महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा पुरता पर्दाफाश झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी महाविकास आघाडीच्या खुर्चीखाली जबरदस्त बॉम्ब फोडला. त्याने सत्ताधारी आघाडीची उरलीसुरली अब्रूदेखील धुळीला मिळाली आहे. गेले काही महिने नवाब मलिक यांनी विविध आघाड्यांवर खरीखोटी सरबत्ती सुरू ठेवली होती. आर्यन …
Read More »सेवाभावाचा मूलमंत्र
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे देश पातळीवर विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. बुडत्याला काडीचा आधार बहुदा यालाच म्हणत असावेत. या पक्षांच्या कित्येक नेत्यांना ताबडतोबीने आगामी विधानसभा निवडणुका, तसेच पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची स्वप्ने पडू लागली असून त्यांच्यापैकी अनेकांनी अगदी आकडेवारीसह आपल्या विजयाचे भाकीतही करून टाकले …
Read More »हेरिटेज वारसा : मिनीट्रेन
युनोस्कोच्या हेरिटेजसाठी माथेरानची राणी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पर्यटनाला चालना देणारी माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेनने हेरिटेजसाठी युनोस्कोच्या पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून, दुसर्या फेरीकडे योग्य वाटचाल सुरू आहे. यापूर्वीदेखील 2002 साली युनेस्कोकडून माथेरानच्या मिनिट्रेनला हेरिटेज दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. आताही युनोस्कोच्या हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी मिनिट्रेन …
Read More »निष्क्रियतेचे किती बळी?
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेतील बहुतेक तपशील यापूर्वीच्या अशा दुर्दैवी घटनांमध्येही अस्तित्वात होते. त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच राज्यभरातील हॉस्पिटलांचे फायर ऑडिट करण्यात आले. परंतु ऑडिटनंतर अग्निशमन दलाकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणीच केली गेली नाही तर निव्वळ ऑडिटमधून काय साधणार? मागील दुर्दैवी घटनांमधून संबंधितांनी काहीच बोध घेतला नाही एवढेच यातून …
Read More »पुढील वर्षातील शेअर्सची निवड सोपी व्हावी म्हणून
पुढील वर्षभरात कोणते शेअर वधारतील आणि सेन्सेक्स, निफ्टी किती परतावा देतील, असे अंदाज दिवाळीच्या मुहूर्ताला देण्याची पद्धत आहे. याही वर्षी सर्व प्रमुख ब्रोकर्सनी असे काही शेअर्स सुचविले आहेत. अशा काही शेअर्सवर लक्ष ठेवून त्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यातील चांगल्या शेअर्सची निवड गुंतवणूकदारांना सोपी व्हावी म्हणून अशा शेअर्सचा हा आढावा… मागील 23 …
Read More »संधी आहे, पण पारंपरिक चष्मा बदलावा लागेल !
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने संघटीत होते आहे, असे सांगणारा स्टेट बँकेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा बदल सर्वव्यापी आणि अपरिहार्य असल्याने त्याच्याकडे स्वच्छ दृष्टीने पाहण्याची गरज आहे. तसे पाहणार्यांना या बदलातील संधी दिसेल. जे पारंपरिक चष्मा बदलणार नाहीत, त्यांना हा बदल स्वीकारणे निश्चितच जड जाईल. आपण त्याकडे कसे पाहणार आहोत? …
Read More »तमसो मा ज्योतिर्गमय!
वैश्विक महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशात आटोक्यात येऊ लागला आहे. तसे पाहिले तर दुसर्या लाटेआधी काही काळ असाच दिलासा मिळाला होता, पण तेव्हा निर्बंध लागू होते, परंतु निर्बंध पूर्णपणे उठविल्यानंतरही तिसरी लाट रोखण्यात आपण यशस्वी झालो. त्यामुळे खर्या अर्थाने तमसो मा ज्योतिर्गमय संदेश देणारी दिवाळी आपण यंदा साजरी करीत आहोत. …
Read More »शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौर्याहून मायदेशी परतले. इटली आणि ब्रिटन अशा दोन देशांच्या या दौर्यात महत्त्वाच्या बैठका, द्विपक्षीय चर्चा, बहुराष्ट्रीय कार्यक्रम, भेटीगाठी असे त्यांचे भरगच्च वेळापत्रक होते. नेहमीप्रमाणे त्यांनी याही दौर्यात आपली छाप उमटवली आणि जागतिक पातळीवर भारताची भविष्यातील दिशा मांडली. एवढी मोठी लोकसंख्या आणि विविधतेतील एकता असणारा …
Read More »शेवटाची सुरूवात
अनिल देशमुख यांच्या बाबतीत इडीसारख्या तपासयंत्रणेने कमालीचा संयम दाखवला असेच म्हणावे लागेल. तपास यंत्रणांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी देशमुख यांना पुरेसा वेळ देण्यात आला होता. न्यायालयाने सुद्धा त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर पर्यायच न उरल्याने देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित व्हावे लागले. असे असतानाही त्यांना झालेली अटक अनैतिक किंवा बेकायदेशीर कशी असू …
Read More »राजकारणातले फुसके बार
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द कार्यक्षमता आणि पारदर्शकता या दोन गोष्टींसाठी लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. फडणवीस यांच्यावर थिल्लर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मलिक यांनी तेच करत आपली पातळी दाखवली. राजकारणामध्ये परस्परांवर आरोप होऊ शकतात, होत असतात, परंतु कुणाच्या पत्नीस किंवा कुटुंबीयांस त्यात ओढण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आणि हीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper