Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेण अर्बन बँक ठेवीदारांना न्याय द्या; सर्वपक्षीय धरणे आंदोलन

भाजप आमदारांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडल्या गेलेल्या ठेवीदारांच्या न्याय हक्कांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी (दि. 2) पेण नगर परिषदेसमोरील हुतात्मा कोतवाल चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भाजपच्या चार आमदारांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. …

Read More »

वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव उत्साहात

खोपोली : प्रतिनिधी धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव रविवारी (दि. 1) माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. रविवारी सकाळी मंदिरात श्रींचा दुधाभिषेक, होमहवन आणि सत्यनारायण महापूजा झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जानकर यांच्या …

Read More »

माणगावात भरला कोकण खाद्य महोत्सव; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

माणगाव : प्रतिनिधी कोकण मेवा शॉपीतर्फे माणगावमध्ये कोकण खाद्य महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर रविवारी (दि.1) करण्यात आलेल्या या महोत्सवात गेले दोन दिवस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. माणगाव शहरातील कमल फर्निचरशेजारी भरविण्यात आलेला हा महोत्सव 8 मे पर्यंत चालणार आहे. या खाद्य महोत्सवात कोकणातील …

Read More »

अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा

कर्जत : बातमीदार नेरळजवळील धामोते गावातील प्रवीण दिनकर विरले यांनी आपला वाढदिवस वांगणी येथील किनारा अनाथाश्रमात जाऊन तेथील अनाथ, अंध आणि अपंग मुलांसमावेत साजरा केला. या वेळी प्रवीण विरले अनाथाश्रमातील मुलांना बिस्किटे, चॉकलेट, पाण्याच्या बॉटल, शीतपेय आणि खेळणी भेट दिली. या वेळी पवन विरले, विनायक तांबोळी, हरेश मुंढे, राहुल कोल्हे, …

Read More »

विहूर पुलाचे काम फक्त माती भरावाने

सिमेंट काँक्रिटची भिंत टाकण्यास सार्वजनिक बांधकाम खात्यास पडला विसर मुरूड : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे मुरूड-मुंबई रस्त्यावरील विहूर पूल वाहून गेला होता. या पुलाला सिमेंट काँक्रिटची भिंत बांधणे आवश्यक असतानासुद्धा मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त मातीचा भराव टाकून सदरचे काम आटोपले आहे. त्याबद्दल प्रवासी व नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. …

Read More »

नेरळमध्ये पोलिसांकडून रूट मार्च

कर्जत : बातमीदार हिंदू-मुस्लिम धर्मियांचे पवित्र सण एकाच दिवशी आले असून कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नेरळ पोलिसांनी आपल्या हद्दीत  रूट मार्च केले. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संमिश्र वस्ती असून  गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षे एकत्र राहत आहेत. कळंब गावातदेखील हिंदू, मुस्लिम लोकवस्ती आहे. …

Read More »

पेण नगर परिषद कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

पेण : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनााचे लक्ष वेधण्यासाठी पेण नगर परिषदेचे कर्मचार्‍यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले असून, सोमवारी (दि. 2) दूसर्‍या दिवशी 97 अधिकारी व कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 मे 2022 पासून …

Read More »

रायगड पोलिसांची सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम पोहचली म्हसळा तालुक्यात; खरसई गावाची केली निवड

म्हसळा : प्रतिनिधी सायबर फसवणुकीबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी रायगड पोलीस दालातर्फे जिल्ह्यांतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्यातील खरसई गावाची निवड केली असल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उध्दव सुर्वे यांनी दिली.घरफोडी आणि लुटमारीपेक्षा दरवर्षी सायबर फसवणुकीच्या घटना जास्त होत …

Read More »

लाकडाची अनधिकृत वाहतूक रोखली

महाड वन विभागाची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी बेकायदेशीर वृक्षतोड करुन लाकडाची अनधिकृत वाहतूक करणारी गाडी महाड वन विभागाने ताब्यात घेतली असून या प्रकरणी वाहतूक करणारा ट्रक आणि लाकडे  जप्त करण्यात आली आहेत. गुप्त माहितीनुसार आकेशिया जातीची वृक्षाची विनापरवाना तोड करून अनधिकृतपणे वाहतूक करणारा ट्रक (केए-56, 0622) वन विभागाच्या …

Read More »

ईद मुबारक!

इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिन्याला प्रारंभ होतो. हा महिना इस्लाम धर्मियांत अत्यंत पवित्र महिना समजला जातो. यावर्षी 2 एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर रमजान महिन्याला सुरुवात होऊन दि.3 एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याचे रोजे (उपवास) सुरु झाले. गेली दोन वर्षे रमजान महिन्यात कोरोना महामारीचे संकट असल्याने कोविड नियमांचे पालन करीत मुस्लिम …

Read More »