ऋषिकेश शिंदेने सहा दिवसांत केले 1200 किलोमीटर अंतर पार कडाव : प्रतिनिधी – कोरोना योद्ध्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी कडाव येथील ऋषिकेश शिंदे याने कर्जत ते गोवा हे 1200 किलोमीटर अंतर अवघ्या सहा दिवसांत पार केले. कोरोना संक्रमण काळात पोलीस, प्रशासन व आरोग्य विभाग यांनी कौतुकास्पद काम केले. ऋषिकेश शिंदेने कर्जत …
Read More »ग्रामपंचायत निवडणूक : कर्जत तालुक्यात सदस्यपदाच्या 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज
कर्जत : प्रतिनिधी – तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार बुधवारी (दि, 30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तोपर्यंत ग्रामपंचायत सदस्य पदाच्या एकूण 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. कर्जत तालुक्यात कोल्हारे, जिते, पोशीर, साळोख तर्फे …
Read More »कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे हे रायगडकरांनी ठरवावे!
रायगडकरांसाठी 2020 हे नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले. आधी कोरोनाचा शिरकाव, टाळेबंदी, निसर्ग चक्रीवादळ, शेवटी अतिवृष्टी अशा समस्यांना रायगडकरांना तोंड द्यावे लागले. जून महिन्यात निसर्ग वादळाने रायगडला जोरदार तडाखा दिला. घरे पडली, बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर अतिवृष्टी झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात 29 जणांना प्राण गमवावे लागले. …
Read More »राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही : प्रवीण दरेकर
पेण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, निष्पाप जीवावर अत्याचार करून तिचा खून करण्याची ही हृदय हेलावणारी घटना आहे. हा एक प्रकारे अतिरेक असून, कायद्याचा जो धाक पाहिजे, जो दरारा पाहिजे तो महाराष्ट्रात दिसत नाही. …
Read More »पेणसह रायगड हादरला! महाराष्ट्र सुन्न!!
चिमुरडीवर बलात्कार करून हत्या पेण : प्रतिनिधीमाणुसकीला कलंक लावणारा प्रकार सरत्या वर्षाअखेरीस पेणमध्ये घडला आहे. पेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर एका नराधमाने बुधवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास पाशवी अत्याचार करून तिचा खून केला. या संतापजनक घटनेने पेण तालुक्यासह रायगड जिल्हा हादरला असून, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.या प्रकरणी 34 …
Read More »परदेशी नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद
खालापूर पोलिसांची कामगिरी खालापूर : प्रतिनिधी मेडिकल व्हिसा पासपोर्टवर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांची मुंबई विमानतळावर दिशाभूल करून त्यांना लुटणार्या टोळीचा म्होरक्या बंड्या उर्फ महेश लोखंडे (वय 40, रा. केगाव, ता. उरण) याच्यासह चार साथीदारांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. महेश लोखंडे हा काही वर्षे अमेरिकेत राहून आल्यामुळे त्याला इंग्रजीसह इतर …
Read More »आंदोलनकर्ता जगदिश वारगुडेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीविरोधात सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या जगदिश वारगुडे याचा 21 डिसेंबर रोजी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा लोकशासन आंदोलन समितीने घेतल्याने मृतदेह पनवेल येथील शवागारात ठेवण्यात …
Read More »रोह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता रोहे तहसिल कार्यालयात बुधवारी (दि. 30) उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक, वरसे, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी, …
Read More »इंग्लंडहून रायगडात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
अलिबाग : इंग्लडहून रायगड जिल्ह्यातील खारघरमध्ये आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्यावर पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 जणांची कोविड तपासणी सुरू आहे. इंग्लडहून खारघर येथील एक दाम्पत्य 8 डिसेंबर रोजी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर दोघे खोपोलीत आले. …
Read More »सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करा; रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी ‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जवळपास आठ हजार इमारती आहेत. यामध्ये …
Read More »