Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आगरदांडा रुग्णालयाची दुरवस्था

सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांचा उपोषणाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र उद्ध्वस्त झाले असून, गेल्या 10 महिन्यांपासून या आरोग्य केंद्राची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे;  अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी दिला आहे. मुरूड तालुक्यातील …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊननंतर बाजार पुन्हा गजबजला

मुरूड : प्रतिनिधी शनिवार व रविवार वीकएण्डची समाप्ती झाल्यानंतर सोमवारी मुरूडच्या बाजारपेठेत मोठी गर्दी पहावयास मिळाली. दोन दिवस घरीच बसून नागरिकांनी वीकएण्डला उत्तम साथ दिली होती. मात्र सोमवारी किराणा माल व भाजी खरेदीसाठी मुरूड बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. बुधवारी मुस्लिम समाजाचे रोजे सुरु होत असल्याने त्यांची खरेदीसाठी गर्दी झाली …

Read More »

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई

टँकरची थकित बिले दोन दिवसांत मिळणार पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील पाणीपुरवठा आराखड्याला मंजूरी देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सद्यस्थितीत दोन गांवे आणि 11 वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये  गेल्या वर्षीची टंचाई निवारणाची बिले अदा केली जाणार असल्याची …

Read More »

कर्जतमध्ये पुन्हा लसीकरण सुरू

वीकेण्ड लॉकडाऊनचा सदुपयोग कर्जत : प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊन आणि रविवार असूनही आज लस उपलब्ध झाल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसर्‍या दिवसाचा कर्जतमधील नागरिकांनी चांगला उपयोग करून घेतला. लस उपलब्ध असल्याचा मेसेज येताच कर्जत उपजिल्हा …

Read More »

कर्जतमध्ये दुसर्या दिवशीही कडकडीत बंद

कर्जत : प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊनमुळे एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते रविवारीही एकदम निर्मनुष्य दिसत होते. नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेले रस्ते आज कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार बंद होते. मात्र रविवार असल्याने मच्छी, मटण मार्केट खुले होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने अनेक निर्बंध घातले होते, परंतु …

Read More »

रोहा, माणगाव, नागोठण्यात कडकडीत बंद

विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई रोहे ः प्रतिनिधी वीकेण्ड लॉकडाऊनमधील दुसर्‍या दिवशी रविवारीही  रोहा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद होती. किरणामाल, दुध, भाजी व वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी सकाळी तुरळक नागरिक घराबाहेर पडले होते. ग्रामीण भागातही शुकशुकाट होता.  वीकेण्ड लॉकडाऊनची रोहा तालुक्यात शनिवारपासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. …

Read More »

नागोठणे शहरात औषध फवारणी

नागोठणे : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागोठणे ग्रामपंचायतीकडून रविवार (दि. 11) पासून संपूर्ण शहरात  सोडियम हैपो क्लोराईड या औषधाची फवारणी सुरू करण्यात आली आहे. रविवारी ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, एसटी बस स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र येथून औषध फवारणी सुरू करण्यात आली. शहरातील सर्व आळी, चौक याठिकाणी ही फवारणी करण्यात …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अलिबाग : जिमाका क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 11) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी महाराष्ट्रात समतेचा संदेश …

Read More »

पर्यावरणपूरक विकास

माथेरान शहर आणि परिसरातील डोंगररांगा या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाला बाधा करणारी कोणत्याही प्रकारांची कामे माथेरानमध्ये केली जात नाहीत. माथेरान गिरिस्थान नगर परिषददेखील पर्यावरणपूरक विकासकामे व्हावीत यासाठी पुढाकार घेत आहे. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत यासाठी मुंबईला महानगर प्रदेश …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे संपूर्ण रायगड जिल्हा ठप्प

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेण्ड लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शनिवारी (दि. 10) पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याचे रायगड जिल्ह्यात दिसून आले. कारवाईच्या भीतीने शहरी तसेच ग्रामीण दोन्ही भागांमध्ये कडकडीत बंद पाळला गेल्याने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या …

Read More »