अलिबाग : प्रतिनिधी आखाती देशात नोकरी किंवा व्यावसायिक म्हणून स्थायिक झालेल्या भारतीयांना डॉ. सुनील मांजरेकर अध्यक्ष असलेल्या जीएमबीएफ फोरम या संघटनेचा फार मोठा आधार आहे. याची प्रचिती सौदी अरेबियात येमान मध्ये फसलेल्या 14 भारतीयांना आली. तब्बल 10 महिन्यानंतर या 14 जणांची जीएमबीएफ फोरमचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर, चंद्रशेखर भाटिया, समाजसेविका …
Read More »माणगावमधील शेतकरी मदतीपासून वंचित
माणगाव ः प्रतिनिधीमुरूडप्रमाणेच माणगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांनाही राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन तब्बल दोन महिने लोटले तरीही मदत मिळाली नसल्याने बाधीत शेतकरी हवालदिल झाले आहेत.माणगाव तालुक्यातील 2162.71 हेक्टर क्षेत्रामधील पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या 8343 शेतकर्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह …
Read More »हुतात्मा भाई कोतवाल यांना माथेरानमध्ये अभिवादन
कर्जत : बातमीदार वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची 108 वी जयंती मंगळवारी (दि. 1) माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी माथेरानकरांनी हुतात्मास्मारक येथून सकाळी मशाल फेरी काढली होती. त्यांच्या जन्मस्थळी हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम हाती घेण्यात आला …
Read More »खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार
आरोपीला तात्काळ अटक करावे; आदिवासी संघटनेची मागणी खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीतील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीना तात्काळ अटक करावी, अशा मागणी आदिवासी संघटनेने खालापूर …
Read More »रायगडात जेमतेम सात केंद्रांवर हमीभावाने भातखरेदी
शेतकर्यांचे आर्थिक नुकसान अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात या वर्षीच्या हंगामात 35 हमीभाव भात खरेदी केंद्रांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. भाताच्या मळण्यांची कामे वेगात सुरू असली तरी आतापर्यंत जेमतेम सात केंद्रांवरच प्रत्यक्ष भातखरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. व्यापारी पडत्या दराने भाताची खरेदी करीत असल्याने शेतकर्यांना …
Read More »‘आलाना’विरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार
नोकरीत सामावून घेण्यासाठी आजपासून साखळी उपोषण खालापूर : प्रतिनिधी स्थानिकांना रोजगार देण्याच्या मुद्यावरून साजगाव ग्रामस्थ आणि आलाना कंपनी सहा वर्षानंतर पुन्हा समोरासमोर आले असून, स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे यासाठी साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी गुरुवार (दि. 3) पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. खालापूर तालुक्यातील सारसन येथे तेलाचे …
Read More »अलिबागच्या खारेपाटात भीषण पाणीटंचाई
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील टँकरमुक्त तालुका अशी ओळख असलेल्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट परिसरातील गावांना डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भेडसावते आहे. अनेक गावात आठवड्यातून जेमतेम एक दिवस पाणीपुरवठा होत आहे. मांडवा, बोडणी, मिळकतखार, रेवस, सारळ, वीर्तसारळ, डावली, रांजणखार दत्तपाडा, फुफादेवीचा पाडा, आवळीपाडा, कोप्रोली, कावाडे …
Read More »रायगडात 96 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट होऊ लागली असून, मंगळवारी (दि. 1) नव्या 96 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 140 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 46 व ग्रामीण 19) तालुक्यातील 65, पेण 11, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी पाच, माणगाव …
Read More »विवाह सोहळ्यास आलेल्या पाहुण्याचा मृत्यू; पालीतील घटना
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली येथील मराठा समाज सभागृहात सोमवारी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेल्या एका पाहुण्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे पालीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण महादेव चव्हाण (वय 40) राहणार भांडुप ठाणे (पश्चिम)हे सोमवारी (दि.30) …
Read More »माथेरानमधील व्यावसायिक घेणार ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर’चा लाभ
कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये फुटपाथवर व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचा पथविक्रेते म्हणून समावेश करण्यात आला आहे. पदपथावर व्यवसाय करणार्यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजना जाहीर करण्यात आल्यानंतर या व्यावसायिकांचा नगरपरिषद कर्मचार्यांकडून सर्व्हे करण्यात आला होता. त्या अहवालावरून नगरपरिषदे मार्फत संबंधित योजनेचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले होते. ज्या व्यावसायिकांनी या योजनेमधील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली …
Read More »