Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

फणसाड अभयारण्यात जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग

मुरूड : प्रतिनिधी जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी फणसाड अभयारण्यातर्फे दरवर्षी जळीत रेषा काढण्याचे काम केले जाते. रस्त्यालगत असणारे गवत अथवा झाडेझुडपे जाळून टाकली जातात, जेणेकरून वणव्यांपासून जंगलाचे संरक्षण केले जाईल. त्या अनुषंगाने मुरूड येथील नवाबांचा राजवाडा परिसरात जळीत रेषा काढण्याचे काम सुरू आहे. या वेळी फणसाड अभयारण्याचे वनरक्षक अरुण पाटील, …

Read More »

पाच तासांत 5555 जोर; पेणच्या अजय पाटीलचा विक्रम

पेण ः प्रतिनिधी हनुमान व्यायामशाळा पेण व श्री फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये जोर (हिंदू पुशअप) मारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पेण तालुक्यातील बळवळी येथील 26 वर्षीय अजय कमलाकर पाटील या तरुणाने पाच तासांत 5555 जोर काढून विक्रम प्रस्तापित केला आहे. रविवारी (दि. 7) सकाळी 7 वाजून …

Read More »

सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश -मोहन काळे

कर्जत : प्रतिनिधी कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालयाला महाराष्ट्रातील बेस्ट कॉलेज तसेच प्राचार्य डॉ. मोहन काळे यांना बेस्ट प्रिन्सिपल अ‍ॅवॉर्ड मिळाल्याने महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या अ‍ॅवॉर्डचे श्रेय तुम्हा सर्वांचे आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश मिळाले. यापुढेही असेच सहकार्य लाभल्यास आपल्या महाविद्यालयाचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास फार्मसी …

Read More »

माणगावातील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई माणगाव : प्रतिनिधी येथील मुंबई – गोवा महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी बेकायेशीर बांधकामे केली होती. महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांनी ही बांधकामे शनिवारी (दि. 6) जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. माणगाव शहरातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी केलेल्या बेकायेशीर बांधकामाबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत …

Read More »

फणसाड अभयारण्यात पक्ष्यांच्या 190 प्रजातींची नोंद

मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात प्राण्यांबरोबरच पक्ष्यांचीही संख्या वाढत असून, नुकत्याच केलेल्या गणनेत पक्ष्यांच्या 190 प्रजाती या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत.सन 1986मध्ये अधिसूचित करण्यात आलेले मुरूडमधील फणसाड अभयारण्य 54 चौकिमी क्षेत्रफळात पसरलेले असून, मुरूडच्या नबाबाचे हे शिकारीसाठीचे राखीव जंगल असल्याने अन्य मानवी हस्तक्षेपापासून ते आजही सुरक्षित राहिले आहे. वन …

Read More »

प्रेमसंबंधाच्या रागातून बापाने केली मुलीची हत्या

खालापूर तालुक्यात खळबळ खोपोली, खालापूर : प्रतिनिधीबिहार राज्यातून आलेल्या कुटूंबातील 14 वर्षीय मुलीचा बापाने खून करून धड आणि शीर नदीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार खालापूर हद्दीत घडला. या घटनेनंतर क्रूरकर्मा बाप फरारी झाला आहे.खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय सुदर्शन सिंह (वय 50, रा. कुद्रा, जि. कैमुर भबुआ, बिहार)हा त्याची पत्नी आणि …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक अपघातात एक ठार

खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी (दि. 6) सकाळी मुंबईकडे चाललेला ट्रक बोरघाटातील सीआरआयएल कंपनीजवळ नाल्यात कोसळला. या अपघातात वाहनचालक ट्रकखाली चिरडून ठार झाला,  तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात सीआरआयएल कंपनीजवळ शनिवारी सकाळी 8.45वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईकडे चाललेला ट्रक महामार्गाजवळच्या नाल्यात कोसळला. …

Read More »

शेतांमध्ये कडधान्य पीक तयार

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे-निडीचा प्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या वाल, पावटा या कडधान्यांची पिके काहीअंशी उशिरानेच तयार झाली असल्याने शहरातील खवय्यांमध्ये पोपटीच्या सिझनला सुरुवात झाली आहे. डिसेंबरदरम्यान अचानक पाऊस पडल्याने या भागात लावलेल्या वाल, पावटा या कडधान्यांच्या पिकाला धोका पोहोचला होता. लावलेली पिके काही ठिकाणी नष्ट झाल्याने काही शेतकर्‍यांना या पिकांची …

Read More »

कोरोनाचे नियम पाळून बल्लाळेश्वराचा माघी जन्मोत्सव

पाली तहसील कार्यालयात नियोजन बैठक पाली : प्रतिनिधी कोरोनाचे नियम पाळून येत्या 15 फेब्रुवारीला पालीतील बल्लाळेश्वराचा माघी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र या वेळी यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. माघी गणेशोत्सवासंदर्भात पाली (सुधागड) तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासन, पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त आणि पदाधिकार्‍यांची नियोजन बैठक  झाली. या …

Read More »

पाली बसस्थानक परिसरात असह्य दुर्गंधी

उघड्या नाल्यांमुळे अपघाताच्या भीतीसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात पाली : प्रतिनिधी  पाली बसस्थानकासमोरील दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व परिसरातील बाजारपेठेत येणार्‍या जाणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर दोन मोठे नाले आहेत. …

Read More »