Breaking News

संपादकीय

नारायण राणे यांचा भाजपप्रवेश महाराष्ट्राच्या हिताचाच!

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांपासून तर राजकीय विश्लेषक अशा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही व्यक्तीच अशा असतात की जे बोलले तरी बातमी होते आणि नाही बोलले तरी बातमी होते. माध्यमांना अशा व्यक्तींची दखल घ्यावीच लागते. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसेच नारायण राणे हेही …

Read More »

उत्सव पर्यावरणस्नेही व्हावा

गरीब असोत वा श्रीमंत सर्व स्तरांतील वस्त्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव तितक्याच उत्साहात साजरा केला जाताना दिसतो. हा उत्सव जसा लोकांना एकत्र आणतो, सार्वजनिक जीवनाची रंगत वाढवतो, तसाच तो काही प्रमाणात प्रदूषणातही भर घालतो हे आपण मान्य करायलाच हवे. तसे ते केले तरच आपण हे प्रदूषण रोखण्यास वा कमी करण्यास हातभार लावू …

Read More »

मुरूड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढणार

मुरूड-जंजिरा महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरील एक जलदुर्ग आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. अगदी किल्ला हातात आलाच होता, पण जंजिरा अखेरपर्यंत अजिंक्यच राहिला. सध्या झी मराठीवर छत्रपती संभाजी ही मालिका सुरू आहे. मागील काही भागात जंजिरा किल्ल्याशी संबंधित गोष्टी दाखविल्या जात आहेत. कोंडाजी फर्जंद सध्या …

Read More »

‘सुवर्ण’ सिंधू

भारतीय क्रीडा क्षेत्रात मागील काही महिने चांगल्या बातम्या येत आहेत. दुती चंद, हिमा दास, मोहमद अनास यांनी पदके जिंकली. पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळात जगज्जेता खेळाडू तयार होतात ही …

Read More »

आरोग्यम् धनसंपदा

नुकत्याच 25 ऑगस्टला पार पडलेल्या मन की बात कार्यक्रमातही मोदींनी या जनआंदोलनाचे सूतोवाच केले होते. देशातील प्रत्येक नागरिकाला फिट आणि फिटनेसविषयी जागरूक राहताना पाहण्याची आपली इच्छा असल्याचेही मोदीजींनी यावेळी सांगितले. देशातील निरनिराळ्या सामाजिक-आर्थिक स्तरातील जनतेपर्यंत आता फिट आणि निरोगी राहण्याचे फायदे पोहोचवले जातील, याची ग्वाहीही मोदींनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

शिवराजधानी रायगडाचे जीर्णोद्धारपर्व

ब्रिटीशांचे राज्य असताना महात्मा जोतीराव फुले उपाख्यतात्या यांनी रायगडावर 1886 साली तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून शिवछत्रपतींची समाधी पाऊणशे वर्षांच्या माजलेल्या गवत-घाणेरीतून शोधून काढली. हिंदवी स्वराज्याचे अठरापगड जातींचे आणि सर्वधर्मियांचे म्हणजेच रयतेचे राज्य ज्या रायगडाने पाहिले; केवळ त्याचा एकमेव साक्षीदार खुद्द रायगड किल्लाच असल्याचे सांगता येऊ शकेल. शिवजयंतीदेखील महात्मा जोतीराव …

Read More »

राहुल गांधी तोंडघशी

जम्मू-काश्मीरसंबंधीचे कलम 370 हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जाहिरनाम्यातील एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता केली. एक देश, एक प्रधान, एक विधान या तत्त्वानुसार भारत खर्‍या अर्थाने अखंड केला. देशाच्या तमाम जनतेने या धाडसी निर्णयाचे मुक्त कंठाने कौतुक केले. पण राहुल गांधी यांच्या मते मात्र तो आततायीपणा होता. …

Read More »

अनिवासी भारतीयांशी विवाह करताना ‘सावधान’

पंजाबमध्ये जुलैमध्ये अनिवासी भारतीय विवाह आणि त्यातील समस्या या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.  परदेशात राहणारा नवरा मिळणं ही खास आनंदाची व प्रतिष्ठेची बाब समजली जात असल्याने परदेशातली नोकरी आणि तिथल्या उच्चभ्रू जीवनशैलीची भुरळ पडूनच परदेशस्थ मुलाला लगेच होकार दिला जातो. घाईगडबडीने लग्न केले जाते. या वेळी विवाहापूर्वी …

Read More »

पुन्हा एकदा मोदी मॅजिक

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सार्‍या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे भारताच्या विरोधात आगपाखड केली असून अणुयुद्धाचा गर्भित इशारा देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरातील सारे महत्त्वाचे देश भारताच्या बाजूने अभे राहात असल्याचे स्पष्ट दिसू लागल्याने खान यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. फ्रान्सच्या बिआरित्झ शहरात जी-7 परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान …

Read More »

‘हर घर जल’साठी लोकसहभागाची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ‘हर घर जल’ अशी घोषणा केली आहे. याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक करायला हवे, पण त्यांच्या या अभियानाला प्रत्येक भारतीयाने साथ द्यायला हवी, तरच हे शक्य आहे. पंतप्रधानांनी अनेक योजना आणल्या आहे. स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक बंदी अशी कितीतरी नावे घेता येतील. त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक …

Read More »