Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

हक्काच्या जमिनीसाठी आदिवासी आक्रमक…!

वहिवाट असलेल्या जमिनी आपल्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी झगडत आहेत. शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या जमिनीची खातेफोड होऊन वारसनोंदी झाल्या नाहीत तर आदिवासी समाज आणखी आक्रमक होईल, असा इशारा आदिवासी शेतकरी परिषदेत देण्यात आला. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वनजमिनी संबंधीत आदिवासी शेतकर्‍याच्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच बाजी मारणार

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास रोहे, धाटाव : प्रतिनिधी भाजपच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतींकडे लक्ष केंद्रित केले आहे. केंद्राचा सर्वाधिक निधी ग्रामपंचायतीकडे येणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच नेतेगण महाराष्ट्रासह कोकणात विविध विभागांत ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोकणासह महाराष्ट्रात तीन …

Read More »

निसर्गचक्र बदलले, शेतीवर परिणाम

सकाळी धुके, दुपारी ऊन, सायंकाळी पाऊस; दिवसभरात तीन ऋतूंचा अनुभव माणगाव : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून निसर्गचक्र बदलले असून यंदा जानेवारी महिन्यात तर दिवसभरात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असे तीनही ऋतू अनुभवायला मिळत आहेत. या बदललेल्या निसर्गचक्रामध्ये शेतकरी राजाची मात्र परवड सुरु आहे. आपल्याकडे सर्वसामान्यपणे जून ते ऑक्टोबर या महिन्यात …

Read More »

परमार महाविद्यालयात इनोव्हेशन सेलची स्थापना

नागोठणे : प्रतिनिधी भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या नागोठणे येथील ओटरमल शेषमल परमार महाविद्यालयात इनोव्हेशन सेल कमिटीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये टिपीओच्या मुख्य निशा जामकर, सिव्हिल विभागाच्या इच्छिता बोरकर तसेच संगणक विभागाच्या प्रणिता जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयाला मिळालेल्या इनोव्हेशन सेलच्या मान्यतेमुळे इंजिनियरींग, जिओग्राफी, फॉर्म सी तसेच पीएचडी …

Read More »

पोलादपूरचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे तिघे ठार, 67 जण जखमी

पोलादपूर ़: प्रतिनिधी चालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालविल्यानेच पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द धनगरवाडी भागात शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. कोंडूशी (जि. सातारा) येथील लग्न समारंभ आटपून खवटी (जि. रत्नागिरी) येथे येताना वर्‍हाडाच्या टेम्पोला कुडपण खुर्द झालेल्या अपघातात तीन व्यक्ती मृत झाल्याने या लग्नकार्यावर …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!

राज्यात सध्या नामांतराचा मुद्दा प्रचंड गाजतोय. औरंगाबादसह अन्य ठिकाणांच्या नामांतरावरून मतमतांतरे व्यक्त होत असतानाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला आहे. त्यामुळे पनवेल, उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. …

Read More »

रिलायन्स व्यवस्थापनाला निर्णय घ्यायला एवढा वेळ का?; लोकशासन संघटनेचा सवाल

नागोठणे : प्रतिनिधी कंपनीच्या कंत्राटी सेवेत कायमस्वरूपी काम करण्यास आमचे प्रकल्पग्रस्त तयार असल्याचे लोकशासन आंदोलन समितीने स्पष्ट केले होते. मात्र, रिलायन्स व्यवस्थापनाला निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागत आहे, असा सवाल संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी केला आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर चालू करण्यात आलेल्या …

Read More »

कोविड लसीकरणाची रंगीत तालीम; रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी ‘ड्राय रन’

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे शुक्रवारी (दि. 8) रायगड जिल्ह्यातदेखील कोविड 19 लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली.  जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा रूगणालय, पेणचे उपजिल्हा रूग्णालय, तसेच बोर्लीपंचतन व पोयनाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अशी चार केंद्रे लसीकरणासाठी निश्चीत करण्यात आली होती. या केंद्रांत प्रत्येकी 25 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. …

Read More »

अल्पवयीन बेपत्ता मुलीचा दोन तासांत लागला शोध

पेण : प्रतिनिधी येथील 12 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी सोमवारी  (दि. 4) दुपारी 3.45च्या सुमारास आपल्या पालकांना न सांगता तिच्या आईचा मोबाइल घेऊन घरातून निघून गेली होती. सर्वत्र शोध घेऊनसुद्धा ती सापडली नाही. पालकांनी संध्याकाळी पेण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अल्पवयीन बेपत्ता …

Read More »

प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पास स्थानिकांचा विरोध रास्त; मनसे शेतकर्यांच्या पाठीशी; बाळा नांदगावकर यांची ग्वाही

रेवदंडा : प्रतिनिधी तळेखार ते वाघूलवाडी परिसरातील शेतकर्‍यांचा प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पास रास्त विरोध असून, मनसे या शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असेल. वेळ पडल्यास येथे खळ खट्याक आंदोलन छेडू, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चोरढे येथे दिला. तळेखार ते वाघूलवाडी येथील प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. मनसे …

Read More »