Breaking News

संपादकीय

सरकारी ‘ग्रामीण ई-स्टोअर’मध्ये खाजगी भागीदारीचे स्वागत का केले पाहिजे?

ग्रामीण भागात डिजिटल सेवा आणि वस्तू घरपोच पोहचविण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘ग्रामीण ई-स्टोअर’मध्ये खाजगी उद्योग भागीदार होत आहेत. यामागे ग्रामीण बाजारपेठ मिळविण्याचा उद्देश असला तरी त्यातून त्यांच्यात जी स्पर्धा होणार आहे, त्याद्वारेच ग्रामीण भागात चांगली सेवा आणि वस्तू घरपोच मिळविण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. त्यामुळे या भागीदारीचे स्वागत केले पाहिजे. …

Read More »

धुमसते काश्मीर

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले आहे असे दिसते. काश्मीरातील नागरिकांना, विशेषत: अल्पसंख्याकांना लक्ष्य करून होत असलेल्या या हत्यांचा उद्देश धार्मिक सलोखा बिघडवणे हाच आहे हेही स्पष्ट दिसते. काश्मीरमधील शांतता प्रक्रिया वेगाने सुरू रहावी असे भारताच्या प्रत्येक सुजाण नागरिकाला वाटते. काश्मीर खोरे हे भारताचे अविभाज्य अंग आहे. …

Read More »

उदे गं अंबे उदे

दीड-पावणेदोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे आणि देवळांची कवाडे एकदाची खुली झाल्यामुळे भाविकांनी मनातल्या मनात का होईना सुटकेचा निःश्वास सोडला असेल आणि मनोभावे हात जोडले असतील. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने घाईघाईने मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. यथावकाश मद्यालये आणि उपाहारगृहे देखील सुरू झाली. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी हे आवश्यकच होते, …

Read More »

राजकीय शोकांतिका

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या गावात शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या भयंकर हिंसक प्रकारामुळे देशभरातील राजकारण ढवळून निघाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतो. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी गावात आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांच्या अंगावर आशिष मिश्रा या मंत्रिपुत्राने गाडी …

Read More »

नशेच्या विळख्यात तरुणाई

शाहरूख खान याचा पुत्र एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे वृत्त निश्चितपणे टीआरपी खेचणारे आहे, त्यामुळे या प्रकरणाला नको तितकी प्रसिद्धी मिळाली. आर्यन खान अमलीपदार्थांच्या प्रकरणात दोषी असेल तर त्याला सजा मिळायलाच हवी. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. लोकप्रिय अभिनेत्याचा पुत्र म्हणून त्याला न्यायालय सवलत देऊ शकत नाही हे सार्‍यांनाच माहीत आहे. तथापि …

Read More »

कुपोषित बालकांचे पुनर्वसन केंद्र कधी सुरू होणार?

रायगड जिल्ह्यातील बालकांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी अलिबाग या जिल्हा मुख्यालयी बालउपचार आणि पुनर्वसन केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून चालवले जाते. जिल्ह्यातील जास्त कुपोषण हे कर्जत तालुक्यात यापूर्वी दिसून आले असल्याने स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि कुपोषण कमी करण्यासाठी काम करणार्‍या गाभा समितीच्या शिफारशीनुसार एप्रिल 2021 मध्ये कर्जत येथे कुपोषित बालकांच्या उपचार …

Read More »

महाविकास आघाडीत बेबनाव

शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या सभेत बोलताना महाविकास आघाडीमध्ये वर सत्तेत आपण एकत्र असलो, तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही, अशी जाहीर कबुली दिली होती. कार्यकर्ते सोडा पण आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्येदेखील जमत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. …

Read More »

पाणीदार ग्रामपंचायत-जामरुंग

कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन बनलेल्या जामरुंग ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील पाण्याच्ता स्त्रोतांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत पाणीदार बनवली आहे. ग्रामपंचायतीमधील सर्व भागात पाणी साठवण करण्याचे यशस्वी नियोजन करून तसेच सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांची निर्मिती करून जलसाक्षरता मोहीम राबविण्याचे यशस्वी काम जामरुंगसारख्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीने …

Read More »

अमृतमय भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भराभरा निर्णय घेत सर्वप्रथम देशभरात झाडझूड आणि स्वच्छता सुरू केली. मग तो भ्रष्टाचाराचा केरकचरा असो किंवा गावोगाव, गल्लोगल्ली साचलेला खराखुरा उकिरडा. हे पंतप्रधानांचे सर्वंकष असे स्वच्छता अभियान होते. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत उभा करण्याचा पंतप्रधानांचा इरादा यात स्पष्टपणे दिसतो आणि समाधानाची बाब …

Read More »

अंधेर नगरी…

गेल्या दोन वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घातलेले विविध घोळ पाहता महाराष्ट्राच्या जनतेला रोज कालचा गोंधळ बरा होता असेच म्हणावेसे वाटत असेल. एकेकाळी याच महाविकास आघाडी सरकारने डोक्यावर घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे आता गायब असल्याचे सांगण्यात येते आहे. खरे काय नि खोटे काय हे यथावकाश बाहेर …

Read More »