विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली नाही एवढी प्रचंड उलथापालथ निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरदेखील राजकीय पटलावरील हालचाली थांबण्याचे नाव घेत नाहीत. विशेष म्हणजे परस्परविरोधी विचारधारा असलेली शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आपली ध्येयधोरणे बासनात गुंडाळून चक्क मांडीला मांडी लावून बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी …
Read More »खंडाळा घाटाची वाट बिकट
सांग कसो दिसतो खंडाळ्याचो घाट, असे वर्णन कवींनी खंडाळा बोरघाटाचे केले आहे. सुंदर, देखणा नेत्रांना सुखावणारा खंडाळा घाट सध्या अपघातांच्या मालिकांनी पुन्हा चर्चेत आला आहे. हे अपघात निव्वळ मानवी चुका व यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच घडल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. युती शासनाने 2001मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार केला. त्याअगोदर मुंबई-पुणे …
Read More »अहिराणीचा सामाजिक अनुबंध
अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा अख्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादित असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक …
Read More »फत्तेशिकस्त
कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल. राजगडावर जिजामाता तर पन्हाळगडावर शिवाजीराजे आहेत. राजगडावर ताबा मिळवण्याचा शाहिस्तेखानाचा प्रयत्न जिजाऊ राजगडावरून युद्ध करून अयशस्वी करतात. लाल किल्ला आणि पुणे सध्या शाहिस्तेखानच्या (अनुप सोनी, सावधान इंडियावाला) ताब्यात आहे. नामदार खान (समीर धर्माधिकारी) हा …
Read More »समाजमाध्यमांमुळे एकाकी
मानवप्राणी हा सामाजिक प्राणी असून समवयस्क मित्रमंडळींशी प्रत्यक्ष भेट, संवाद, देवाणघेवाण या त्याच्या नैसर्गिक गरजा आहेत. समाजमाध्यमांतून हा संपर्क, संवाद साधला जातो असा आभास निर्माण होत असला तरी समाजमाध्यमे ही तितकीच तुम्हाला एकाकी करणारीही असू शकतात असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ताज्या संशोधनांतून निघतो आहे. समाजमाध्यमांच्या प्रभावाची चुणूक एव्हाना सर्वच क्षेत्रांमध्ये कळून …
Read More »स्थानिकांचं मरण
जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी न घेता आणि सागरी किनारा नियंत्रण नियमावलीचे (सीआरझेड) उल्लंघन करून प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर अनधिकृतपणे बंगले बांधले आहेत. त्यावर कारवाई करण्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने यापुढे अलिबाग समुद्रकिनार्यावर एकही बेकायदा बंगला नको असे राज्य सरकारला बजावले आहे. हे चांगलेच झाले, परंतु …
Read More »निष्कलंकतेचा निर्वाळा
राफेल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी अजब मागणी देखील काँग्रेसने लावून धरली. वस्तुत: अशा चौकशीमुळे राफेल विमानाचे तंत्रज्ञान, त्यातील गोपनीय शस्त्रास्त्र सुविधा हे शत्रूच्या हातात विनासायास पडले असते. म्हणून अशाप्रकारची चौकशीची मागणी अनाठायी आहे हे कुठल्याही सामान्य बुद्धीच्या माणसासही कळेल. परंतु बालबुद्धीचे नेते आणि त्यांचे पाठिराखे यांना …
Read More »ग्राहकांना चिंता नसावी
ग्राहकांना मोबाइल बिलाची भरणा करण्यात एक दिवसाचीही सवलत न देणार्या या कंपनीच्या सार्या मागण्या पाहून सर्वसामान्य ग्राहकांना आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. भारतात समन्यायी स्पर्धेला वाव राहिलेला नाही अशी आवई उठवणार्या व्होडाफोनचा निर्देश जिओच्या वाढत्या स्पर्धेकडे आहे. व्होडाफोन भारतातून काढता पाय घेणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेली असताना या अफवांमध्ये …
Read More »दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेल तालुक्यात
रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड सोलापूर येथे बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील बाल साहित्य संमेलनाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना …
Read More »अखेर राष्ट्रपती राजवट
राष्ट्रपती राजवट म्हणजे कुठले अस्मानी संकट नव्हे तर बिघडलेल्या राजकीय प्रकृतीवर ते एक औषध आहे. यापूर्वीही 1980 साली फेब्रुवारी ते जून या कालावधीत तसेच 2014 साली 32 दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवटीची ही तिसरी वेळ आहे. राष्ट्रपती राजवटीतही राजकीय समीकरणे जुळत राहतातच. त्यावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper