक व्हावे

महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी अपघातप्रसंगी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावा म्हणून 15 वर्षांपूर्वी ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल उभारण्यात आले. त्यावेळचे आमदार माणिक जगताप यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून हे रुग्णालय या ठिकाणी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र अल्पावधीतच हे रुग्णालय प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेचे बळी ठरले आहे. दरदिवशी सुमारे 200 …

Read More »

प्रेमा तुझा रंग असा?

शहरी असोत वा ग्रामीण आजच्या तरुण पिढीचा अशा संबंधांविषयीचा दृष्टिकोन आधीच्या पिढ्यांपेक्षा बराच वेगळा आहे. समाजमाध्यमांमुळे नात्यात वा संबंधांमध्ये प्रगल्भता येण्याआधीच त्यांचे प्रदर्शन अधिक केले जाते. वितुष्ट येताच मग अहंकार दुखावला जातो. ही कारणे देखील या वाढत्या हत्याप्रकरणांमागे आहेत. वर्तमानपत्रांतून नियमितपणे डोकावणार्‍या गुन्हेगारीविषयीच्या बातम्या कैकदा आपल्याला भिवया उंचावायला भाग पाडतात. …

Read More »