पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे येथे 22 जुलै 2021 रोजी दरड कोसळली. त्यात एकूण 11 जणांचे बळी गेले, आता तेथे पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येत आहे. मात्र, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांची बेगमी करण्याचे राजकारण होऊ घातल्यास 2005च्या दरडग्रस्त कोतवाल अन् कोंढवी पुनर्वसनाचा अपयशी पॅटर्नची …
Read More »धीर कसा धरायचा?
जो मराठवाडा अवघ्या महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई सोसणारा, दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्या मराठवाड्यातील नद्यांना आलेला पूर आज ओसरताना दिसत नाही. धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती बिकट झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. धीर सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना केले आहे. पण सरकारी मदतीचा आजवरचा अनुभव लक्षात घेता शेतकर्यांनी कुणाच्या आधाराने …
Read More »आता मराठवाडा संकटात
कोकणानंतर आता मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून गेल्या 14 दिवसांत औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर परिसरात पावसामुळे 35 जणांचा बळी गेल्याचे समजते. याखेरीज शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारकडून कुठलीही मदत मिळू शकेल, अशी आशाही लोकांना वाटेनाशी झाली आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड, तसेच कोकणवासीयांनाही अद्याप आवश्यक तितकी मदत …
Read More »विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन!
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (27 सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्या वर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अॅन्ड वॉच’वर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन 2050पर्यंत जगातील 68 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात …
Read More »दहशतवादाला थारा नाही!
अवघे विश्व गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीशी झुंजत आहे. कोविड-19 विषाणूने प्रचंड उलथापालथ केली. कोरोनारूपी आपत्ती अचानक आलेली आहे, पण दहशतवादाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जगाला भेडसावत आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. अफगाणिस्तावर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळविलेला असून तेथे आता तालिबानी राजवट आहे. तालिबानी …
Read More »अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्याची वाताहत
मुरूड तालुक्यात आतापर्यंत 3769 मिमी एवढा प्रचंड पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्याला यामुळे मोठी हानी सहन करावी लागली आहे. ग्रामीण व शहरातील रस्त्यांची दैना उडाली असून मुंबई शहराला जोडणार्या पुलांचासुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काशीद येथील पूल वाहून गेल्याने अलिबाग-मुरूड येथील वाहतूक तब्ब्ल 20 दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे …
Read More »शाळेची घंटा वाजणार
गेले 18 महिने बंद असलेल्या शाळांची घंटा 4 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा घणघणू लागणार आहे. सुनसान पडलेली शाळांची आवारे पुन्हा एकदा बाळगोपाळांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ घरामध्ये बसून ऑनलाइन शिक्षण घेणार्या विद्यार्थीवर्गाला पुन्हा एकदा गणवेश चढवून शाळेतील प्रत्यक्ष शिक्षणाची मौज अनुभवता येणार आहे. पुरेसा गोंधळ घालून …
Read More »कधी थांबणार बलात्कार?
तब्बल 29-30 समाजकंटकांनी सुमारे आठ महिने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करावेत ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. कुठलाही सुजाण नागरिक यामुळे शरमेने मान खाली घातल्याशिवाय राहणार नाही. डोंबिवलीतील या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटतील किंबहुना प्रसारमाध्यमे हे काम आवर्जून करतील. यामुळे महाराष्ट्राची उरलीसुरली अब्रूदेखील नष्ट होणार आहे. देशभरातील …
Read More »उद्दाम साहेबीपणा
भारत, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमधून येणार्या प्रवाशांना चौदा दिवस विलगीकरण आणि दोनदा आरटीपीसीआर चाचणी ब्रिटिश सरकारने सक्तीची केली आहे. इंग्लंडला पोचणारा प्रवासी भारतीय नागरिक कोव्हिशिल्ड लसींचे दोन्ही डोस पूर्ण करून तेथे पोहोचला असला तरी त्यालाही विलगीकरणात जावे लागणार आहे. वास्तविक अॅस्ट्रा झेनेका या ब्रिटिश कंपनीच्या लसीचे भारतीय नाव म्हणजे कोव्हिशिल्ड. …
Read More »सरकारी पत्रसंवाद
राज्याचे घटनात्मक प्रमुख माननीय राज्यपाल हेच असतात. म्हणूनच विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये माझे सरकार असा उल्लेख वारंवार आढळून येतो. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबद्दल तसे काही म्हणायची सोय राहिलेली नाही. कारण उलटेसुलटे राजकीय खेळ करून सत्ता काबीज करणार्या महाविकास आघाडी सरकारचा राज्यपालांशी सुसंवादच नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये या उभयतांमधील विसंवादाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper