Breaking News

संपादकीय

सेबीच्या एका बदलामुळे शेअर बाजारात नवे वारे

मागील आठवड्यात शेअर बाजारांची नियामक संस्था असणार्‍या सेबीनं पर्यायी आधारावर शेअर व्यवहारांसाठी टी+1 रोलिंग सेटलमेंट सादर केली. परिपत्रकानुसार, हा नवीन नियम 1 जानेवारी 2022पासून अमलात येईल आणि तो सहा महिन्यांसाठी चाचणीच्या स्वरूपात असू शकतो. मागील आठवड्यात बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण घटनेवर सुनावणी झाली आणि लगेचच ज्याच्यावर बाजारातील सक्रिय ब्रोकर्स, ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स, …

Read More »

शिक्षणाच्या निर्यातीचा ब्रिटन, अमेरिकेला धनलाभ!

ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणारे भारतीय विद्यार्थी असो की अमेरिकेत संख्या, तसेच उत्पन्नाने वजनदार झालेला भारतीय समूह असो, यामागे काम करणारे अर्थकारण अचंबित करणारे आहे. त्या संबंधीच्या ताज्या आकडेवारीने हा बदल किती वेगवान आणि व्यापक आहे हे लक्षात येते. शिक्षणाचा व्यवसाय झाला, असे आपण म्हणतो तेव्हा बहुतांश वेळा धंदा शब्द वापरला …

Read More »

गणेशमूर्तींबाबत ठोस धोरण हवे

गणेशमूर्ती बनविण्याबाबत शासनाचे ठोस धोरण नाही. त्यामुळे गणपती कारखानदारांचे नुकसान होत आहे. शासन शाडूमातीच्या मूर्ती बनविण्यास सांगते तर गणेशभक्तांची मागणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना असते. शाडूमातीच्या मूर्तीना मागणी नसल्यामुळे पेण परिसरातील गणपती कारखान्यांमध्ये मातीच्या लाखो मूर्ती पडून आहेत. राज्य सरकारने आता घरगुती गणेश मूर्तीसाठी दोन फुटांची तर सार्वजनिक मंडळांसाठी चार …

Read More »

आरोग्याचा श्रीगणेशा

काळोख्या रात्री अवघड वाटेवर मिणमिणत्या प्रकाशात एकेक पाऊल सावधपणे पुढे टाकत वाटचाल करावी तसे सारे जग तिळातिळाने पुढे सरकत असल्याचा भास होतो. अद्यापही अनिश्चिततापूर्णच भासणार्‍या वातावरणात पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी आला आहे. त्याचे श्रद्धापूर्वक स्वागत करायलाच हवे. संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया या ओळी त्यामुळेच …

Read More »

श्रेयवादाची विमाने उडाली

एखाद्या न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कुठल्या थराला जाऊ शकते याचे ताजे उदाहरण म्हणून कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाकडे बोट दाखवावे लागेल. विमानतळ उभारणी आणि त्याचे चलनवलन हा संपूर्णत: केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय असतो. त्याचा राज्याशी संबंध येतोच कुठे? कोकणातील निसर्गरम्य किनारपट्टी भागात चिपी येथे …

Read More »

कोकण रेल्वेने रायगडकरांना दिलासा द्यावा

कोकणची माणसे साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी म्हणतात, ते खरेच आहे. म्हणूनच त्याचा फायदा कोकण रेल्वे प्रशासनाने घेऊन त्यांच्यावर सतत अन्याय केला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असतानाही प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला रेल्वेने सापत्नभावाची वागणूक दिली आहे. गणेशोत्सव तोंडावर आला तरी दिवा-रोहा गाडीही सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात …

Read More »

निर्बंधांचा बागुलबुवा

गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी पक्षाचे नेते पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची भाषा करू लागले आहेत. याची अटकळ बहुतेकांना होतीच. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे भय दाखवून लोकांच्या वावरण्यावर निर्बंध लादण्याचे महाविकास आघाडी सरकारचे धोरण काही नवीन नाही. अशा प्रकारच्या भयाच्या राजकारणाचा पुरेपूर अनुभव महाराष्ट्राची जनता घेतच आली आहे. कोरोनाचे संकट अजून …

Read More »

पुरातन विहिरींचे जतन

लोकसहभागातुन पुरातन पायविहिरींचे जतन व संवर्धन करणारी महाराष्ट्र बारव मोहीम राजे प्रतिष्ठानने हाती घेतली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्र बारव मोहीम ची जोरदार चर्चा सुरू आहे. रोहन काळे व मनोज सिंकर ह्या दोन ध्येयवेड्या तरुणांनी स्वयंम प्रेरणेने लोकसहभागातून ऑक्टोबर 2020 पासून सुरू केलेली ही मोहीम आता जोर धरू लागली आहे.या …

Read More »

पॅरालिम्पिकमध्ये भारताची भरारी

खेळांचा महाकुंभमेळा मानल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जपानची राजधानी टोकियोत पॅरालिम्पिक स्पर्धाही रंगली आणि तिचा रविवारी समारोप झाला. या स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी करीत एकूण 19 पदके जिंकली. यामध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही आजवरची सर्वोत्तम भरारी आहे. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणार्‍या जगभरातील खेळाडूंसाठी …

Read More »

एफएमसीजीच्या कंपन्यांना मागणी का वाढते आहे?

शेअर बाजार तापला की गुंतवणूकदार सुरक्षित क्षेत्र शोधायला सुरुवात करतात. जीवनावश्यक वस्तू विकणार्‍या फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना म्हणूनच गेल्या काही दिवसांत मागणी वाढली आहे. अशा काही कंपन्यांना कायम मागणी राहणार असल्याने त्या कंपन्यांकडे आपले लक्ष असले पाहिजे. मागील दोन वर्षे आपण सर्वांनीच लॉकडाऊनचा अनुभव घेतलेला आहेच. …

Read More »