अलिबाग : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काशीद येथे 26 ते 28 नोव्हेबर या कालावधीत महाराष्ट्र, गोवा व गुजारत या तीन राज्यांतील बालरोगतज्ज्ञांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. भरतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या रायगड शाखेच्या यजमानपदाखाली हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्या या अधिवेशनात बालकांच्या समस्यांवर चार्चासत्र, परिसंवाद व व्याख्याने होणार …
Read More »मुलांच्या विविध समस्यांवर अलिबागमध्ये आज परिसंवाद
अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय बालरोग संघटना रायगड शाखेच्या वतीने गुरुवारी (दि. 25) पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे सांयकाळी 5 वाजता ‘मुले अशी का वागतात’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील नामांकीत डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. कोविड परिस्थिती, बदलती कुटुंब व्यवस्था, समाज माध्यमांचा भडिमार, टोकाची स्पर्धा आणि पालकांच्या …
Read More »शिक्षणामुळेच आपल्यामध्ये सुधारणा होते -विक्रम देशमुख
कर्जत : प्रतिनिधी प्रत्येकाने आपला मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना शिकवले पाहिजे. शिक्षणामुळे आपल्यामध्ये सुधारणा होते, असे मार्गदर्शन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले. उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आशाणे वाडीमध्ये तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट दिली. या वेळी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका बडेकर, उद्योजक निलेश …
Read More »भाजप दक्षिण भारत सेलची कर्जत मंडल बैठक
कर्जत : रामप्रहर वृत्त भाजपच्या दक्षिण भारत सेलची कर्जत मंडळ बैठक मंगळवारी (दि. 23) उत्साहात झाली. कर्जत येथील संत सेवालाल नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्रामुख्याने गुलबर्गा, यादीर, वाडी, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील तंदूर भागातील 100 हून अधिक दक्षिण भारतीय बंजारा कुटुंबे राहात आहेत. या बैठकीला …
Read More »माथेरानला पर्यावरणपूरक वाहतूक सुरू करण्यासाठी सनियंत्रण समिती अनुकूल
कर्जत : बातमीदार माथेरान हे वाहनमुक्त शहर असल्यामुळे प्रदूषण नाही त्यामुळे वेगळा नावलौकिक मिळालेले पर्यटनस्थळ माथेरानमध्ये पर्यावरण पूरक बदल घडत आहेत. येथील पर्यावरण जपत आता ई-रिक्षा वाहतूक सुरू करण्यासाठी सनियंत्रण समिती अनुकूल असून माथेरानचे पर्यावरण हे मुख्य वैशिट्य जपत हा बदल केला जाणार आहे. दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीतून हे संकेत …
Read More »रेशन दुकानदारांचा बंद स्थगित
अलिबाग : प्रतिनिधी राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वसान दिल्यामुळे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने 1 डिसंबरपासून पुकारलेला बंद स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरातील …
Read More »खोपोली चिंचवलीत पाच दुकाने फोडली
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील चिंचवली शेकीन येथे आयटीआय समोरील इमारतीतील चार ते पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. दुकानदारांनी याबाबत तक्रारच दिली नसल्याने, किती माल चोरीस गेला हे समजू शकले नाही. यासंदर्भात पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याशी संपर्क साधला असता, घटना घडल्याबाबत दुजोरा दिला, मात्र काहीच …
Read More »भरकटलेल्या कासवाला पालीत तरुणांनी दिले जीवदान
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली तहसील कार्यालयाबाहेर रस्त्यावर रात्री काही तरुणांना एक भरकटलेले कासव दिसले. या तरुणांनी ताबडतोब शिवऋण प्रतिष्ठान या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती कळवली व कासवाला वाचविण्याचे आवाहन केले. त्यानंतर पालीतील शंतनु लिमये या प्राणीमित्र युवकाने तेथे जाऊन कासवाला ताब्यात घेतले. त्यानंतर या कासवाला सुरक्षितपणे विहिरीमध्ये सोडले, …
Read More »चारफाटा ते डिकसळ मार्गावर पोलीस बीट उभारण्याची मागणी
कर्जत : बातमीदार कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ ते चारफाटा या दरम्यान पोलीस बीट सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांनी ही मागणी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे केली आहे. माथेरान या पर्यटन स्थळाकडे जाणार्या आणि कर्जत तालुक्यातून ठाणे-मुंबई कडे जाणार्या कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर …
Read More »मुरूड नगर परिषदेकडून मोकाट गुरांवर कारवाई
मुरूड : प्रतिनिधी नगर परिषदेने भटक्या मोकाट गुरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून दस्तुरी नाका येथे एक मोठा कोंडवाडा तयार केला आहे. त्यामध्ये किमान आठ गुरे राहू शकतात अशी क्षमता आहे. दिवसाला तीनशे रुपये दंड आकारण्याची प्रक्रिया मुरूड नगर परिषदेने सुरू केली आहे. पकडलेली बैल अथवा गाय सात दिवसाच्या आत …
Read More »