Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

संपामुळे दुसर्‍या दिवशीही लालपरी आगारातच; खाजगी वाहतूकदारांची चांदी, प्रवाशांच्या खिशाला चाट

अलिबाग : प्रतिनिधी सन्मान्य तोडगा न निघाल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि. 9) सुरूच राहिला आहे. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या आगारांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळत होता. त्यामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्‍यांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. त्यांनी आपला मोर्चा खाजगी प्रवासी वाहतूकीकडे वळवला आहे. एसटीच्या रायगड विभागातील सर्व …

Read More »

पोलीस भरतीत कर्जतच्या पूनम ठाकरे हिचे सुयश

कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल येथील पूनम तानाजी ठाकरे  ही पोलीस भरतीमध्ये रायगड जिल्ह्यात तिसरी आली असून, या यशाबद्दल पूनमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आसल गावातील तानाजी ठाकरे यांची मुलगी पूनम ही डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असायची. तिने पोलीस दलात सहभागी होऊन जनतेची सेवा करावी, असे …

Read More »

पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी कोरोना काळात दीड वर्षे मेंढपाळांनी आपल्या हद्दीच्या बाहेर पडणे टाळले होते. मात्र आता पाऊस थांबला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात दाखल होऊ लागले आहेत. महामार्ग, ग्रामीण भागातील रस्ते व शेतात ठिकठिकाणी मेंढपाळ आपल्या कळपासह दिसू लागलेत. कोकणात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मान्सून सुरू होताच कोकणात …

Read More »

कर्जतमधील आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी साहित्य आणि कपड्यांचे वाटप; मुंबईच्या नायगाव एज्युकेशन सोसायटीची दिवाळी भेट

कर्जत : बातमीदार मुंबईतील नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यांमधील 500 कुटुंबाना दिवाळी साहित्य आणि 600 विद्यार्थ्यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे हळूहळू शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी पुन्हा शाळेकडे वळू लागले असून त्यांना शाळेत टिकविण्यासाठी शिक्षक विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत. …

Read More »

टपरीधारकांकडून करवसुली करणार; नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय

कर्जत : बातमीदार नेरळमधील बहुतेक रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय केले जात आहेत. त्या टपरीधारकांकडून आता नेरळ ग्रामपंचायत कर वसूल करणार आहे. ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फुटपाथवर व्यवसाय करणार्‍या दुकानदारांकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोड रस्त्याचा एक भाग फेरीवाल्यांनी व्यापला आहे. गणेश घाट परिसरातील …

Read More »

रोह्यात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

धाटाव : प्रतिनिधी एका पाच वर्षांच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. 7) संध्याकाळी रोहे शहरात घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रोहा शहरातील पार्टे चाळीत राहणारी पाच वर्षांची मुलगी रविवारी संध्याकाळी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवायिकांच्या लक्षात …

Read More »

कर्जत आगारातील सर्व कामगारांचे आंदोलन

कर्जत : बातमीदार राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे आणि कामगारांचे थकीत वेतन, भत्ते, सवलती त्वरित लागू कराव्यात या मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी (दि. 8) कर्जत एसटी आगारातून एकही गाडी धावली नाही. आपल्या प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी राज्या परिवहन महामंडळातील सर्व कामगार संघटनांनी …

Read More »

मागण्या पूर्ण होईपर्यंत भाजप एसटी कामगारांसोबत -बिपीन महामुणकर

महाड : प्रतिनिधी एसटी कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी बंद पुकारला आहे, या बंदला भाजपने पाठिंबा दिला असून, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी सोमवार (दि. 8) महाड एसटी आगारातील कर्मचार्‍यांची भेट घेऊन, तुमच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत भाजप तुमच्या सोबत असेल, असा विश्वास दिला. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण, …

Read More »

रायगडातील एसटी कर्मचारी पुन्हा संपावर

परळ आगारातील चालकाच्या हातात अलिबागमधील कर्मचार्‍यांनी भरल्या बांगड्या अलिबाग : प्रतिनिधी राज्य सरकारकडून मागण्या मंजूर करून घेण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी सोमवारपासून पुन्हा संपावर गेले आहेत. एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधील 2500  कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. लांब पल्ल्याच्या प्रवाशांबरोबरच ग्रामीण भागातून …

Read More »

रायगडातील पर्यटनस्थळे बहरली; स्थानिकांच्या रोजगाराला चालना

पाली : प्रतिनिधी विस्तीर्ण समुद्रकिनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, निसर्गसौंदर्य यामुळे रायगड जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. मात्र कोरोनामुळे मागील पावणे दोन वर्षांपासून येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. सध्या कोरोनाचे सावट धूसर झाले आहे. अनेक नियम शिथिल केले आहेत. यंदा राहण्या-खाण्याचे दर स्थीर आहेत. त्यामुळे पर्यटकांचा …

Read More »