Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या महामारीपासून बचावासाठी विविध उपाययोजना करणार्‍या वस्तूंचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अमर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त …

Read More »

रायगडात सलग दुसर्‍या दिवशी चौघांचा मृत्यू; 63 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 15) सलग दुसर्‍या दिवशी कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, 63 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44, पनवेल ग्रामीणमध्ये सात, पेण तालुक्यात सहा, अलिबाग तालुक्यात तीन, माणगाव तालुक्यात दोन आणि उरण तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे, तर मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील …

Read More »

पनवेलमध्ये 51 नवीन रुग्ण; तिघांचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 15) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 41  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 36 …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याबद्दल महेश साळुंखे यांनी दिले धन्यवाद!

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनामुळे लागू लॉकडाऊनच्या काळात केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी हार्दिक धन्यवाद दिले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणीही व्यक्ती …

Read More »

तरुणासाठी आदर्श व्यक्तीमत्त्व अमर पाटील

तरुणांचे प्रेरणा स्थान व राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रूची असणार्‍या माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचा आज वाढदिवस. सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगीकारले आहे. समाजकार्याला पुजा मानणार्‍या अमर अरुण पाटील यांचा वाढदिवस हा यावर्षी आरोग्यदायी असणार आहे. कोरोनारुपी महाभयंकर विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले आहे.  रुग्ण आणि मुतांच्या …

Read More »

जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – ’जुनं ते सोनं’ या संकल्पनेतून संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन झाले. संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या प्रसिद्धी व गायन विधाप्रमुख नृपाली जोशी यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन झाले. पनवेल, मुंबई, कोकण परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या घरामध्ये असलेल्या साधारण 100 वर्षांपूर्वीच्या वस्तूंबाबत …

Read More »

लॉकडाऊनमुळे रोपवाटिका धंद्यात मंदी

उरण : वार्ताहर  – दरवर्षी पावसाळ्याला सुरुवातीला नागरिक आपल्या आवडीची फुलझाडे, फळ झाडे लावत असतात. आपल्या घराशेजारी बाल्कनीत, आवारात आदी ठिकाणी आपल्या जागेत फुलझाडे, कलम केलेली फळ झाडे, फुलझाडे लावतात परंतु कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये त्या करिता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नागरिक झाडे, फुलझाडे खरेदी करण्यास घरातून फुलांच्या नर्सरीत …

Read More »

पनवेलमध्ये लालपरीचा आधार

सीएसएमटी लोकल सुरू; मात्र अत्यावश्यकचा घोळ पनवेल : प्रतिनिधी – पनवेल सीएसएमटी लोकल सोमवार (दि. 15) पासून सुरू झाली असली तरी अत्यावश्यकचा घोळ सुरूच आहे. अनेकांचे स्टेशनवर पोलीस आणि रेल्वे कर्मचार्‍यांजवळ वाद घालत असलेले पहावयास मिळाले. पोलिसांनाही लोकलमध्ये तिकीटा शिवाय प्रवेश नाही. नाराज कर्मचार्‍यांना कामावर जाण्यासाठी अखेर लालपरीचा आधार घ्यावा …

Read More »

पनवेल तालुक्यात 57 नवीन रुग्ण

तिघांचा मृत्यू; 43 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाच्या 57 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 44 नवे रुग्ण आढळले असून 35 रूग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 13 नवीन …

Read More »

सुसज्ज रक्तपेढीसाठी आमदार बालदींकडे मागणी

पाणदिवे : प्रतिनिधी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी रविवारी (दि. 14) सकाळी पनवेल येथील श्री. साई ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले. त्यांना रक्तदात्याचे प्रमाणपत्र डॉ. अबू बक्र, रायगड भूषण मनोज पाटील, आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच मढवी यांनी …

Read More »